OBC आरक्षणावर घटना दुरुस्ती होईपर्यंत आपण सर्व ओबीसी पर्व; नाशिकमध्ये पंकजांच्या उपस्थितीमध्ये भुजबळांचा नारा!

भुजबळ म्हणाले, आज गोपीनाथ मुंडे केंद्रात मंत्री असते, तर OBC बाबत अडचणी झाल्याच नसत्या. गोपीनाथ मुंडे असते, तर आम्हालाही काही अडचण झाली नसती,असे म्हणत त्यांनी आपल्या मनातील शल्य यावेळी व्यक्त केले.

OBC आरक्षणावर घटना दुरुस्ती होईपर्यंत आपण सर्व ओबीसी पर्व; नाशिकमध्ये पंकजांच्या उपस्थितीमध्ये भुजबळांचा नारा!
पंकजा मुंडे आणि छगन भुजबळ.
Follow us
| Updated on: Nov 01, 2021 | 5:30 PM

नाशिकः OBC आरक्षणावर जोपर्यंत घटना दुरुस्ती होत नाही, तोपर्यंत आपण सर्व ओबीसी पर्व राहील, असा नारा नाशिकमध्ये पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत सोमवारी मंत्री छगन भुजबळ यांनी देत पुन्हा एकदा ओबीसी लढ्याला धार दिली.

मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते छगन भुजबळ आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे हे दोघे एकाच व्यासपीठावर येणार म्हटल्यानंतर ते काय बोलणार याची चर्चा आदीपासूनच सुरू होती. अन् अपेक्षेप्रमाणे जुन्या समीकरणाला पुन्हा एकदा छगन भुजबळांनी बळ देत येत्या काळात वाऱ्याची हवा फिरली, तर राजकारण कसे जाऊ शकते याची झलकही दाखवून दिली. खरे तर सोमवारी भुजबळ आणि पंकजा यांनी नाशिकमध्ये जवळपास तीनेक कार्यक्रमांना हजेरी लावली. त्यात पहिला कार्यक्रम संदर्भसेवा रुग्णालयाचा होता. याचे आयोजन भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी केलेले. दुसरा कार्यक्रम बँकेच्या लोकार्पण सोहळ्याचा झाला आणि तिसरा महात्मा फुले पुतळा आणि परिसराच्या सुशोभीकरणाचा. याच कार्यक्रमात भुजबळांनी पुन्हा एकदा ओबीसी तितुका मेळवावा अशी हाक दिली. यावेळी भुजबळांनी आपल्या तडाखेबंद शैलीत भाषण केले. ते म्हणाले, आज गोपीनाथ मुंडे केंद्रात मंत्री असते, तर OBC बाबत अडचणी झाल्याच नसत्या. गोपीनाथ मुंडे असते, तर आम्हालाही काही अडचण झाली नसती,असे म्हणत त्यांनी आपल्या मनातील शल्य यावेळी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की, ओबीसी जनगणना, ओबीसी आरक्षणावर जोपर्यंत घटना दुरुस्ती होत नाही, तोपर्यंत आपण सर्व ओबीसी पर्व राहील, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.

भुजबळांचे राजकीय फटाके

नाशिकमध्ये झालेल्या कार्यक्रमात छगन भुजबळ म्हणाले, अनिल देशमुख यांनी प्रतिवाद करण्याचा प्रयत्न केला. ते वेगवेगळ्या न्यायालयात गेले, पण आता आपली बाजू मांडण्यासाठी ईडीच्या कार्यालयात दाखल झाले. नवाब मलिक जे बोलतात त्याविषयी त्यांच्याकडे कागदपत्रे असतात. मात्र, ते काय बोलले माहित नाही. राणे यांनी प्रेम दाखविले त्याबद्दल त्यांचा आभारी आहे. आता नवीन राणे, नवीन भुजबळ आहेत. जुने सोडून द्या, असे आवाहन त्यांनी केले.

आम्हाला हो म्हणायची सवय, बँकेत नो म्हणावं लागतं

पंकजा म्हणाल्या, सहकारमध्ये खूप राजकारण आहे. भुजबळांनी ते भोगलं. पण राजकारण बाजूला ठेवलं, तर सहकार यशस्वी होतं. माझा कारखाना कर्जबाजारी आहे. बँक चालवणं अवघडय. आम्हाला हो म्हणायची सवय. बँकेत नो म्हणावं लागतं. नोटाबंदी झाली तेव्हा बँकांची काय परिस्थिती होईल असं वाटत होतं, पण 2 वर्षांनी सगळं स्थिर स्थावर झालं. यासाठी त्यांनी लोकांना सॅल्यूट केला. भुजबळ साहेब आपण अशा वर्गातून येतो जिथे संघर्ष केल्याशिवाय, खेचून घेतल्याशिवाय काही मिळत नाही असा उल्लेखही त्यांनी एकेठिकाणी केला.

इतर बातम्याः

आवाज कुणाचा…महागाईचा; नाशिकमध्ये फटाक्यांच्या किमती 20 टक्क्यांनी वाढल्या!

NashikGold: दिवाळीचा बार, वसुबारसेदिवशी सोनं 48 हजारी!

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.