गुन्हेगारीतून रेती व्यवसाय, तिथून राजकारणात प्रवेश; अशी झाली अखेर
अनिकेतच्या मृत्यूला कोण जबाबदार आहे. याचा तपास आता पोलीस करत आहेत. फार कमी वयात त्याने यश मिळवले होते. पण, शेवट अतिशय वाईट झाला.
यवतमाळ : बाभूळगाव नगर पंचायत नगरसेवक अनिकेत गावंडे यांची धारधार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. काल मध्यरात्री दरम्यानची ही घटना आहे. रेतीच्या पैशाच्या वादातून हत्या झाल्याची माहिती आहे. 2 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. अनिकेतची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची होती. त्यानंतर त्याने रेती व्यवसायात बाभूळगाव तालुक्यात पाय रोवले होते. नंतर प्रहारकडून नगरपंचायत निवडणूक लढून निवडून आला होता. अनिकेतच्या हत्येने बाभुळगावात खळबळ उडाली आहे.
रेतीच्या वादातून हत्येची शक्यता
नदी तिथं रेती व्यवसाय. या रेती व्यवसायात मोठा नफा मिळतो. त्यातून श्रीमंती लवकर येते, असा काहींचा समज आहे. त्यामुळे रेती व्यवसायात तरुण उतरतात. पण, तिथं खूप स्पर्धा आहे. या स्पर्धेतून वाद-विवाद होत असतात. असाच काहीचा वाद अनिकेतच्या बाबतीत झाल्याची प्राथमिक माहिती आहे. यातून अनिकेतचा जीव गेला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कोण आहे अनिकेत?
अनिकेत हा गुन्हागारी पार्श्वभूमी असलेला युवक. त्याने पैसे कमवण्यासाठी रेती व्यवसायात प्रवेश केला. तिथं प्रचंड स्पर्धा आहे. यातून वादविवाद होत असतात. रेती व्यवसायातून पैसे कमवल्यानंतर अनिकेतने राजकारणात प्रवेश केला. बाभूळगावात नगरपंचायत निवडणूक लढली. त्यात तो विजयी झाला. त्यामुळे राजकीय प्रतिस्पर्धीही वाढले. पण, काल रात्री अचानक अनिकेतवर शस्त्राने वार करण्यात आले. त्यात अनिकेतचा जीव गेला.
अनिकेतच्या मृत्यूला जबाबदार कोण?
अनिकेतच्या मृत्यूला कोण जबाबदार आहे. याचा तपास आता पोलीस करत आहेत. फार कमी वयात त्याने यश मिळवले होते. पण, शेवट अतिशय वाईट झाला. रात्री घडलेल्या या घटनेमुळे बाभुळगावात खळबळ माजली आहे. अनिकेतचे विरोधक कोण होते, याचा शोध आता पोलिसांना घ्यावा लागणार आहे. त्यातून आरोपी सापडण्याची शक्यता आहे.