Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत बंदमुळे आज भाज्यांचे दर कडाडले, वाचा आजचे ताजे भाव

मिळालेल्या माहितीनुसार, भारत बंदचा फटका आता भाज्यांना बसला आहे. यामुळे आज अनेक मोठ्या मार्केटमध्ये भाज्यांचे भाव कडाडले आहेत.

भारत बंदमुळे आज भाज्यांचे दर कडाडले, वाचा आजचे ताजे भाव
भाजीपाल्याचे दर कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.
Follow us
| Updated on: Dec 09, 2020 | 9:05 AM

मुंबई : केंद्राच्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी मंगळवारी भारत बंदची हाक देण्यात आली होती. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यातही कडकडीत बंद पुकारण्यात आल्याचं पाहायला मुळावं. अनेक बाजार समित्या आणि व्यवसाय, वाहतूक ठप्प असल्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारत बंदचा फटका आता भाज्यांना बसला आहे. यामुळे आज अनेक मोठ्या मार्केटमध्ये भाज्यांचे भाव कडाडले आहेत. (yesterdays bharat bandh impact on vegetables rate prices of vegetables have gone up)

अधिक माहितीनुसार, कालच्या बंदमुळे भाज्यांचे दर 10 टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळे भाज्या विकत घेताना आता नागरिकांना जादा पैसे मोजावे लागणार आहेत. खरंतर, कालच्या भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी मुंबई, नवी मुंबईसह राज्यातील महत्त्वाच्या अनेक बाजार समित्या बंद होत्या. यामुळे आज भाज्यांचे दर कडाडले आहेत.

खरंतर, कालच्या बंदच्या दिवशी कणकवलीत भाजपकडून अल्प दरात कांदे विक्री करण्यात आली. यामुळे ग्राहकांची कांदे खरेदीसाठी झुंबड उडाल्याचं पाहायला मिळालं. सिंधुदुर्गात सध्या कांद्याचे दर 45 रुपये किलो असताना भाजपकडून 30 रुपये दराने विक्री करण्यात आली. खासदार नारायण राणेंच्या सहकार्याने ही विक्री केल्याची माहिती समोर आली होती.

शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदमध्ये एपीएमसी मार्केट सहभागी झाले होते. नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात कडकडीत बंद ठेवण्यात आले होते. एपीएमसी मधीलपाचही बाजारपेठा पूर्ण बंद ठेवण्यात आल्या होत्या. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधे शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बंदचा परिणाम दिसून आला. यामुळे आज भाज्यांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

भाज्यांचे आजचे दर

– टोमॅटो- आधी 30, आता 40 रुपये किलो

– फरस बी – आधी 50, आता 80

– काकडी – आधी 20 रुपये किलो, आता 40 रुपये किलो

– दुधी – आधी 8 रुपये किलो, आता 20 रुपये किलो

– वांगी – आधी 13, आता 30 रुपये किलो

– हिरवा वाटाणा – आधी 40, आता 60 रुपये किलो

– गवार – आधी 300 रुपये किलो, आता 400

– कारली – आधी 16, आता 24 रुपये किलो (yesterdays bharat bandh impact on vegetables rate prices of vegetables have gone up)

इतर बातम्या – 

FARMER PROTEST | शेतकरी आंदोलक आणि सरकारमधील आजची बैठक रद्

Bharat Bandh | नागपुरात कळमना भाजीबाजारात भाज्यांची आवक निम्म्याने घटली

(yesterdays bharat bandh impact on vegetables rate prices of vegetables have gone up)

संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल
संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल.
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका.
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला.
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य.
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार.
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल.
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान.
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?.
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख.
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर.