अनोखा संघर्षः साळींदरच्या हल्ल्यात बिबट्याचा मृत्यू; यवतमाळ जिल्ह्यातील घटना; जीव वाचवण्यात साळिंदर समर्थ

यवतमाळः यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील सोनवाढोणा ते बोरगाव रस्त्यावर शेताच्या धुऱ्या लगत साळींदर (Porcupine) व नर बिबट्याचा (Leopard) जोरदार संघर्ष झाला. या झटापटीत साळींदरचे काटे बिबट्याच्या चेहऱ्यावर मोठ्या प्रमाणात आत घुसल्यामुळे रक्तस्राव होऊन बिबट्याचा मृत्यू झाल्याची अनोखी घटना घडली. नेर तालुक्यातील (Ner Taluka) सोनवाढोणा ते बोरगाव रस्त्यावर एक बिबट्या आज दुपारच्या सुमारास मृतावस्थेत आढळून आला. या […]

अनोखा संघर्षः साळींदरच्या हल्ल्यात बिबट्याचा मृत्यू; यवतमाळ जिल्ह्यातील घटना; जीव वाचवण्यात साळिंदर समर्थ
Leopard YawatmalImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Feb 28, 2022 | 8:42 PM

यवतमाळः यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील सोनवाढोणा ते बोरगाव रस्त्यावर शेताच्या धुऱ्या लगत साळींदर (Porcupine) व नर बिबट्याचा (Leopard) जोरदार संघर्ष झाला. या झटापटीत साळींदरचे काटे बिबट्याच्या चेहऱ्यावर मोठ्या प्रमाणात आत घुसल्यामुळे रक्तस्राव होऊन बिबट्याचा मृत्यू झाल्याची अनोखी घटना घडली. नेर तालुक्यातील (Ner Taluka) सोनवाढोणा ते बोरगाव रस्त्यावर एक बिबट्या आज दुपारच्या सुमारास मृतावस्थेत आढळून आला. या मार्गावर ठार झालेल्या बिबट्याची माहिती येथील ग्रामस्थांनी ही माहिती वन विभागाला दिली. ठार झालेल्या बिबट्याची माहिती मिळाल्यानंतर नेर वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद कोहळे आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी तात्काळ दाखल झाले.

वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पाहणी केल्यानंतर ज्या ठिकाणी बिबट्या मरुन पडला होता, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रक्त सांडले होते. पळसाच्या झाडाच्या वाळलेल्या पानावर बिबट्याच्या रक्ताचे डाग दिसून आले. अधिकाऱ्यांनी पाहणी केल्यानंतर घटनास्थली साळींदरचे काटे सर्वत्र विखुरले होते.

साळींदरचे काटे बिबट्याच्या चेहऱ्यावर घुसले

रात्री हा बिबट्या व साळींदरची शिकार करत असताना त्यांच्या संघर्ष झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बिबट्या आणि साळींदर यांच्या या संघर्षात साळींदरचे काटे बिबट्याच्या डोक्यावर व चेहऱ्यावर घुसले होते. तब्बल 17 काटे बिबट्याच्या चेहऱ्यावर व डोक्यावर आढळून आले आहेत.

रक्तस्त्राव होऊन बिबट्याचा मृत्यू

साळींदरने बिबट्याच्या चेहऱ्यावर काट्याने हल्ला केल्यानंतर व साळींदरच्या काट्यापासून बचाव करण्यासाठी म्हणून बिबट्याने स्वतःचा चेहरा, डोके जमिनीवर घासण्याचा प्रयत्न केला. त्यातून सुटका करुन घेण्यासाठी केलेल्या प्रयत्नामुळेच साळींदरचे काटे आणखी खोलवर रुतल्यामुळे रक्तस्त्राव होऊन बिबट्याचा मृत्यू झाला.

साळिंदर जीव वाचवण्यात समर्थ

बिबट्याचा साळिंदरच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर त्या ठिकाणची पाहणी करण्यात आली त्यावेळी त्या ठिकाणांपासून जवळच त्याचा आदिवास असल्याचे दिसून आले. या अनोख्या संघर्षात साळिंदर सारखा छोटा प्राणी आपला जीव वाचवण्यात समर्थ ठरला तर बलाढ्य बिबट्याला मात्र आपले प्राण गमवावे लागले.

सदर बिबट्याचे शवविच्छेदन केले असता त्याने अलीकडेच रोह्याच्या पिल्लाची शिकार केल्याचे दिसून आले. यासोबतच सतरा ठिकाणी चेहऱ्यावर काट्याच्या खोलवर जखमा व मागील पायाच्या मांडीत साडेचार इंच खोल काटा आढळून आला. उंच लांब सडक हा नर बिबट्या सात ते आठ वर्षे वयाचा परिपक्व आहे. बिबट्याच्या मृत्यूची बातमी कळतात उपवनसंरक्षक केशव वाभळे घटनास्थळी तात्काळ दाखल झाले.

संबंधित बातम्या

क्षीरसागर यांना सत्तेचा माज आला, गोळीबार प्रकरणी विनायक मेटेंचा घणाघात

Pankaja Munde : पंकजा मुंडे यांचं दिलीप वळसे पाटील यांना पत्र, बीडच्या कायदा-सुव्यवस्थेवर विशेष बैठक बोलावण्याची मागणी

…आता विद्युत जामवाल शोधणार ‘इंडियाज अल्टीमेट वॉरियर’; आणखी चार कलाकार दिसणार आहेत खास ‘अ‍ॅक्शन’ मध्ये

बीड सरपंच हत्या प्रकरणात 8 आरोपींवर मकोका, पण मकोका म्हणजे नेमकं काय?
बीड सरपंच हत्या प्रकरणात 8 आरोपींवर मकोका, पण मकोका म्हणजे नेमकं काय?.
वायदा अन् सत्ता आल्यानंतर युटर्न, फडणवीसांचा 'तो' वादा दादा विसरले?
वायदा अन् सत्ता आल्यानंतर युटर्न, फडणवीसांचा 'तो' वादा दादा विसरले?.
मंत्री धनंजय मुंडेंवर गुन्हा का नाही? खंडणीप्रकरणात सुरेश धसांचा सवाल
मंत्री धनंजय मुंडेंवर गुन्हा का नाही? खंडणीप्रकरणात सुरेश धसांचा सवाल.
एका गुन्ह्यात अटक अन् कराडचे अनेक गुन्हे उघड, 140 शेतकऱ्यांना चुना?
एका गुन्ह्यात अटक अन् कराडचे अनेक गुन्हे उघड, 140 शेतकऱ्यांना चुना?.
बीड सरपंच हत्या प्रकरणात 8 जणांवर मकोको पण वाल्मिक कराडच सुटला!
बीड सरपंच हत्या प्रकरणात 8 जणांवर मकोको पण वाल्मिक कराडच सुटला!.
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड.
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले.
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे.
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ.
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले..
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले...