यवतमाळमध्ये मोठी राजकीय खेळी होण्याचे संकेत, लोकसभेची उमेदवारी थेट ‘या’ नेत्याच्या पत्नीला मिळणार?

लोकसभेच्या निवडणुकीसाठी इच्छुकांची मोठी रांग प्रत्येक पक्षात लागलेली आहे. अनेकांनी तयारीला सुरुवात केली आहे. अनेकांकडून मतदारसंघांमध्ये भेटीगाठी घेतल्या जात आहेत. असं असताना आता यवतमाळमधून मोठी बातमी समोर आली आहे.

यवतमाळमध्ये मोठी राजकीय खेळी होण्याचे संकेत, लोकसभेची उमेदवारी थेट 'या' नेत्याच्या पत्नीला मिळणार?
Follow us
| Updated on: Mar 02, 2024 | 9:32 PM

विवेक गावंडे, Tv9 प्रतिनिधी, यवतमाळ | 2 मार्च 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणात जोरदार हालचाली घडत आहेत. लोकसभेच्या निवडणुकीसाठी इच्छुकांची मोठी रांग प्रत्येक पक्षात लागलेली आहे. अनेकांनी तयारीला सुरुवात केली आहे. अनेकांकडून मतदारसंघांमध्ये भेटीगाठी घेतल्या जात आहेत. तसेच भाजपने आज लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत 195 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. तसेच 34 मंत्री आणि राज्यमंत्र्यांना यामध्ये संधी देण्यात आली आहे. तर एका माजी मुख्यमंत्र्याला संधी देण्यात आली आहे. पण या यादीत महाराष्ट्राच्या एकाही मतदारसंघाबाबत घोषणा करण्यात आलेली नाही.

या दरम्यान यवतमाळमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. यवतमाळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार इंद्रनील नाईक यांच्या पत्नी मोहिनी नाईक यांची नावाची लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीबाबत चर्चा सुरु झालीय. मोहिनी नाईक या भाजपमध्ये प्रवेश करून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची यवतमाळ आणि वाशिममध्ये चर्चा सुरु आहे.

अशा चर्चांमागील नेमकं कारण काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीन दिवसांपूर्वी यवतमाळमध्ये येऊन बचत गटाच्या मेळाव्यात अब की बार 400 पारचा नारा दिला. विशेष म्हणजे पंतप्रधानांच्या स्वागताच्या जाहिरातीत पालकमंत्री संजय राठोड आणि खासदार भावना गवळी यांचा फोटो नसल्याने महायुतीत फुट असल्याचे ढळढळीतपणे दिसून येत असतांना, आता राष्ट्रवादीचे पुसदचे आमदार इंद्रनील नाईक ह्यांच्या पत्नी मोहिनी नाईक हिने पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याचे फोटो सध्या सोशल मीडीयावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

गेल्या काही महिन्यांपासून मोहिनी नाईकांनी यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात संपर्क वाढविण्यावर भर दिला आहेत. त्यामुळे मोहिनी नाईक भाजपमध्ये जाऊन लोकसभा निवडणूक लढवणार तर नाही ना अशी चर्चा सुरू आहेत. शिवाय सोशल मीडियावर त्याचे पोस्टर सुद्धा व्हायरल होत आहेत.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.