सर्वात मोठी बातमी, यवतमाळमध्ये मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात मराठा आंदोलकांचा गोंधळ

यवतामाळमधून मोठी बातमी समोर आलीय. मुख्यमंत्र्यांच्या शासन आपल्या दारी कार्यक्रमात मराठा संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गोंधळ घातला. त्यामुळे कार्यक्रमस्थळी एकच खळबळ उडाली. कार्यकर्ते आक्रमक झाल्यानंतर पोलीसही सतर्क झाले. पोलिसांकडून तातडीने कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली.

सर्वात मोठी बातमी, यवतमाळमध्ये मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात मराठा आंदोलकांचा गोंधळ
Follow us
| Updated on: Oct 30, 2023 | 4:58 PM

यवतमाळ | 30 ऑक्टोबर 2023 :  मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण तापलं आहे. मराठा आंदोलक आता आक्रमक होताना दिसत आहेत. मराठा आंदोलकांनी बीडच्या माझलगाव येथे आमदार प्रकाश सोळंके यांच्या बंगल्याची जाळपोळ केल्यानंतर आता यवतमाळमधून मोठी बातमी आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या निमित्ताने यवतमाळच्या दौऱ्यावर आहेत. या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांच्यासमोर मराठा कार्यकर्ते आक्रमक झाले. मराठा कार्यकर्त्यांनी यावेळी प्रचंड गोंधळ घातला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्या आंदोलकांना तातडीने ताब्यात घेतलं आहे.

एकनाथ शिंदे यवतमाळमध्ये दाखल झाल्यानंतर रस्ते मार्गाने कार्यक्रमस्थळी येत होते. यावेळी काही मराठा संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर कार्यक्रम सुरु झाल्यानंतर कार्यक्रमामध्येच गोंधळ घालण्यात आला. विशेष म्हणजे गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये महिला कार्यकर्त्यांचा देखील समावेश होता. या महिलांकडून राज्य सरकारवर सडकून टीका करण्यात आली. महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली.

एका महिला आंदोलकाने ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. “मुख्यमंत्री जनतेची दिशाभूल करायला आले आहेत”, अशी टीका एका महिलेने केली. तर दुसऱ्या आंदोलक महिलेनेदेखील मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली. आंदोलन करणाऱ्यांमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा देखील समावेश होता. या महिला शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या होत्या, अशी माहिती नंतर समोर आली. त्यामुळे मराठा संघटनांच्या कार्यकर्त्यांसह ठाकरे गटाचे कार्यकर्ते देखील या कार्यक्रमात आक्रमक झालेले बघायला मिळाले.

ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्याला मराठा संघटनांच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मुख्यमंत्री कार्यक्रमस्थळी दाखल झाले. मुख्यमंत्री मंचावर पोहोचले. यावेळी काही कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी सुरु झाली. त्यानंतर जोरदार गोंधळ उडाला. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजीच सुरु केली.

ठाकरे गटाचे कार्यकर्ते कार्यक्रमस्थळी हातात शेतमालाला भाव मिळावा, असं लिहिलेले काळे फलक घेऊन दाखल झाले होते. कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते. कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या सर्व कार्यकर्त्यांची धरपकड मोहीम पोलिसांनी राबवली. सर्व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.