AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Yavatmal : संतापजनक! आधार कार्ड नाही म्हणून प्रसूती कळा सुरु झालेल्या गर्भवतीला रुग्णालयातून परत पाठवलं

Yavatmal Pregnant Lady : अत्यंत गरीब आणि हलाखीच्या परिस्थितीत असताना या महिलेला मदत करायची सोडून या महिलेला परत पाठवण्यात आल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना यवतमाळ जिल्ह्याच्या मारेगावमधील ग्रामीण रुग्णालयामध्ये घडली.

Yavatmal : संतापजनक! आधार कार्ड नाही म्हणून प्रसूती कळा सुरु झालेल्या गर्भवतीला रुग्णालयातून परत पाठवलं
धक्कादायक..Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 10, 2022 | 12:36 PM

यवतमाळ : नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेला प्रसूती (Yavatmal Pregnant Lady) कळा सुरु झाल्या. त्यामुळे सरद महिलेला ग्रामीण रुग्णालयामध्ये घेऊन जाण्यात आलं. पण या महिलेला ग्रामीण रुग्णालयातून (Rural Hospital) चक्क परत पाठवण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या महिलेला ग्रामीण रुग्णालयातून परत का पाठवलं, याचं कारणही अत्यंत संतापजनक असल्याचा आरोपा करण्यात आला आहे. आधार कार्ड नाही म्हणून या महिलेला ग्रामीण रुग्णालयात काम करणाऱ्यांनी तिला परत पाठवून दिलं. तसंच गरिबीमुळे या महिलेकडे पैसेही नव्हते. अत्यंत गरीब आणि हलाखीच्या परिस्थितीत असताना या महिलेला मदत करायची सोडून या महिलेला परत पाठवण्यात आल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना यवतमाळ (Yavatmal News) जिल्ह्याच्या मारेगावमधील ग्रामीण रुग्णालयामध्ये घडली. दरम्यान, सुदैवानं काही सजग सामाजिक कार्यकर्ते या महिलेच्या मदतीसाठी धावून आल्यामुळे थोडक्यात मोठा अनर्थ टळलाय. अर्चना सोळंके असं या गर्भवती महिलेचं नाव आहे. मंगळवारी ही घटना घडली.

‘आधार’ नसल्यानं निराधार…

यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयात सदर महिला प्रसूती कळा सुरु झाल्या म्हणून दाखल झाली. पण आधार कार्ड नसल्यानं तिच्यावर उपचार करण्यास डॉक्टरांनी नकार दिला, असा आरोप कऱण्यात आला आहे. आधार कार्ड नसल्यामुळे ग्रामी रुगणालयाती डॉक्टरांनी तिची प्रसूती केली नाही, असं सांगितलं जातंय. महिला गरीबर असल्यानं तिच्याकडे प्रसूतीसाठी पैसे नव्हते. अखेर या महिलेच्या मदतीसाठी सामाजिक कार्यकर्ते धावून आले. त्यांनी तातडीन पैसे गोळा करुन तिला खासगी रुग्णालयात दाखल केलं.

हे सुद्धा वाचा
Yavatmal Lady News

अखेर खासगी रुग्णालयातील महिलेनं दिला गोंडस बाळाला जन्म

थोडक्याच बाळ वाचलं

जवळच्या लोढा रुग्णालयात या गरीब आणि संकटात सापडलेल्या महिलेची अखेर सुखरुप प्रसूती झाली आणि तिने एका गोंडस बाळाला जन्म ही दिली. पण घडलेल्या निंदनीय प्रकारावर सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जातोय. गरीब महिलेला प्रसूतीसाठी नाकारणाऱ्या ग्रामीण रुग्णालयातील सरकारी डॉक्टरांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. सामाजिक कार्यकर्ते राकेश खुराना यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे थोडक्यात महिलेचा जीव आणि तिच्या पोटात वाढत असलेलं बाळ बचावलंय.

गरज पडल्यास आपात्कालीन...केंद्राचं सर्व राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र
गरज पडल्यास आपात्कालीन...केंद्राचं सर्व राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र.
IPL 2025 स्थगित, उर्वरित 16 सामने होणार की नाही? BCCI चा निर्णय काय?
IPL 2025 स्थगित, उर्वरित 16 सामने होणार की नाही? BCCI चा निर्णय काय?.
पाकचा पुंछमध्ये मोठा हल्ला, काळजाचा ठोका चुकणारा व्हिडीओ पाहिला?
पाकचा पुंछमध्ये मोठा हल्ला, काळजाचा ठोका चुकणारा व्हिडीओ पाहिला?.
मुस्लिम सुपरस्टार मित्रासाठी अभिनेत्याची मंदिरात पूजा; वादाला उधाण
मुस्लिम सुपरस्टार मित्रासाठी अभिनेत्याची मंदिरात पूजा; वादाला उधाण.
India-Pakistan War : अटारी-वाघा बॉर्डरवर बीटिंग रिट्रीट बंद, कारण...
India-Pakistan War : अटारी-वाघा बॉर्डरवर बीटिंग रिट्रीट बंद, कारण....
खुदा न खास्ता अगर... तणावादरम्यान मेहबूबा मुफ्तींच्या डोळ्यात पाणी अन्
खुदा न खास्ता अगर... तणावादरम्यान मेहबूबा मुफ्तींच्या डोळ्यात पाणी अन्.
संरक्षण मंत्र्यांची तिन्ही सैन्यांसोबत बैठक,भारताची पुढची रणनिती ठरणार
संरक्षण मंत्र्यांची तिन्ही सैन्यांसोबत बैठक,भारताची पुढची रणनिती ठरणार.
IPL 2025 : आयपीएलचे उर्वरित सामने रद्द होणार? BCCI लवकरच घेणार निर्णय
IPL 2025 : आयपीएलचे उर्वरित सामने रद्द होणार? BCCI लवकरच घेणार निर्णय.
पाकिस्ताननं जगाकडे मागितली भीक, युद्धासाठी कर्ज हवं? पण खरं काय?
पाकिस्ताननं जगाकडे मागितली भीक, युद्धासाठी कर्ज हवं? पण खरं काय?.
पाकला कडकी...भीक मागण्याची वेळ तरी युद्धाची खुमखुमी, जगापुढे पसरले हात
पाकला कडकी...भीक मागण्याची वेळ तरी युद्धाची खुमखुमी, जगापुढे पसरले हात.