zero shadow day : पुढच्या महिन्यात तुमची सावली दिसणार नाही, अनुभवता येईल ‘झिरो शॅडो डे’

पुढच्या महिन्यात तुम्हाला अनुभवता येईल झिरो शॅडो डे. याविषयी जाणून घ्या...

zero shadow day : पुढच्या महिन्यात तुमची सावली दिसणार नाही, अनुभवता येईल 'झिरो शॅडो डे'
zero shadowImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Apr 27, 2022 | 9:14 AM

मुंबई : पुढच्या म्हणजेच मे महिन्यात तुम्हाला तुमची सावली (shadow) हरवलेली दिसेल. तुम्हाला तुमची सावली दिसणार नाही. तुम्हालाच काय तर कोणत्याही वस्तूची सावली दिसणार नाही. म्हणजेच तुम्हाला ‘झिरो शॅडो डे’चा (zero shadow day)अनुभव घेता येईल. या दिवसात सूर्य वेगवेगळ्या शहरांमध्ये दुपारी बारा ते साडेबाराच्या दरम्यान अगदी डोक्यावर असणार आहे. त्यामुळे यादरम्यान कोणत्याही वस्तूची सावली 90 अंशाच्या कोनात राहील. तुम्हाला यादिवशी तुमची सावली हरवल्याचं दिसून येईल. तुम्हालाही या शून्य (zero) सावलीचा थरार अनुभवता येऊ शकतो. ते अनुभवनं देखील अगदी सोपं आहे. एखादी वस्तू जमीनीवर सरळ उभी करा, ही वस्तू उभी केल्यास तुम्हाला शून्य सावलीचा थरार अनुभवता येईल.

तुमचं शहर आणि शून्य सावलीचा दिवस

  1. 3 मे – सावंतवाडी ते बेळगाव
  2. 4 मे – मालवण
  3. 6 मे – कोल्हापूर
  4. 13 मे पुणे, उस्मानाबाद
  5. 15 मे – मुंबई
  6. 19 मे – औरंगाबाद, जालना
  7. 24 मे – धुळे, जामनेर, निभोरा

शून्य सावली का दिसते?

पृथ्वीचा अक्ष हा 23.30 अंशांनी कलला असल्यामुळे आपण सूर्याचे दक्षिणायन,उत्तरायण व दिवसाचे लहन मोठे होणे अनुभवत असतो. याचाच परिणाम म्हणून विशिष्ट दिवशी शून्य सावलीचा अनुभव येतो.22 मार्चला पृथ्वीचे दोन्ही ध्रुव हे सूर्याकडे असताता. त्यामुळे यादिवशी समान कालावधीचा दिवस व रात्र असते. या दिवशी विषृववृत्तावर सूर्यकिरणे लंबरुप पडतात. 21 जूननंतर पृथ्वी प्रदक्षिणा मार्गावर पुढे जात राहते. त्यामुळे 23 सप्टेंबर यादिवशी पुन्हा पृथ्वीचे दोन्ही ध्रुव सूर्यासमोर येतात. विषृववृत्तावर सूर्यकिरणे लंबरूप पडतात. या दिवशी पुन्हा दिनमानसारखा अनुभव येतो.

कसा अनुभव असतो?

बंगळुरूमध्ये रविवारी झिरो शॅडो डे साजरा करण्यात आला. चेन्नईच्या तामिळनाडू विज्ञान आणि तंत्रज्ञान केंद्र कोट्टुपुरम येथे रविवारी तो साजरा करण्यात आला. यावेळी मुलांनी सूर्याचे आणि त्यातून निर्माण होणाऱ्या सावलीचे फोटो काढले आणि हा खास प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला. हा दिवस असतो, तेव्हा दिवसाच्या एका विशिष्ट वेळी सूर्य आपल्या डोक्याच्या अगदी वर येतो, ज्यामुळे आपल्यासाठी कोणतीही सावली तयार होत नाही, म्हणूनच या स्थितीला शून्य सावली म्हणतात.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.