Yavatmal Children Death : यवतमाळमध्ये काळीज चिरणारी घटना, भावाला झोका देत होती चिमुकली अन् सिमेंटचा खांब कोसळला

सकाळी 11 वाजता घुक्से यांची मोठी मुलगी प्राची ही शाळा आटोपून शेतात आली. भूक लागल्याने आईला जेवण देण्याची विनंती तिने केली. मात्र आई तेजसला झोका दे असे म्हणून पाणी आणण्यासाठी घरात गेली. तितक्यात ज्याला झोका बांधला होता तो सिमेंटचा निकृष्ट दर्जाचा खांब अचानक तुटून प्राचीच्या डोक्यावर पडला.

Yavatmal Children Death : यवतमाळमध्ये काळीज चिरणारी घटना, भावाला झोका देत होती चिमुकली अन् सिमेंटचा खांब कोसळला
प्राची घुक्से आणि तेजस घुक्सेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 23, 2022 | 9:17 PM

यवतमाळ : सहा महिन्यांच्या भावाला पाळण्यात झोका देत असतानाच अचानक सिमेंटचा खांब अंगावर कोसळला आणि दोन्ही बहिण-भावा (Brother-Sister)चा दुर्दैवी मृत्यू (Death) झाल्याची धक्कादायक घटना यवतमाळमध्ये घडली आहे. या घटनेमुळे घुक्से परिवारावर दुखःचा डोंगर कोसळला आहे. या दुर्घटनेनंतर दोन्ही चिमुरड्यांना तात्काळ खाडगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी नऊ वर्षाच्या मुलीचा मृत्यू सांगितले तर सहा महिन्याच्या भावाला नांदेड येथील रुग्णालयात रेफर करण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहचण्याआधी वाटेतच त्याची प्राणज्योत मालवली. प्राची विजय घुक्से (9) आणि तेजस विजय घुक्से (6 महिने) अशी मयत भावंडांची नावे आहेत. (Sister’s brother dies after cement pillar collapses in Yavatmal)

पाळणा हा प्रत्येक बाळाला आवडतो. चिमुकली लेकरं पाळण्यात टाकताच झोपी जातात. मात्र हाच पाळणा दोन चिमुकल्यांच्या जीवावर उठला आहे. पाळण्यामुळेच आज सहा महिन्यांचा तेजस व नऊ वर्षाची प्राची यांनी जगाचा निरोप घेतला आहे.

मुलीला झोका देण्यास सांगून पाणी आणण्यास गेली होती आई

यवतमाळमधील पुसद येथे विजय घुक्से हे आपल्या कुटुंबासोबत राहतात. घुक्से कुटुंब शेतकरी आहे. विजय यांना 4 अपत्य आहेत. घुक्से यांचे लक्ष्मीनगर येथे शेत आहे. याच शेतात प्राचीचे वडील विजय घुक्से हे गाजर काढण्याचे काम करीत होते. तर आई सारिका ही सहा महिन्याच्या तेजसला साडीने बांधलेल्या पाळण्याने झोका देत होती. सकाळी 11 वाजता घुक्से यांची मोठी मुलगी प्राची ही शाळा आटोपून शेतात आली. भूक लागल्याने आईला जेवण देण्याची विनंती तिने केली. मात्र आई तेजसला झोका दे असे म्हणून पाणी आणण्यासाठी घरात गेली. तितक्यात ज्याला झोका बांधला होता तो सिमेंटचा निकृष्ट दर्जाचा खांब अचानक तुटून प्राचीच्या डोक्यावर पडला. त्यामुळे प्राची बेशुद्ध झाली. तर तेजस हा लहानगा जोरात बाजूला फेकला गेला.

उपाचारापूर्वीच जखमी भावंडांचा दुर्दैवी मृत्यू झाला

आई सारिका ही पाणी घेऊन बाहेर आली असता घडला प्रकार पाहून तिने आरडाओरड केली. सारीकाचा ओरडण्याचा आवाज ऐकून वडील विजय धावत आले. त्यांनी दोन्ही चिमुकल्यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात उपचारार्थ नेण्यात आले. डॉक्टरांनी प्राचीला मृत घोषित केले तर तेजसला नांदेड येथे रेफर करण्यात आले. मात्र वाटेतच त्याचीही प्राणज्योत मालवली. या दुर्दैवी घटनेमुळे घुक्से कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. (Sister’s brother dies after cement pillar collapses in Yavatmal)

इतर बातम्या

CCTV Video: समोरुन सुपरफास्ट एक्स्प्रेस आली अन् त्यानं थेट उडी घेतली, जवानानं जे केलं त्याला ‘धाडस’ म्हणतात

Video : नांदेडमध्ये माजी उपसरपंच आणि शालेय शिक्षण समिती अध्यक्षामध्ये फ्री स्टाईल हाणामारी

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.