लग्नाची मागणी घालण्यासाठी येणाऱ्या तरुणाने लुटलं, तरुणीला तब्बल साडेसहा लाखांचा गंडा

लग्नाची मागणी घालण्यासाठी येणाऱ्या तरुणाने लुटलं, लंडनहून येतो सांगत जे केलं त्यावर विश्वास बसणार नाही!

लग्नाची मागणी घालण्यासाठी येणाऱ्या तरुणाने लुटलं, तरुणीला तब्बल साडेसहा लाखांचा गंडा
Follow us
| Updated on: Oct 22, 2020 | 1:57 PM

मुंबई : लग्न जुळवायचं म्हटलं की हल्ली सोशल मीडियावर अनेक वेबसाईट्स आहेत. यातून गुन्हे आणि फसवणूक झाल्याचे अनेक गंभीर प्रकार समोर आले. असाच एक धक्कादायक प्रकार मुंबईत समोर आला आहे. एका विवाह नोंदणी साइटवरून लंडनमध्ये राहणाऱ्या तरुणाशी ओळख झाल्यानंतर थेट लग्नापर्यंत विषय गेला. यावेळी सगळी तयारी झाली. नवरदेव लंडनहून अर्ध्या वाटेत असताना असं काही घडलं की आज संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. (young man robbed six lakhs from bride fraud case field in mumbai)

मिळालेल्या माहितीनुसार, लंडनच्या मुलाशी ओळख झाल्यानंतर मैत्री वाढत दोघांमध्ये प्रेम झालं. यानंतर कुटुंबाला सांगून दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. कुटुंबानेही लग्नाला परवानगी दिली आणि दोन्ही घरात आनंदाचं वातावरण पसरलं. पुढं लग्नाची तारीख ठरवण्यासाठी मुलगा लंडनहून भारतात येणार म्हणून मुलीच्या कुटुंबियांना जय्यत तयारीला सुरूवात केली.

आता HDFC बँकेतून होणार मुंबई पोलिसांचे पगार, 1 कोटींपर्यंत आहे विमा कवच

आपल्याला हव्या त्या तरुणाशी लग्न होणार अशी स्वप्न रंगवतानाच दिल्ली विमानतळावर तरुणाला अडवलं असल्याचा फोन तरुणीला येतो. यानंतर मदतीच्या नावाखाली तरुणाने थेट साडेसहा लाख रुपये उकळले आणि पसार होण्याचा प्रयत्न करत होता. ही धक्कादायक घटना सांताक्रूझमध्ये घडली आहे.

29 सप्टेंबर रोजी तरुण भारतात येण्यासाठी निघाला तेव्हा तरुणीला एका अनोळखी नंबरवरून तरुणाच्या कार्डमध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे त्याला पकडून ठेवलं असल्याचं सांगितलं. त्याला सोडवण्यासाठी 45 हजार रुपये मागताच तरुणीने तातडीने पैसे जमा केले. यानंतर तरुणाने 70 हजार पौंड अवैधरित्या भारतात आणल्याचं सांगत तिच्याकडून आणखी 4 लाख 50 हजार घेतले.

देवीच्या मंदिरातील भुस्खलनाचा थरारक CCTV, 5 लोक मलब्याखाली अडकले

सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे, यापुढे आणखी मोठ्या कारणांसाठी तरुणीने दागिने गहान ठेवून तरुणाला थेट साडेसहा लाख रुपये दिले आणि काही दिवसांतच त्याच्याशी संपर्क बंद झाला. यानंतर आपली फसवणूक झाली असल्याचं लक्षात येताच तरुणीने यासंबंधी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

(young man robbed six lakhs from bride fraud case field in mumbai)

Non Stop LIVE Update
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.