Ramdev Baba | फडणवीसांच्या भेटीनंतर रामदेव बाबा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला, नंदनवनमध्ये काय चर्चा?

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रामदेव बाबा आणि भाजप-शिंदे गटाच्या नेत्यांशी झालेली ही भेट महत्त्वपूर्ण मानली जातेय. भेटीत नेमकं काय झालं हे सांगताना रामदेव बाबा म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिंदु धर्म, सनातन धर्माचे गौरवपुरुष आहेत.

Ramdev Baba | फडणवीसांच्या भेटीनंतर रामदेव बाबा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला, नंदनवनमध्ये काय चर्चा?
रामदेव बाबा यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी भेटImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 30, 2022 | 1:48 PM

मुंबईः हिंदुत्व आणि शिवसेना (Shivsena) टिकवण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीत राहणार नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मांडली. त्यानंतर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जे जे समाजकारण आणि राजकारण करतात, त्यांना आपलसं करणार असल्याची भूमिका शिंदे गटानं मांडली आहे. भाजपने पूर्वीपासूनच हिंदुत्वाचा (Hindutwa) अजेंडा राबवलाय. यातूनच शिंदे गट आणि भाजपची युती झाल्याचे सांगितले जात आहे. याच पार्श्वभूमीवर योगगुरू रामदेव बाबा यांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. हिंदुत्वाचे खरे पुरस्कर्ते कोण, या प्रश्नाचं उत्तर जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध पक्षांची रस्सीखेच सुरु आहे. त्यामुळे रामदेव बाबांनी या दोन नेत्यांची घेतलेली भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

काल फडवणीसांची भेट, आज नंदनवनमध्ये…

योगगुरू रामदेव बाबा यांनी काल सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. आज त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या नंदनवन निवासस्थानी त्यांनी ही सदिच्छा भेट घेतली. या भेटीत हिंदुत्वाच्या मुद्द्यावर व्यापक चर्चा झाल्याचं रामदेव बाबा यांनी सांगितलं.

भेटीचं नेमकं कारण काय?

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रामदेव बाबा आणि भाजप-शिंदे गटाच्या नेत्यांशी झालेली ही भेट महत्त्वपूर्ण मानली जातेय. भेटीत नेमकं काय झालं हे सांगताना रामदेव बाबा म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिंदु धर्म, सनातन धर्माचे गौरवपुरुष आहेत. आपल्या राजधर्मासोबत ते सनातन धर्मही प्रामाणिकपणे निभावत आहेत. त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आम्ही आलो आहोत. बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत आमचे आत्मीयतेचे संबंध होते. शिंदे हे बाळासाहेबांचे मानस, अध्यात्मिक आणि राष्ट्रीय उत्तराधिकारी आहेत, या भूमिकेतून आम्ही पाहतो. त्यामुळे या राजधर्मासोबत सनातन धर्माच्या प्रतिष्ठेसाठीही प्रयत्न करा, अशी आम्ही विनंती केल्याचं रामदेव बाबा यांनी सांगितलं.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.