AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना, यवतमाळमध्ये शिवसेनेची भाजपसोबत युती

शिवसेनेने भाजपसोबत हातमिळवणी करीत हा विजय मिळवला आहे. तर काँग्रेसच्या दोन नगरसेवकांनी मतदानास अनुपस्थित राहून सेनेला मदत केले आहे. तर दुसरीकडे मारेगावसह झरी नगरपंचायतीमध्ये शिवसेनेने जंगोम दलासोबत युती करत कॉग्रेसला सत्तेपासून दूर ठेवले.

तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना, यवतमाळमध्ये शिवसेनेची भाजपसोबत युती
सेनेचा भाजपशी घरोबा
Follow us
| Updated on: Feb 14, 2022 | 3:32 PM

यवतमाळ : जिल्ह्यातील , बाभूळगाव, मारेगाव , महागाव, झरी या नगरपंचायतीवर (Nagarpanchayat Elections) शिवसेनेचा (Shivsena) भगवा फडकला तर राळेगाव आणि कळंब नगरपंचायत काँग्रेसच्या (Congress) ताब्यात गेली आहे. बाभूळगाव मधून शिवसेनेचे संगीताताई मालखुरे, मारेगावमध्ये शिवसेनेचे डॉ. मनीष मास्की, महागावमध्ये करुणा नारायण शिरभिरे आणि झरी नगर पंचायतीमध्ये ज्योती संजय बिचकूलवर यांची नगराध्यक्षपदी वर्णी लागली आहे. तर राळेगावमधून काँग्रेसचे रवींद्र शेराम आणि कळंबमध्ये अफरोझ बेगम फारूक सिद्दीकी यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली आहे. निवडणुकीनंतर शिवसेना आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि एकमेकांना पेढे भरवून जल्लोष साजरा केला. मारेगाव नगरपंचायतीवर काँग्रेसची सत्ता येण्याची फक्त औपचारिकता बाकी असताना शिवसेनेने काँग्रेसला धोबिपछाड देत मारेगाव नगरपंचायतीवर भगवा फडकवला आहे. शिवसेनेचे डॉ. मनिष तुळशीराम मस्की हे मारेगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष म्हणून निवडून आले. 8 विरुद्ध 7 मतांनी शिवसेनेने काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार नंदेश्वर आसुटकर यांचा पराभव केला.

शिवसेनेची भाजपशी हातमिळवणी

विशेष म्हणजे शिवसेनेने भाजपसोबत हातमिळवणी करीत हा विजय मिळवला आहे. तर काँग्रेसच्या दोन नगरसेवकांनी मतदानास अनुपस्थित राहून सेनेला मदत केले आहे. तर दुसरीकडे मारेगावसह झरी नगरपंचायतीमध्ये शिवसेनेने जंगोम दलासोबत युती करत कॉग्रेसला सत्तेपासून दूर ठेवले. झरी नगरपंचायत. मारेगाव नगरपंचायतीवर भगवा फडकल्याने माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या मुसद्दी राजकारणाचा हा विजय मानला जात आहे. तर दोन्ही नगरपंचायतील हाती आलेली सत्ता गेल्याने काँग्रेसचा हा मोठा पराभव मानला जात आहे. तर महागावमध्ये शिवसेनेने थेट भाजपशी घरोबा करत, भाजपचे समर्थन घेत महागाव नगरपंचायतीत संख्याबळ जुळवून आणले आहे. आज झालेल्या 6 नगरपंचायत, नगराध्यक्षाच्या निवडणुकीत 4 जागेवर शिवसेनेचे नगराध्यक्ष निवडून आले. त्यापैकी महागाव आणि मारेगावमध्ये शिवसेना-भाजपाची युती झाली. काँग्रेसच्या नेत्यांनी या निवडणुकीत शिवसेनेला सत्तेपासून दुरु ठेवण्याचा प्रयत्न केला असून सेनेशी बेईमानी केल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी केला आहे.

