Video : अनोखी वरात! शेतकरी पुत्राची वडस्कर कुटुंबानं काढली ट्रॅक्टरवरून वरात, यवतमाळातल्या लग्नाची चर्चा
यवतमाळ : यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातील झरीजामनीमध्ये असा विवाह (Wedding) संपन्न झाला, की शुभम वडस्कर या शेतकरी पुत्राने आपली वरात ट्रॅक्टरवर (Tractor) काढली. या विवाहाची चर्चा पंचक्रोशीत होत आहे.
यवतमाळ : यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातील झरीजामनीमध्ये असा विवाह (Marriage) संपन्न झाला, की शुभम वडस्कर या शेतकरी पुत्राने आपली वरात ट्रॅक्टरवर (Tractor) काढली. मुलगा शेतीचे काम करतो, म्हणून नवरदेवाची गाडी म्हणून चक्क वडस्कर यांनी शेतीची मशागत करणारा आपल्या घरचा ट्रॅक्टर आणला व त्यावरूनच वरात काढली. ट्रॅक्टरला सजवून त्यावरून नवऱ्या मुलीलासुद्धा घरी आणण्यात आले. शुभम वडस्कर याचा विवाह रवीना रेकलवार हिच्याशी मोठ्या थाटात पार पडला. या विवाहाची चर्चा पंचक्रोशीत होत आहे. शेतकरी असल्याने अस्सल ग्रामीण पद्धतीनेच लग्नसोहळा थाटात पार पडला. कोणताही बडेजावपणा न करता, शेतीशी प्रामाणिक राहत ज्यावर आपले पोट भरते अशा साधनाचा वापर या लग्नात करण्यात आला होता.
काहीतरी हटके…
सध्या लग्नसराई आहे. प्रत्येक लग्न करू इच्छिणारा व्यक्ती मग तो श्रीमंत असो की गरीब. आपले लग्न थाटामाटातच व्हावे, अशी इच्छा बाळगून असतो. लग्न संस्मरणीय व्हावे, याकरता वेगवेगळे मार्ग अवलंबले जातात. कुणी एखाद्या भव्य अशा ठिकाणी लग्न करायचे ठरवतो. कुणी हवेत तर कुणी जमिनीच्या खाली, कुणी पाण्यात. उद्देश एकच असतो, की काहीतरी हटके व्हावे आणि आपले लग्न सर्वांच्या लक्षात राहावे. काही जण यापलिकडे विचार करतात. कधी कधी साधेपणाने केलेले लग्नही सर्वांच्या लक्षात राहते.
साधेपणाने लग्न
हाच साधेपणा वडस्कर कुटुंबाने जपला आहे. एक तर कोरोनाने सर्वत्र सर्वांनाच हैराण केले आहे. लग्नसोहळे साधेपणाने करण्याचे आवाहनही केले जात आहे. गर्दी न जमवता ठराविक लोकांमध्ये विवाहसोहळे करण्याचे सांगण्यात येत आहे. अशात वडस्कर कुटुंबाने केलेला विवाहसोहळा आदर्शवतच आहे. त्याची चर्चाही आता सर्वत्र होतेय.
आणखी वाचा :