शरद पवारांवरील खालच्या टीकेवर अजित पवारांनी तरी बोलावं, युगेंद्र पवार यांनी व्यक्त केली खंत

"आम्ही एकेकाळी एकत्र होतो असे काही सहकारी आता महायुतीत आहेत. त्यामुळे त्यांनी महायुतीच्या वरिष्ठांना सांगितले पाहिजे, असं बोललेलं त्यांना आवडणार नाही. हे त्यांनी सांगितले पाहिजे", असं युगेंद्र पवार म्हणाले.

शरद पवारांवरील खालच्या टीकेवर अजित पवारांनी तरी बोलावं, युगेंद्र पवार यांनी व्यक्त केली खंत
युगेंद्र पवार यांनी व्यक्त केली खंत
Follow us
| Updated on: Dec 11, 2024 | 4:28 PM

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यावर अतिशय खालच्या शब्दांत टीका करण्यात आली. त्यांच्या टीकेबाबत आज शरद पवार गटाचे नेते युगेंद्र पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी आपले काका तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सुनावलं. “गोपीचंद पडळकर काय बोलले मी ऐकलं नाही. त्यांच्याकडून आम्ही वेगळं काही अपेक्षित करू इच्छित नाही. वाईट याचं वाटतं कारण ते महायुतीत आहेत. महायुतीत राष्ट्रवादी पक्ष देखील आहे. त्यांनी यावर आक्षेप घेतला पाहिजे. शरद पवार हे एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहेत. राज्यातील आणि देशातील लोक त्यांचा आदर करतात. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही”, असं युगेंद्र पवार म्हणाले.

“आम्ही एकेकाळी एकत्र होतो असे काही सहकारी आता महायुतीत आहेत. त्यामुळे त्यांनी महायुतीच्या वरिष्ठांना सांगितले पाहिजे, असं बोललेलं त्यांना आवडणार नाही. हे त्यांनी सांगितले पाहिजे. विधानसभेच्या निवडणुकीत अशी लोक निवडून येतात, चांगली माणसं ज्यांना आम्ही समजतो, चांगली लोक निवडून गेली नाहीत. अशी लोक विधानसभेत जातात हे कुठेतरी बदललं पाहिजे. असं माझं मत आहे”, अशी प्रतिक्रिया युगेंद्र पवार यांनी दिली.

मंत्रिमंडळ विस्तारावर टोला

युगेंद्र पवार यांना यावेळी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. “तीन पक्षांनी मिळून एकत्रित सरकार स्थापन केलं आहे. त्यांच्याकडे बहुमत आहे. त्यामुळे त्यांना वेळ लागत असेल”, असा टोला युगेंद्र पवार यांनी लगावला. यावेळी युगेंद्र पवार यांना शरद पवार गटाच्या बैठकीबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “मी या बैठकीत नव्हतो. निवडून आलेले खासदार होते. तिथे काय झालं हे आज मी समजून घेईन”, अशी प्रतिक्रिया दिली.

हे सुद्धा वाचा

मविआ आमदार महायुतीच्या संपर्कात?

महाविकास आघाडीचे आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा महायुतीच्या नेत्यांकडून केला जातो. याबाबत युगेंद्र पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. “ते संपर्कात असतील किंवा नसतील याबाबत मला माहित नाही. पण मला वाटत नाही की ते महायुतीच्या संपर्कात असतील. काही ठराविक लोक चर्चा करतही असतील, पण यात काय चुकीचं आहे? राजकारणापलिकडचे काही संबंध असतात”, असं युगेंद्र पवार म्हणाले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढणार?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढणार का? या प्रश्नाचं देखील युगेंद्र पवार यांनी उत्तर दिलं आहे. “पक्ष फुटल्यानंतर या निवडणुका येत आहेत. आता या सगळ्या निवडणुका ताकदीने लढवाव्या लागतील. कार्यकर्त्यांना ताकद द्यावी लागेल. संघटन मजबूत करावं लागेल. स्वच्छ प्रतिमेच्या युवकांना आणि युवतींना संधी द्यावी लागेल. हे जर करू शकलो तर इथे पक्षाची ताकद वाढेल. अजून निवडणूका जाहीर झालेल्या नाहीत. तेव्हा आम्ही सगळे एकत्रित बसून पुढे ठरवू”, असं युगेंद्र पवार म्हणाले.

‘अजित पवारांना भेटल्यावर शुभेच्छा देणार’

युगेंद्र पवार यांना यावेळी अजित पवार यांच्या नागरी सत्काराबाबतही प्रश्न विचारण्यात आला. “अनेक वर्षांपासून अजित दादा इथे निवडून येत आहेत. या अगोदरही त्यांचा नागरी सत्कार झालेला आहे. त्याच पद्धतीने सत्कार आहे, यात गैर काही नाही. अजून दादांची माझी भेट झाली नाही, झाली तर त्यांना शुभेच्छा देईन”, असं युगेंद्र पवार यांनी सांगितलं.

खातेवाटपाचा तिढा, दिल्लीत फडणवीस-दादा पण शिंदे जाणार की नाही? सस्पेन्स
खातेवाटपाचा तिढा, दिल्लीत फडणवीस-दादा पण शिंदे जाणार की नाही? सस्पेन्स.
'मला गद्दार म्हणत होते, यांना काय गद्दार 2.. ', गुलाबराव पाटलांचा टोला
'मला गद्दार म्हणत होते, यांना काय गद्दार 2.. ', गुलाबराव पाटलांचा टोला.
पवारांवर टीका करणाऱ्यावर बोलताना युगेंद्र पवारानी आपल्या काकाला फटकारल
पवारांवर टीका करणाऱ्यावर बोलताना युगेंद्र पवारानी आपल्या काकाला फटकारल.
शिंदे गटात मंत्रिपदावरून रस्सीखेच, 'या' 5 नेत्यांना पक्षातूनच विरोध?
शिंदे गटात मंत्रिपदावरून रस्सीखेच, 'या' 5 नेत्यांना पक्षातूनच विरोध?.
सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन भाविकांसाठी इतके दिवस बंद, कारण नेमकं काय?
सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन भाविकांसाठी इतके दिवस बंद, कारण नेमकं काय?.
तरूणाचा जाच संपेना... 11 वीत शिकणाऱ्या तरूणीनं उचललं टोकाचं पाऊल
तरूणाचा जाच संपेना... 11 वीत शिकणाऱ्या तरूणीनं उचललं टोकाचं पाऊल.
'लाडकी बहीण' संदर्भात नितेश राणेंची फडणवीसांकडे मोठी मागणी; म्हणाले...
'लाडकी बहीण' संदर्भात नितेश राणेंची फडणवीसांकडे मोठी मागणी; म्हणाले....
पुण्यात अर्जांची छाननी सुरू, 10 हजार 'लाडक्या बहिणी' अपात्र, कारण काय?
पुण्यात अर्जांची छाननी सुरू, 10 हजार 'लाडक्या बहिणी' अपात्र, कारण काय?.
समुद्रकिनारी मौज-मजा करण्याची आवड तुम्हालाही? जरा जपून...
समुद्रकिनारी मौज-मजा करण्याची आवड तुम्हालाही? जरा जपून....
'..म्हणून गोंधळ झाला', कुर्ला बेस्ट अपघातातील बस चालकचा जबाब अन् खळबळ
'..म्हणून गोंधळ झाला', कुर्ला बेस्ट अपघातातील बस चालकचा जबाब अन् खळबळ.