श्रीरामपूर : घरात लग्नकार्याची धामधूम सुरु असतानाच भावा (Brother)ला हृदयविकाराचा झटका येऊन प्राणाला मुकावे लागल्याची धक्कादायक घटना यवतमाळ जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये घडली आहे. चुलत बहिणीच्या ऐन हळदीच्या कार्यक्रमात भावाचा मृत्यू (Death) झाला. लग्नाच्या आनंदात मृत्यूने वधूच्या भावाचे छत्र हिरावल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. जयस्वाल कुटुंबीयांवर हा दु:खाचा डोंगर कोसळला आहे. भावाने दूरचा प्रवास करून खास बहिणीच्या लग्नासाठी लग्नघर गाठले होते. लाडक्या बहिणीला लग्नाच्या बोहल्यावर चढल्याचे सुख डोळ्यांमध्ये साठवण्याआधीच त्याला मृत्यूने कवटाळले. (In Yavatmal a brother died of a heart attack in his sisters turmeric)
प्रत्येक कुटुंबात कुणाच्याही लग्नाचा सोहळा असला की त्या कुटुंबाच्या आनंदाला पारावर नसतो. त्यासाठी दूरवरचे नातेवाईकही खास वेळ काढून लग्नासाठी अवश्य येतात. श्रीरामपूरच्या जयस्वाल कुटुंबियांसाठीही ही अशाचप्रकारे लग्नाचा धुमधडाका सुरु होता. घरातील लाडकी मुलगी असल्यामुळे जोरदार तयारी झाली होती. पायल मुन्ना जयस्वाल हिचे यवतमाळ येथील शुभम जयस्वाल यांच्याशी लग्न ठरले. बुधवारी या लग्नाचा मुहूर्त. चुलत बहिणीचा मुहूर्त चुकू नये म्हणून पायलचा भाऊ डॉ. सोनल अशोक जयस्वाल (36) हे कोल्हापूरहून आपल्या गावी कुटुंबासह आले होते. हळदीच्या कार्यक्रमासाठीच त्यांनी हजेरी लावली होती. मात्र या कार्यक्रमाचा आनंद लुटतानाच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यातच त्यांची प्राणज्योत मालवली. डॉ. सोनल हे न्यू इंडिया इंन्श्यूरन्स कंपनीच्या कोल्हापूर येथील शाखेत व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते.
बहिणीच्या लग्नानिमित्त तिला लग्नापूर्वीचे कार्य असलेल्या हळदीच्या कार्यक्रमात साडीचोळीचा आहेर भाऊ डॉ. सोनल जयस्वाल यांनी दिला. मात्र ह्याच आनंदाच्या क्षणी डॉ. सोनल यांच्या ह्रदयामध्ये अचानक तीव्र वेदना होऊ लागल्या. त्यामुळे कार्यक्रमात सगळेच हादरले. उपस्थित नातेवाईकांनी त्यांना तत्काळ पुसद येथील ह्रदयरोग तज्ज्ञ डॉ. मनिष पाठक यांच्या इस्पितळात नेले. मात्र दुर्दैवाने उपचारापूर्वीच त्यांचा ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
डॉ. सोनल हे कुटुंबातील कर्ते पुरुष होते. 2010 मध्ये त्यांच्या वडीलांचाही ह्रदयविकाराने मृत्यू झाला होता. डॉ. सोनल यांच्या पार्थिवावर गुरुवारी पुसद येथील हिंदू स्मशानभूमीतील मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई अन्नपूर्णा, पत्नी स्विटी, पाच महिन्यांचा मुलगा, अविवाहित बहिण करीश्मा, विवाहित बहिणी प्रिती रवींद्र जयस्वाल, पुणे येथील दिपाली विक्रम जयस्वाल व काका मुन्ना जयस्वाल आदी नातेवाईक आहेत. (In Yavatmal a brother died of a heart attack in his sisters turmeric)
इतर बातम्या
बॅंकेत नोकरी करतो सांगून महागड्या दुचाकी चोरायचा, बारामती तालुका पोलिसांनी केला भांडाफोड