पुन्हा अंतर्गत धुसफूस बाहेर

महाविकास आघाडीत अंतर्गत धुसफूस असल्यामुळे शिवसेनेने आमच्याकडे प्रस्ताव सत्ता स्थापने बाबत प्रस्ताव मांडला. आम्ही एकाविचार धारेचे असल्याने आम्ही शिवसेनेसोबत गेलो असे भाजप जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांनी सांगितले. राज्यात महाविकास आघाडी असताना यवतमाळ जिल्ह्यात नगरपंचायत निवडणुकीत मात्र महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं दिसून येत आहे. राज्यात पहिल्यादा भाजप सोबत सेनेने घरोबा केल्याचे या निवडणुकीत दिसून आले. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद, नगर परिषद निवडणूकित सुद्धा हाच फॉर्मुला राबवून शिवसेना सत्तेत येते का? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

कुडाळमध्ये कमाल! 17 पैकी 8 जागांवर भाजप, 7 जागा शिवसेनेला, तरी नगराध्यक्षपद मात्र काँग्रेसकडे

फुले दाम्पत्यांनी सांगितलं धर्माधर्मामध्ये भांडणं लावू नका, आपण फक्त बोलतो, पण पाळणार कोण?; मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांसमोर सवाल

Video | काँग्रेसचे घडीभराचे टशन खत्म; अन् ‘सागर’मध्ये हास्य, विनोद, गप्पांची मैफल सुरू…!

शोपियानमध्ये ठार केलेल्या 2 दहशतवाद्यांची ओळख पटली
शोपियानमध्ये ठार केलेल्या 2 दहशतवाद्यांची ओळख पटली.
ऑपरेशन सिंदूरचा हिरो, ज्याच्यामुळे पाकला फुटला घाम, अमरप्रीत सिंग कोण?
ऑपरेशन सिंदूरचा हिरो, ज्याच्यामुळे पाकला फुटला घाम, अमरप्रीत सिंग कोण?.
मुख्यमंत्री फडणवीसांचा नांदेडच्या शहीद जवानांच्या कुटुंबियांना फोन
मुख्यमंत्री फडणवीसांचा नांदेडच्या शहीद जवानांच्या कुटुंबियांना फोन.
पाकचा ड्रोन हल्ला उधळला, ड्रोनचे भाग छतावर; घराचं नुकसान...व्हिडीओ बघा
पाकचा ड्रोन हल्ला उधळला, ड्रोनचे भाग छतावर; घराचं नुकसान...व्हिडीओ बघा.
वर्षभराच्या चिमूकल्याला घरी सोडून आई सीमेवर रवाना
वर्षभराच्या चिमूकल्याला घरी सोडून आई सीमेवर रवाना.
CSMTला क्लिनिंग मशीन ट्रॅकवर अन् मोटारमॅनने जागीच थांबवली ट्रेन...
CSMTला क्लिनिंग मशीन ट्रॅकवर अन् मोटारमॅनने जागीच थांबवली ट्रेन....
पंतप्रधान मोदी थेट आदमपूर एअर बेसवर पोहोचले, त्यानंतर..
पंतप्रधान मोदी थेट आदमपूर एअर बेसवर पोहोचले, त्यानंतर...
भारताकडे आता रशियाची S-500 मिसाईल सिस्टीम, S-400 पेक्षा खतरनाक
भारताकडे आता रशियाची S-500 मिसाईल सिस्टीम, S-400 पेक्षा खतरनाक.
...तर ते अ‍ॅक्ट ऑफ वॉर, सिंधू जल करारावरुन पाक मंत्री पुन्हा बरळला
...तर ते अ‍ॅक्ट ऑफ वॉर, सिंधू जल करारावरुन पाक मंत्री पुन्हा बरळला.
अवकाळीचा फटका; भाज्यांच्या दराने गाठली शंभरी, गृहीणींचं बजेट कोलडलं
अवकाळीचा फटका; भाज्यांच्या दराने गाठली शंभरी, गृहीणींचं बजेट कोलडलं.