2030 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था जपानलाही टाकणार मागे; ‘ही’ आहेत प्रमुख कारणे
चालू दशक हे भारताचे दशक आहे. या दशकामध्ये भारताची अर्थव्यवस्था सर्वात वेगवान गतीने वाढणारी अर्थव्यवस्था ठरली आहे. 2030 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था जपानच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकून तिसऱ्या क्रंमाकावर पोहोचू शकते, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
नवी दिल्ली : चालू दशक हे भारताचे दशक आहे. या दशकामध्ये भारताची अर्थव्यवस्था सर्वात वेगवान गतीने वाढणारी अर्थव्यवस्था ठरली आहे. 2030 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था जपानच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकून तिसऱ्या क्रंमाकावर पोहोचू शकते, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. शुक्रवारी ‘आयएचएस मार्केट’च्या वतीने एक अहवाल सादर करण्यात आला आहे. चालू दशकामध्ये भारताची अर्थव्यवस्था अनेक नवे विक्रम गाठणार असल्याचे या अहवालामध्ये म्हटले आहे. नेमके काय म्हटले आहे या अहवालामध्ये पाहुयात
अर्थव्यवस्थेमध्ये तेजीचे संकेत
चालू दशकामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये तेजी कायम राहणार असून, दशकाच्या शेवटी म्हणजेच 2030 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था जपानच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकून जगात तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल असे या अहवालामध्ये म्हटले आहे. तसेच 2030 पर्यंत भारत हा जीडीपीच्या बाबतीत जर्मनी आणि ब्रिटनला मागे टाकू शकतो, असा अंदाज देखील या अहवालामधून वर्तवण्यात आला आहे. भारताची अर्थव्यवस्था सध्या अमेरिका, चीन जपान, जर्मनी आणि ब्रिटन नंतर सहाव्या क्रमांकावर आहे. मात्र लवकरच भारत जपान, जर्मनी, ब्रिटन यांना मागे टाकून जागतिक स्तरावर तिसऱ्या नंबरची सर्वात मोठी अर्थसत्ता होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
अर्थव्यवस्था वाढीची कारणे
या अहवालानुसार चालू आर्थिक वर्षात भारताच्या अर्थव्यवस्थेची मार्केट कॅप ही 2,700 अब्ज डॉलर इतकी आहे. जी 2030 पर्यंत 8,400 अब्ज डॉलरवर पोहोचू शकते. याचाच अर्थ पुढील 9 वर्षांमध्ये भारताची अर्थव्यवस्था तिपटीने वाढण्याचा अंदाज आहे. अर्थव्यवस्थेमध्ये वृद्धी होण्याची अनेक कारणे आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे भारतामध्ये उच्च मध्यवर्गीयांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तसेच लोकसंख्या वाढत असल्याने मोठ्याप्रमाणात मागणी निर्माण झाली आहे. मागणी वाढल्याने मोठ्याप्रमाणात भांडवलाची निर्मिती होते. तसेच येणाऱ्या काळात रोजगारांमध्ये देखील वाढ होण्याची शक्यात आहे. या सर्व कारणांमुळे येणाऱ्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा पहायला मिळू शकते.
संबंधित बातम्या
PHOTO | टेक्नो मंत्र: ….म्हणून, ‘या’ कारणांसाठी रेल्वेत टाळतात लॅपटॉप चार्जिंग!
शेअर्स तारण ठेऊन मिळवा कर्ज, देशातील पहिल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर करा व्यवहार