जिल्हा परिषद शाळेत झुंबा डान्स, शिक्षकाच्या भन्नाट कल्पनेचा व्हिडिओ व्हायरल

zumba dance in zp School: पाय, गुडघे, कंबर, हात, खांदे, मान यांच्या योग्य हालचाली घेऊन तालबद्ध व्यायाम कवायतीमध्ये होतो. त्याला संगीताची जोड देऊन त्या तालावर हे वर्कआऊट केले जाते. त्यामुळे स्नायू बळकट होतात. मानसिक स्वास्थ तंदुरूस्त राहण्यासह रक्तदाब सुधारतो. कॅलरीज बर्न करता येतात. या प्रकारे अनेक फायदे झुंबा डान्सचे आहेत.

जिल्हा परिषद शाळेत झुंबा डान्स, शिक्षकाच्या भन्नाट कल्पनेचा व्हिडिओ व्हायरल
zumba dance
Follow us
| Updated on: Jul 14, 2024 | 10:35 AM

zumba dance in zp School: शाळा सुरु झाल्या की विद्यार्थ्यांवर अभ्यासाचे दडपण येते. शाळेत तास, होमवर्क आणि शिकवणी यामध्ये विद्यार्थ्यांचे बालपण हारवत चालले आहे. परंतु काही शाळांमध्ये वेगवेगळे प्रयोग राबवणारे शिक्षक असतात. जिल्हा परिषदेच्या सरकारी शाळेतील शिक्षकही वेगळी वाट निवडत विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आणि शाळेची गोडी निर्माण करतात. नाशिक जिल्ह्यातील शिक्षकाने असाच वेगळा उपक्रम सुरु केला आहे. त्याचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या शिक्षकाने शाळेतच झुंबा डान्स सुरु केला आहे. या झुंबा डान्सला अहिराणी अन् खान्देशी लोकगीताची जोड दिली आहे.

नेमका काय आहे प्रकार

एरव्ही विद्यार्थ्यांना शाळेत कवायत व व्यायाम करणे आवडत नाही. त्यावर नाशिक जिल्ह्यातील मालेगावच्या उंबरधे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाने अनोखा फंडा शोधून काढला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शाळेची गोडी वाढत आहे आणि त्यांच्याकडून शारीरीक कवायती होत आहे. दप्तरमुक्त शनिवार उपक्रमांतर्गत तंत्रस्नेही शिक्षक भारत पाटील यांनी त्यासाठी झुंबा डान्स शाळेत सुरु केला आहे. या झुंबा डान्सला त्यांनी अहिराणी व खान्देशी लोकगीतांची जोड दिली आहे. त्या गीताच्या तालावर विद्यार्थी उत्साहात वर्कआऊट करत आहेत.

हे सुद्धा वाचा

हे आहेत फायदे

पाय, गुडघे, कंबर, हात, खांदे, मान यांच्या योग्य हालचाली घेऊन तालबद्ध व्यायाम कवायतीमध्ये होतो. त्याला संगीताची जोड देऊन त्या तालावर हे वर्कआऊट केले जाते. त्यामुळे स्नायू बळकट होतात. मानसिक स्वास्थ तंदुरूस्त राहण्यासह रक्तदाब सुधारतो. कॅलरीज बर्न करता येतात. या प्रकारे अनेक फायदे झुंबा डान्सचे आहेत.

सर, झुंबा करू ना…

दर आठवड्याला वेगवेगळ्या खान्देशी गीते व संगीतासोबत मुलांना मिळणारा आनंद काही वेगळाच असतो. शाळेतील सर्वच विद्यार्थी यामध्ये सहभागी होतात. शरीरात नवी ऊर्जा निर्माण होऊन मुलांच्या मनात उत्साह निर्माण होऊन शाळेविषयी आपुलकी गोडी निर्माण होत आहे. विद्यार्थ्यांना फायदे कमी अधिक प्रमाणात माहिती असतील नसतील पण आपल्याला नाचायला, उड्या मारायला, मनासारख्या कृती करायला मिळते ना बस्स मग. यामुळे आता दर शनिवारी विद्यार्थी शाळेत हजेरी लावतात. त्यानंतर म्हणतात… सर, झुंबा करू ना…नाचो..नाचो …विथ झुंबा.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.