Yawatmal Gas Kit | कळंबमध्ये निर्माण झालेल्या सारथीला जर्मनीचे पेटंट, शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा
कळंब शहरातील प्रशांत मुरलीधर डेहणकर या व्यावसायिकांनी आपल्या संशोधनाला जागतिक पेटंट मिळवून शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. डेहनकर २८ वर्षांपासून पेट्रोलियम आणि गॅस व्यवसायत सक्रिय आहेत. दोन सिलिंडरची हाताळणी करणारे सारथी त्यांनी सारथी नावाचे उपकरण तयार केले आहे.
यवतमाळ : वैदर्भीय माणूस कुठेही कमी नाही हे, दाखविणारी किमया शहरातील पेट्रोलियम (Petroleum) व गॅस (Gas) व्यावसायिकाने दाखवून दिली आहे. दोन सिलिंडरची हाताळणी करणारे सारथी (Sarthi) नामक उपकरण या व्यावसायिकांनी आपल्या संशोधक व चिकित्सक बुद्धीतून निर्माण केले आहे. यामध्ये गौरवाची बाब म्हणजे त्यांच्या या संशोधनाला जर्मनीसारख्या देशाचे पेटंट (Patent) मिळाले आहे. या सारथा नावाच्या उपकरणामुळे गॅस व्यावसायिकांचे काम हलके होणार आहे.
कळंब शहरातील प्रशांत मुरलीधर डेहणकर या व्यावसायिकांनी आपल्या संशोधनाला जागतिक पेटंट मिळवून शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. डेहनकर २८ वर्षांपासून पेट्रोलियम आणि गॅस व्यवसायत सक्रिय आहेत. त्यामुळे आपला व्यवसाय अधिक सुलभ आणि सोपा व्हावा, म्हणून त्यांनी अविरत संशोधन सुरू होते. अडचणी व गरजा सोडविण्यासाठी त्यांनी गेल्या १२ वर्षांपासून स्वतःच्या संशोधनाने अनेक उपकरणे विकसित केली आहेत.
इंडियन ऑईल कॉर्पोरेशनची मान्यता
यामध्ये उल्लेखनीय गोष्ट आहे ती म्हणजे या उपकरणाला भारताच्या इंडियन ऑईल कॉर्पोरेशनची मान्यताही मिळाली आहे. त्यामुळे त्यांच्या उपकरणांना संपूर्ण देशात त्यांनी ‘ए टू झेड इंजिनिअरिंग’च्या माध्यमातून वितरीतही केले आहे. अलीकडेच त्यांनी सारथी नामक नवीन उपक्रम बनविले आहे. पेट्रोलियम व गॅस व्यवसायात हे उपकरण अतिशय उपयोगी ठरणार आहे.
कामगारांसाठी फायदेशीर
सारथी उपकरणाचे प्रात्यक्षिक नुसते वाशिम जिल्ह्यातील धनजंयच्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन शाखेच्या बॉटलिंग प्लॉटमध्ये पार पडले. त्यांचा उपयोगही महाराष्ट्रातील इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या बॉटलिंग प्लांटसच्या काही वितरकांच्या ही गोदामात सुरू झाला आहे आहे. यामुळे कामगार व कर्मचारीही आनंदी असल्याचे सांगण्यात आले.
यवतमाळ जिल्ह्यासाठी बहुमान
जगात ‘टेक्नॉलॉजी’ क्षेत्रात अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या जर्मनीसारख्या प्रगत देशामधून डेहणकर यांच्या सारथी संशोधनाला जागतिक पेटंट मिळाले आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यासाठी हा मोठा बहुमान आहे. फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मन, पेटंट आणि ट्रेडमार्क कार्यालयाचे प्रमुख कार्याध्यक्ष कॉनलिया रुडलोफ शोफर यांच्याकडून हे पेटंट मंजूर झाले आहे. त्यामुळे प्रशांत डेहणकरांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
एकाच वेळी दोन सिलिंडर वाहून घेऊन जाणाऱ्या या सारथी उपकरणासाठी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचे विक्री अधिकारी निलेश ठाकरे, नागपूरचे मुख्य क्षेत्रिय व्यवस्थापक अनिल मेहर यांचे मार्गदर्शन लाभल्याचे डेहणकर यांनी सांगितले. सध्या सारथी उपक्रमाची निर्मिती सुरू असून देशभरातील गॅस व्यावसायिकांच्या एलपीजी गोडाऊनसह बॉटलिंग प्लांटवर याचा उपयोग होईल, असे डेहणकर यांनी सांगितले.
संबंधित बातम्या