शरद पवार सुनेला बाहेरचं म्हणतात अन् उध्दव ठाकरे…; यवतमाळमधून देवेंद्र फडणवीसांचा मविआला खोचक टोला

Devendra Fadnavis on Sharad Pawar Uddhav Thackeray and Loksabha Election 2024 : देवेंद्र फडणवीसांचा मविआला खोचक टोला; म्हणाले, शरद पवार सुनेला... उद्धव ठाकरे यांचंही नाव घेत देवेंद्र फडणवीस यांनी टीकास्त्र डागलं आहे. फडणवीस काय म्हणाले? वाचा सविस्तर...

शरद पवार सुनेला बाहेरचं म्हणतात अन् उध्दव ठाकरे...; यवतमाळमधून देवेंद्र फडणवीसांचा मविआला खोचक टोला
Follow us
| Updated on: Apr 21, 2024 | 8:02 PM

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज यवतमाळमध्ये सभा होत आहे. राजश्री पाटील यांच्या प्रचारासाठी सुरु असलेल्या या जाहीर सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचं नाव घेत त्यांनी खोचक टोला लगावला आहे. अजित पवार यांनी बारामतीत बोलताना आधी लेकीला संधी दिली. आता सुनेला संधी द्या, असं म्हटलं होतं. त्याबाबत विचारता त्या मूळ पवार आहेत का? असं शरद पवार म्हणाले. शरद पवारांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली. आता यावर देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलंय.

फडणवीसांचा खोचक टोला

कळंबचा गणपती हे आमचं आराध्य दैवत आहे. राळेगावमध्ये सीता मातेचे एकच मंदिर आहे. ताईंनी आता विडा उचलला आहे. तुम्ही काम हातात घ्या आम्ही पाठीशी राहू. तुम्ही सीता मातेचा जीर्णोद्धार कराल तर पवार साहेब विचारतील इथं सीता मातेचं का राम का नाही? त्यांना हे माहिती नाही की राम लल्लाचं मंदिर आहे. एखादा फोटोग्राफरने जर फोटो दाखवला लहानपणाचा तर लोकांनी विचारावं की बायको कुठंय… शरद पवार तिकडे सुनेला बाहेरचं म्हणतात, इकडे उध्दव ठाकरे लेकीला बाहेरचं म्हणतात, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावला आहे.

फडणवीसांचं यवतमाळकरांना आवाहन काय?

राजश्रीताई पाटील यांची सगळी नजर लोकांच्या विकासावर आहे. इथं जम्मू काश्मीरहून आलेल्या लोकांना निवडून दिले ही तर आपल्या गावातील ताई आहे. बिरसा मुंडांच्या हातात धनुष्य बाण आणि राजश्री ताईचं चिन्ह धनुष्यबाण आहे. पुढचे 5 वर्ष कारभार देशाचा कोणाला द्यावं याची निवडणूक आहे. त्यामुळे राजश्री ताईंना मत दिलेलं मत हे मोदींना जाणार आहे. आपली महायुती आहे. आपली ही विकासाची गाडी आहे. आपल्या गाडीचे इंजिन मोदी आहेत. आपल्या गाडीच्या डब्यात सगळ्यांना बसायची जागा आहे. सबका साथ सबका विकास म्हणत पुढे जात आहेत, असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी यवतमाळकरांना केलं आहे.

राहुल गांधींवर निशाणा

राहुल गांधींच्या गाडीला फक्त इंजिन आहे. त्याला कोणी डब्बा लावायला तयार नाही. राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे. उध्दव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे. शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे. इंजिनमध्ये राहुल गांधींसोबत सोनिया गांधींना जागा आहे. उध्दव ठाकरेंच्या इंजिन मध्ये एकनाथ शिंदे नाही तर आदित्य ठाकरेंसाठी जागा आहे. शरद पवारांच्या इंजिनमध्ये सुप्रिया सुळेंसाठी जागा आहे. तुम्ही महायुतीच्या विकासाच्या गाडीत बसलात की तुमचं कल्याण होईल, असं फडणवीस म्हणाले.

Non Stop LIVE Update
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?.
शिंदे हेच मुख्यमंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं विधान
शिंदे हेच मुख्यमंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं विधान.
राज्यात कोणाचं पारडं जडं? सरकार कोणाचं येणार? काय सांगतोय एक्झिट पोल?
राज्यात कोणाचं पारडं जडं? सरकार कोणाचं येणार? काय सांगतोय एक्झिट पोल?.
पवारांसोबत शिंदे गेले तर..., शिरसाटांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
पवारांसोबत शिंदे गेले तर..., शिरसाटांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या.
...तर महाराष्ट्रात पुन्हा राष्ट्रपती राजवट? सत्तेसाठी फक्त 48 तास अन्
...तर महाराष्ट्रात पुन्हा राष्ट्रपती राजवट? सत्तेसाठी फक्त 48 तास अन्.
लाडक्या बहिणीनी कोणाला निवडल? जुन्या भावांना की नवा वायदा करणाऱ्यांना?
लाडक्या बहिणीनी कोणाला निवडल? जुन्या भावांना की नवा वायदा करणाऱ्यांना?.
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा.
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?.