Yavatmal Murder : डिजेवरचा ठेका जीवावर बेतला, यवतमाळमध्ये तरुणाची हत्या

आर्णी शहरातील गणपती मंदिर चौक परिसरात आतिष ढोले याचा चार तरुणांशी डीजेवर नाचण्यावरुन वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की चौघा आरोपींनी तरुणाला थेट भोसकले. यात आतिषच्या छातीवर वार करण्यात आल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ आर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे हलवले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

Yavatmal Murder : डिजेवरचा ठेका जीवावर बेतला, यवतमाळमध्ये तरुणाची हत्या
डिजेवरचा ठेका जीवावर बेतला, यवतमाळमध्ये तरुणाची हत्या
Follow us
| Updated on: Mar 19, 2022 | 8:29 PM

यवतमाळ : होळी आणि रंगपंचमी निमित्त डीजे स्पीकरवर नाचण्याच्या कारणावरून भांडण (Dispute) होऊन एका 30 वर्षीय युवकाला चौघांनी भोसकल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. आर्णी शहरातील गणपती मंदिर चौकात ही घटना घडली आहे. आतिष महादेव ढाले असे मयत (Death) तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच हत्येचा गुन्हा दाखल करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले. मात्र याप्रकरणी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रोहन मनोज सोयाम (21), चंदन मनोज सोयाम (23) अशी चौघांपैकी दोघांची नावे असून अन्य दोघांची नावे अद्याप कळू शकली नाही. (A young man was killed over an argument over dancing to a DJ in Yavatmal)

तरुणाच्या छातीवर वार केल्याने गंभीर जखमी अवस्थेत मृत्यू

आर्णी शहरातील गणपती मंदिर चौक परिसरात आतिष ढोले याचा चार तरुणांशी डीजेवर नाचण्यावरुन वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की चौघा आरोपींनी तरुणाला थेट भोसकले. यात आतिषच्या छातीवर वार करण्यात आल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ आर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे हलवले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मयत तरुणाचा भाऊ सतिश महादेव ढाले याच्या तक्रारीनुसार आर्णी पोलिसात प्रथम कलम 307, 34 भादवी नुसार गुन्हा दाखल केला आहे. मात्र शवविच्छेदन अहवालानंतरच हत्येचा गुन्हा दाखल करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले. चौघे संशयित आरोपींपैकी तिघांना आर्णी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आर्णी शहरात खुनाची शृंखला सुरू असून, शुल्लक कारणावरून हत्या घडत आहेत. त्यामुळे सर्वसाधारण नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गंभीर प्रकारचे अनेक गुन्हे सतत घडत असल्याने कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे.

जालन्यात ट्रक चालकाची दगडाने ठेचून हत्या

जालन्यातील भोकरदनमधून दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 23 वर्षाच्या ट्रक चालकाची दगडाने डोकं ठेचून हत्या करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. भोकरदन-जालना रोडवरील सोयगाव देवी फाट्यावर ही घटना घडली आहे. भगवान तळेकर असे हत्या करण्यात आलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. गेल्या दोन दिवसांपासून भगवान बेपत्ता होता. अज्ञात मारेकऱ्यांनी आधी दगडाने डोकं ठेचून हत्या केली, त्यानंतर वाळलेल्या कपाशीच्या पऱ्हाट्यामध्ये मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्न केला. या हत्येप्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (A young man was killed over an argument over dancing to a DJ in Yavatmal)

इतर बातम्या

Nanded Death : पोहण्याकरीता गेलेल्या दोन तरूणांचा गोदावरी नदी पात्रात बुडून करूण अंत

Jalna Murder : जालन्यात तरुण ट्रक चालकाची दगडाने डोकं ठेचून हत्या

सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....