थांबले तर होता जीवाला धोका, 1 मिनिटात लग्न मंडपात शुकशुकाट, भरल्या ताटावरुन लहान-थोर उठून पळाले

| Updated on: May 04, 2023 | 8:11 PM

यवतमाळमध्ये लग्न मंडपात घडलेल्या एका घटनेमुळे खळबळ उडाली आहे. संपूर्ण जिल्ह्यात या घटनेवर हळहळ व्यक्त केली जात आहे. या लग्न समारंभात उत्साहाचं आणि चैतन्याचं वातावरण आहे. पण असं काही घडलं की संपूर्ण लग्न मंडपात शुकशुकाट झाला.

थांबले तर होता जीवाला धोका, 1 मिनिटात लग्न मंडपात शुकशुकाट, भरल्या ताटावरुन लहान-थोर उठून पळाले
Follow us on

यवतमाळ : लग्न कार्यक्रमांमध्ये मोठा जल्लोष असतो. सर्वजण आनंदी असतात. प्रत्येकाकडून आनंद व्यक्त केला जातो. लग्नाच्या निमित्ताने अनेकजण आपल्या नातलगांना खूप दिवसांनी भेटतात. अनेकांच्या भेटीगाठी होती. ओळखी वाढतात. लग्न समारंभात इतरांची सोयरिकही जुळते. त्यामुळे सगळीकडे आनंदीआनंद असतो. कुणी ढोल-ताशांच्या तालावर नाचतो. तर कुणी डिजेच्या तालावर अक्षरश: धुमाकूळ घालतो. नवरदेव नवरीसाठी तर हा क्षण खूप अविस्मरणीय असा असतो. पण यवतमाळमध्ये एका लग्न कार्यक्रमात अतिशय वाईट आणि अनपेक्षित घटना घडली आहे.

यवतमाळमध्ये एक धक्कादायक घटना घडली. लग्न कार्य सुरु असताना अचानक मंडपात असलेल्या वऱ्हाडी आणि इतर गावकऱ्यांवर मधमाशांनी हल्ला केला. या हल्ल्यात 50 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. संबंधित घटना ही यवतमाळच्या नेर तालुक्यातील कामनदेवच्या मंदिरात घडली. मधमाशांच्या हल्ल्यानंतर वधू-वर कडील नागरिकांची धावपळ झाली. अनेकांनी नाल्याच्या पाण्यात उडी मारली.

नेमकं काय घडलं?

मधमाशांचा हल्ला झाला त्यावेळी लग्न मंडपात एकच खळबळ उडाली. प्रचंड धावपळ झाली. लग्न लागलेलं होतं. लग्नाला आलेली मंडळी जेवण करत होते. जेवणाच्या पंगती सुरु होत्या. लग्न मंडपात एकीकडे गप्पांचा फड रंगलेला होता. लहान मुलं खेळत होती. वऱ्हाडी जेवण आटोपून घरी परतत होते. तर काहीजण पुढच्या पंगतीत जेवणासाठी बसायचं म्हणून रांग लावत होते. असं असताना अचानक मधमाशांचा हल्ला झाला आणि नंतर हाहाकार उडाला.

हे सुद्धा वाचा

सुरुवातीला मंडपातील लोकांना समजलं नाही. पण नंतर धावपळ झाली तेव्हा सगळ्यांच्या लक्षात आलं. प्रत्येकजण जीव वाचवण्यासाठी पळू लागलं. यावेळी अनेकांची तारांबळ उडाली. पण लग्न मंडपातून बाहेर पडत असताना अनेकांची ससेहोलपट झाली. कारण तोपर्यंत मधमाशांनी अनेकांवर हल्ला केला होता. त्यामुळे काहीजण गंभीर जखमी झाले. अगदी या हल्ल्यातून लहान मुलंही सुटले नाहीत.

मधमाशांची गावात दहशत

या घटनेत लग्नमंडपातून वर, वधूच्या नातेवाईकांनी पळ काढल्याने अन्नाची नासाडी झाली. दोन लहान मुलांसह अनेक महिला गंभीर जखमी झाल्या. तर मधमाशांच्या हल्ल्यानंतर जखमींनी बचावासाठी जंगलात धाव घेतला. संपूर्ण गावात सध्या मधमाशांची दहशत पसरली आहे. लपण्यासाठी वधू कडील नागरिकांनी गावाचा सहारा घेतला. वधू-वरकडील नागरिकांची गावात प्रचंड गर्दी केली.

संबंधित घटना नेमकी कशी झाली? असा प्रश्न आता उपस्थित होतोय. अनेकांकडून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. महत्त्वाचं म्हणजे मंदिरजवळ आग्या मधमाश्यांचा पोळ आहे. तिथे कोणीतरी दगड मारल्याने हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या घटनेवर पंचक्रोशीतून हळहळ व्यक्त केली जात आहे. जखमींवर सध्या उपचार सुरु आहेत.