“आमचा बाप चोरला, पक्ष चोरला आणि चिन्हंही चोरलं”; ‘या’ नेत्यानं संजय राऊत यांच्या वक्तव्याचे समर्थन केले
आमचा बाप चोरला, पक्ष चोरला, चिन्ह चोरले, त्यामुळे संजय राऊत जे बोलले आहेत ते योग्यच बोलले आहेत असं म्हणत त्यांनी त्यांचे समर्थन केले आहे.
यवतमाळ : राज्यात एकीकडे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे तर दुसरीकडे ठाकरे गटाची शिवगर्जना यात्रा जोरदारपणे सुरू आहे. शिवगर्जना यात्रेतून विविध भागातील कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधला जात असला तरी या यात्रेतून सरकावर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. आज ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी शिवसेनेतील आमदार संजय राठोड यांच्यावर जोरदार प्रहार केला आहे. आमदार संजय राठोड यांच्यावर टीका करताना चंद्रकां खैरे म्हणाले की, संजय राठोड महसूल राज्यमंत्री असताना हेरिंग लावायचे पैसे घेत होते.
मी काम घेऊन गेलेलो असताना एका शिवसैनिकांचे तेव्हा त्याने पैसे घेतल्याशिवाय काम केले नाही असा गंभीर आरोपही चंद्रकांत खैरे यांनी त्यांच्यावर केलाआहे.
महाविकास आघाडीचे सरकार असताना त्यावेळी एका तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात राज्यमंत्री संजय राठोड यांचे नाव घेतले जात होते. त्यावेळी भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी त्यांच्या जोरदार हल्लाबोल केला होता.
त्यांना शिक्षा करण्याची मागणीही चित्रा वाघ यांनी केली होती. त्यावरून आता चंद्रकांत खैरे यांनी यांनी चित्रा वाघ आणि संजय राठोड यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. आता चित्रा वाघ कुठे आहेत त्या का बोलत नाही असा सवाल चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.
आमदार संजय राठोडसारख्या अनेक नेत्यांवर वेगवेगळ्या प्रकारेच आरोप करण्यात आले आहेत. मात्र त्याकडे भाजपने डोळेझाक केली आहे.
भाजपमध्ये नसणाऱ्या नेत्यांची मात्र चौकशी लावण्याचे काम हे भाजपमधील नेते, मंत्री करत असल्याची टीका चंद्रकांत खैरे यांनी केली आहे. संजय राठोड यांच्यावर टीका करताना त्यांनी भाजपवरही निशाणा साधला आहे. यावेळी ते म्हणाले की, भाजप सोबत गेल्यावर हे लोक पवित्र झाले का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
आमदार संजय राठोड यांच्याबरोबरच आमची कन्या भावना गवळी ही सुद्धा पवित्र झाली का असा खोचक सवालही राठोड यांनी उपस्थित केला आहे.
तर संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारव आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर टीका करताना त्यांनी चोरमंडळ असं वक्तव्य केले होते. त्यावरून जोरदार खडाजंगी सुरू झाली आहे.
त्यांच्या या वक्तव्यावरूनच त्यांच्यावर हक्कभंगाची कारवाई करा अशी मागणी सत्ताधाऱ्यांमधील नेत्यांनी केली आहे. त्यांच्याबद्दल बोलताना चंद्रकांत खैरे म्हणाले की, संजय राऊत बोलले आहेत ते योग्यच बोलले आहेत.
आमचा बाप चोरला, पक्ष चोरला, चिन्ह चोरले, त्यामुळे संजय राऊत जे बोलले आहेत ते योग्यच बोलले आहेत असं म्हणत त्यांनी त्यांचे समर्थन केले आहे. संजय राऊत यांच्यावर हक्कभंगाच्या कारवाईची मागणी केली असली तरी संजय राऊत हे हक्कभंगला घाबरत नाहीत असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.