वाहन उद्योग संकटात, सलग चार महिन्यांपासून वाहन विक्रीमध्ये घट

देशात केवळ चारचाकी वाहनेच नव्हे तर दुचाकी वाहनांच्या विक्रीमध्ये देखील घट झाली आहे. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स आसोसिएशन्सने याबाबत माहिती दिली आहे. प्राप्त आकडेवारीनुसार सलग चार महिन्यांपासून दुचाकी वाहनांच्या विक्री मध्ये घट सुरूच आहे.

वाहन उद्योग संकटात, सलग चार महिन्यांपासून वाहन विक्रीमध्ये घट
Follow us
| Updated on: Jan 08, 2022 | 6:45 AM

नवी दिल्ली : देशात केवळ चारचाकी वाहनेच नव्हे तर दुचाकी वाहनांच्या विक्रीमध्ये देखील घट झाली आहे. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स आसोसिएशन्सने याबाबत माहिती दिली आहे. प्राप्त आकडेवारीनुसार सलग चार महिन्यांपासून दुचाकी वाहनांच्या विक्री मध्ये घट सुरूच आहे. याचे मुख्य कारण म्हणजे सध्या देशात सेमीकंडक्टर्सचा तुटवडा असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच देशात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे सावट देखील वाहन उद्योगावर निर्माण झाले आहे.

दुचाकींच्या विक्रीमध्ये दह टक्क्यांची घट

‘फाडा’ने सादर केलेल्या आकडेवारीनुसार सप्टेंबर ते डिसेंबर या चार महिन्यांच्या कालावधीमध्ये दुचाकींच्या विक्रीमध्ये जवळपास दहा टक्क्यांची घट झाली आहे. या चार महिन्यांमध्ये जवळपास 45 लाख टुव्हिलरची विक्री झाली. मागीच वर्षी याच काळामध्ये 50 लाख दुचाकींची विक्री झाली होती. दुचाकी, चाकचाकीच नाही तर ट्रॅक्टरच्या विक्रीमध्ये देखील मोठ्याप्रमामात घट झाली आहे. गेल्या चार महिन्यांमध्ये ट्रॅक्टरची विक्री जवळपास सोळा टक्क्यांनी घटली आहे. गेल्या चार महिन्यांमध्ये केवळ 2 लाख 5 हजार ट्रॅक्टरची विक्री झाली. मागील आर्थिक वर्षामध्ये याच काळात 2 लाख 45 हजार ट्रॅक्टरची विक्री झाली होती.

वाहन उद्योगाचे जीडीपीमधील योगदान वाढविण्यासाठी प्रयत्न

भारताच्या जीडीपीमध्ये ऑटोमोबाइल क्षेत्राचे योगदान 7.1 टक्के आहे. या क्षेत्रातून सध्या स्थितीमध्ये तब्बल 3.7 कोटी लोकांना रोजगार मिळतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून वाहनांच्या विक्रीमध्ये सातत्याने घट होत असल्याने हे क्षेत्र संकटात सापडले आहे. जीडीपीमध्ये ऑटोमोबाई क्षेत्राचा टक्का वाढावा तो 7.1 टक्क्यांवरून 12 टक्क्यांवर पोहोचावा यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. तसेच प्रदुषणाला आळा बसावा यासाठी देशात इलेक्ट्रिक कार निर्मितीला देखील प्राधान्य देण्यात येत आहे.

संबंधित बातम्या

PHOTO | टेक्नो मंत्र: ….म्हणून, ‘या’ कारणांसाठी रेल्वेत टाळतात लॅपटॉप चार्जिंग!

LIC IPO च्या दमदार प्रदर्शनासाठी केंद्र सरकारचा टेकू, विमा क्षेत्रात निर्गुंतवणुकीची मात्रा, विदेशी थेट गुंतवणुकदारांना आकर्षित करण्यासाठी सरकारची कसरत

शेअर्स तारण ठेऊन मिळवा कर्ज, देशातील पहिल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर करा व्यवहार 

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.