Yavatmal Crime : यवतमाळमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार, मुलगी 5 महिन्यांची गर्भवती, आरोपी तरुणाला अटक

पीडित विद्यार्थीनीस जेव्हा त्रास होऊ लागला तेव्हा पालकांनी डॉक्टरला नेले. यावेळी ही मुलगी 5 महिन्याची गर्भवती असल्याचे बिंग फुटले. बदनामीच्या धाकाने गर्भपात करण्याचा निर्णय आई वडिलांनी घेतला. मात्र डॉक्टरांनी नकार दिल्यावर प्रकरण पोलिसात गेले.

Yavatmal Crime : यवतमाळमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार, मुलगी 5 महिन्यांची गर्भवती, आरोपी तरुणाला अटक
लग्नाचे रिसेप्शन, वऱ्हाड्यांचा डीजेवर ताल, अचानक तरुण कोसळला
Follow us
| Updated on: Jan 17, 2022 | 9:15 PM

यवतमाळ : नांदेडनंतर आता यवतमाळमध्ये अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराची घटना आज उघडकीस आली आहे. कोरोनामुळे शाळा बंद झाल्याने ऑनलाईन शिक्षणासाठी हाती मोबाईल आला. पालकांनी आपल्या मुलीला पोटाला चिमटा घेऊन अँड्रॉईड मोबाईल घेऊन दिले पण आता यातून घडलेला धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यातूनच एका तरूणाचे एका शाळकरी अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध जुळले आणि ती पिडीत अल्पवयीन मुलगी पाच महिन्यांची गर्भवती राहिल्याचे समोर आले. संबंधित तरुणांवर मारेगांव पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केले आहे. कोरोनाच्या विपरीत परिणामाची आणखी एक घटना आज दिवसभरात उघडकीस आली आहे. (In Yavatmal, a minor girl was sexually abused, the girl was 5 months pregnant)

सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळले प्रेम

सोशल मिडीयाच्या माध्यमातून एका शाळकरी मुलीचे प्रेम जुळून आले व ते शारीरिक संबंधापर्यंत पोहचले यातून ती मुलीला गर्भधारणा झाली असून या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. आता मुला-मुलीच्या हातातील मोबाईलवर पालकांनी काळजीपूर्वक लक्ष देणे गरजेचे झाले आहे. त्या पीडित विद्यार्थीनीस जेव्हा त्रास होऊ लागला तेव्हा पालकांनी डॉक्टरला नेले. यावेळी ही मुलगी 5 महिन्याची गर्भवती असल्याचे बिंग फुटले. बदनामीच्या धाकाने गर्भपात करण्याचा निर्णय आई वडिलांनी घेतला. मात्र डॉक्टरांनी नकार दिल्यावर प्रकरण पोलिसात गेले. पोलीसांनी समुपदेशन करत आरोपी मुलाविरुद्ध गुन्हे नोंद करत त्यास गजाआड केले.

एकंदर सोशल मीडियातून जग जरी जवळ आले असले तरी आपण कुणाशी, किती जवळीक साधावी याची दक्षता विद्यार्थ्यांनी घेणे गरजेचे आहे. पालकांनी ऑनलाईन शिक्षण सुरू असतानाच आपल्या पाल्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आता भासू लागली आहे.

नांदेडमध्येही 11 वर्षाच्या मुलाकडून 10 मुलीवर अत्याचार

कोरोनामुळे शाळकरी मुलाचे ऑनलाईन शिक्षण सुरू असून या प्रकाराचा गंभीर दुष्परिणाम नांदेडमध्ये उघड झालाय. नांदेड जिल्ह्यातील लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अवघ्या 11 वर्षाच्या मुलाने 10 वर्षीय मुलीवर अत्याचार केले आहेत. या मुलाने शेजारच्या मुलीला घराच्या पाठीमागे नेऊन तिच्यावर अत्याचार केलाय. यातील हे दोघेही ऑनलाईन शिक्षण घेत होते. या प्रकरणी पालकांच्या तक्रारीवरून लिंबगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. नकळत्या वयात हातात आलेल्या इंटरनेटच्या सहज उपलब्धतेमुळे कोवळ्या बालमनावर दुष्परिणाम वाढल्याची भीती या घटनेमुळे व्यक्त होतेय. दरम्यान, अशा अनपेक्षित घटनेमुळे पोलीस देखील चक्रावून गेले असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. (In Yavatmal, a minor girl was sexually abused, the girl was 5 months pregnant)

इतर बातम्या

Wardha : वर्धा गर्भपात प्रकरणी आरोग्य विभागाकडून अद्याप तक्रार नाही, आरोग्य विभागाच्या कार्याप्रणालीवर प्रश्नचिन्ह

भयंकर! अकरा वर्षांच्या मुलाचा 10 वर्षांच्या मुलीवर बलात्कार, नांदेडमधील घटनेने खळबळ

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.