Yavatmal : कुलरचा शॉक लागून चौथीत शिकणाऱ्या संकल्पचा जागीच मृत्यू! यवतमाळमधील दुर्दैवी घटना

Yavatmal Cooler Death: कुटुंबातील एकुलत्या एक मुलाचा कुलरचा शॉक लागून दुर्दैवी अंत झाला आहे.

Yavatmal : कुलरचा शॉक लागून चौथीत शिकणाऱ्या संकल्पचा जागीच मृत्यू! यवतमाळमधील दुर्दैवी घटना
बारा वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यूImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 21, 2022 | 8:02 AM

यवतामाळ : यवतमाळमध्ये (Yavatmal News) कुलरचा शॉक (Cooler electrict shock) लागून एका 12 वर्षांच्या चिमुरड्यानं जीव गमावला आहे. विदर्भात पारा कमालीचा वाढलेला आहे. लोकांना घामाच्या धारा लागल्यात. अशाच दिलासा मिळावा, म्हणून लोकांकडून कुलरा वापर होणं स्वाभाविक आहे. मात्र कुलर वापरताना काळजी न घेतल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात, असं वारंवार पाहायला मिळतंय. यवतमाळमध्ये घडलेल्या घटनेनं हीच बाब पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. एका 12 वर्षांच्या मुलाच्या मृत्यूनं आई-वडिलांना मोठा धक्का बसला आहे. तर संपूर्ण गावावरही शोककळा पसरली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील बाबुळगाव तालुक्यात (Yavatmal District Babulgaon Taluka) ही घटना घडली. बाबुळगाव तालुक्यामधील सावर या गावामध्ये राहणाऱ्या ढवळे कुटुंबातील एकुलत्या एक मुलाचा कुलरचा शॉक लागून दुर्दैवी अंत झाला आहे. त्यामुळे हळहळ व्यक्त केली जाते आहे.

साफसफाई करताना शॉक…

सावर गावातील ढवळे दाम्पत्याला एकुलता एक मुलगा होता. संकल्प अमोल ढवले हा 12 वर्षांचा मुलगा चौथीत शिकत होता. घरी कुलर साफ करण्याच्या उद्देशानं संकल्प कामाला लागला. पण चालू कुलर साफ करणं त्याच्या जीवावर बेतलं. चालू कुलरच्या पाण्याची साफसफाई करताना संकल्पला करंट लागला. त्यात संकल्पचा जागीच मृत्यू झाल्याचं सांगितलं जातंय.

संकल्पला शॉक लागल्यानंतर लगेचच शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं. त्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलंय. एकुलता एक मुलगा गमावल्यानं संकल्पच्या आई-वडिलांवर शोककळा पसरली आहे. तर गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते आहे.

5 वर्षांच्या चिमुरड्याचाही मृत्यू

दरम्यान, 7 एप्रिल रोजी एका पाच वर्षांच्या चिमुरड्याचाही कुलरचा शॉक लागून मृत्यू झाला होता. चंद्रपुरात ही घटना घडली होती. दुपारी खेळत असतेवेळी कुलरला पाच वर्षांच्या मुलाचा हात लागला. कुलरच्या स्टँन्डला हात लागल्यामुळे हा चिमुरडा जागीच कोसळला. या घटनांमुळे विद्युत उपकरणांपासून लहान मुलांना लांब ठेवणं अत्यंत गरजेचं असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.

विदर्भात सूर्याची आग….

विदर्भात सूर्य आग ओकतोय. विदर्भात पार चाळीसच्या पार गेलेला आहे. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांतील तापमान ही 40 पेक्षा जास्त असल्यानं लोकांना कुलर, एसी आणि पंख्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय राहिलेला नाही. मात्र कुलर वापरत असताना सतर्कता आणि खबरदारी बाळगणं, तसंच या उपकरणांपासून लहान मुलांना दूर ठेवणं आवश्यक आहे.

यवमाळमधील इतर घडामोडी :

Yavatmal Accident | आईवडिलांकडे बाळंतपणासाठी जात होती, खड्ड्यांनी घेतला बाळ-बाळंतिणीचा जीव

वणीतील रॅलीत कुत्रा भगव्या वस्त्रात; विजय चोरडियांच्या कुत्र्याचा भगव्या वस्त्रात सहभाग

संजय राठोडांच्या कॅबिनेटमध्ये कमबॅकसाठी बंजारा समाज आक्रमक, आंदोलन न करण्याचं राठोडांचं आवाहन

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.