कर्ज फेडण्यासाठी चिमुरड्याचं अपहरण, 23 वर्षीय इंजिनिअरला बेड्या

8 वर्षाच्या वीर खारकर या मुलाच्या अपहरण प्रकरणी इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याला अटक करण्यात आली आहे.

कर्ज फेडण्यासाठी चिमुरड्याचं अपहरण, 23 वर्षीय इंजिनिअरला बेड्या
Follow us
| Updated on: Nov 07, 2020 | 10:18 AM

चंद्रपूर : चंद्रपूर (Chandrapur )जिल्ह्यातील घुगुस शहरात आठ वर्षीय वीर खारकर या मुलाच्या अपहरण (kidnap) नाट्याने एकच खळबळ उडाली होती. 8 वर्षाच्या वीर खारकर या मुलाच्या अपहरण प्रकरणी इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याला (engineer Student) अटक करण्यात आली आहे. गणेश पिंपळशेंडे असं 23 वर्षीय अटक करण्यात आलेल्या युवकाचं नाव असून तो खारकर यांच्या परिवाराचा परिचित आहे. गणेशनेच वीरचं अपहरण केलं असल्याचं पोलिसांकडून समोर आलं आहे. (Young engineer kidnaps child to pay off debt arrested by police in Chandrapur)

मिळालेल्या माहितीनुसार, 2 लाखांचं कर्ज फेडण्यासाठी त्याने हे अपहरण केलं होतं. मात्र, पोलिसांच्या भीतीने त्याने अपहृत मुलाला नागपुरात सोडून पोबारा केला. घुगुस हे औद्योगिक शहर आहे. याशिवाय कोळसा खाणींमुळे या भागात गुन्हेगारी आकडाही अधिक आहे. याच शहरात याआधी मुलांच्या अपहरणाच्या काही घटना घडल्या असल्याने पोलिसांनी अत्यंत सावधगिरीने तपास करत आरोपीला आरोपीचा माग काढला होता.

पोलिसांच्या ससेमिरा टाळण्यासाठी आरोपीने या मुलाला नागपुरातील सोनेगाव पोलीस स्टेशनच्या समोर सोडलं होतं. मात्र, प्रकरणातील आरोपी कोण याबाबत तर्क लढवले जात असतानाच शहरातील सीसीटीव्ही आणि परिसरात विणलेल्या खबरी जाळ्याचा वापर करत पोलिसांनी शहरातील गणेश पिंपळशेंडेला अटक केली. गणेश हा नागपुरात इंजिनिअरींग करतो.

या विद्यार्थ्यावर दोन लाखांचे कर्ज होतं. हे फेडण्यासाठी त्याने 8 वर्षीय वीरचं अपहरण केलं. पोलिसांनी चंद्रपूर ते नागपूर या दोन्ही शहरांमध्ये तपासाची चक्रे फिरवत त्याचा शोध सुरू केला होता. पोलीस तपासात गणेश पिंपळशेंडेला अटक करण्यात आली असून पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.

इतर बातम्या – 

मराठा आरक्षणावर तोडगा काढा, कोणतीही उणीव ठेवू नका; अशोक चव्हाणांची दिल्लीत वकिलांशी चर्चा

विधानपरिषद : उर्मिला आणि नितीन बानुगडे विधानपरिषदेवर, शिवसेनेची चार नावं ठरली !

(Young engineer kidnaps child to pay off debt arrested by police in Chandrapur)

Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.