मोदी आवास योजनेतंर्गत यवतमाळमध्ये किती लाख कुटुंबांना घर मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी दिली माहिती

"माननीय पंतप्रधान नेहमी म्हणतात, केवळ चारच जाती आहेत. महिला, युवा, किसान, गरीब या चार जाती आहेत. या चारही जातींना समर्पित कार्यक्रम आहे. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये शेतकरी सन्मान योजनेतंर्गत दोन्ही योजनांचे मिळून 4700 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत"

मोदी आवास योजनेतंर्गत यवतमाळमध्ये किती लाख कुटुंबांना घर मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी दिली माहिती
Devendra Fadnavis
Follow us
| Updated on: Feb 28, 2024 | 6:37 PM

यवतमाळ : “पंतप्रधान नरेंद्र मोदी अखिल विश्वातील लोकप्रिय नेते आहेत. आज आनंदाचा दिवस आहे. ज्या यवतमाळमध्ये महाराष्ट्रातल एकमेव सीतामातेच मंदिर आहे. त्याच यवतमाळमध्ये नारी शक्ती वंदनेचा कार्यक्रम होतोय. पंतप्रधान उपस्थित आहेत. त्यांच्या हातून साडेपाच लाख बचतगटाना निधी देऊन महिला सक्षमीकरणाची सुरुवात या ठिकाणहून आपण करतोय. ही आनंदाची बाब आहे” असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“राज्य शासनाने लेक लाडकी योजना, महिलांना एसटीमध्ये सवलत देण्याची योजना सुरु केली. आज ही नवीन योजना सुरु करतोय. महिला सक्षमीकरणासाठी आपण प्रयत्न करतोय. माननीय पंतप्रधान नेहमी म्हणतात, केवळ चारच जाती आहेत. महिला, युवा, किसान, गरीब या चार जाती आहेत. या चारही जातींना समर्पित कार्यक्रम आहे. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये शेतकरी सन्मान योजनेतंर्गत दोन्ही योजनांचे मिळून 4700 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत. यासाठी मोदींचे आभार मानतो” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

किती लाख कुटुंबाना घर देणार?

“मोदी आवास योजनेची यवतमाळमध्ये सुरुवात होतेय. ओबीसी, भटके विमुक्त 1O लाख कुटुंबांना मोदी आवास योजनेतंर्गत स्वत:च घर देणार आहोत. नारी शक्ती वंदनेचा कार्यक्रम असल्यामुळे घरातल्या पुरुषासोबतच महिलेची नाव देखील मालकी हक्कामध्ये देण्याच प्रयत्न असेल. मोदी आवास आहे, महिलांना त्यांचा अधिकार मिळाला पाहिजे. त्यासाठी प्रयत्न करणार आहोत” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Non Stop LIVE Update
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?.
शिंदे हेच मुख्यमंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं विधान
शिंदे हेच मुख्यमंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं विधान.
राज्यात कोणाचं पारडं जडं? सरकार कोणाचं येणार? काय सांगतोय एक्झिट पोल?
राज्यात कोणाचं पारडं जडं? सरकार कोणाचं येणार? काय सांगतोय एक्झिट पोल?.
पवारांसोबत शिंदे गेले तर..., शिरसाटांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
पवारांसोबत शिंदे गेले तर..., शिरसाटांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या.
...तर महाराष्ट्रात पुन्हा राष्ट्रपती राजवट? सत्तेसाठी फक्त 48 तास अन्
...तर महाराष्ट्रात पुन्हा राष्ट्रपती राजवट? सत्तेसाठी फक्त 48 तास अन्.
लाडक्या बहिणीनी कोणाला निवडल? जुन्या भावांना की नवा वायदा करणाऱ्यांना?
लाडक्या बहिणीनी कोणाला निवडल? जुन्या भावांना की नवा वायदा करणाऱ्यांना?.
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा.
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?.