Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

क्रिप्टो करन्सीचा पुन्हा चमत्कार; गुंतवणूकदारांना केले पुन्हा मालामाल

कॉइन मार्केट कॅप वरील उपलब्ध माहितीनुसार एकता टोकनचे मूल्य 7 दिवसांपूर्वी 0.00000001396 डॉलर होते. ते आता 0.4039 डॉलर एवढे झाले आहे. एका आठवड्यामध्ये हा वेग 2,893,266,376 इतके टक्के होता.

क्रिप्टो करन्सीचा पुन्हा चमत्कार; गुंतवणूकदारांना केले पुन्हा मालामाल
क्रिप्टोकरन्सीबाबत महत्त्वाची माहिती
Follow us
| Updated on: Jan 17, 2022 | 2:54 PM

क्रिप्टो करन्सीच्या युगामध्ये सध्या दमदार तेजी दिसून येत आहे.  एका बाजूला बिटकॉइन (bitcoin) तर दुसऱ्या बाजूला इथेरियम (etherium) यासारखी प्रमुख चलन तर  मिमकॉइन (Memecoin) आणि अल्टकॉइन (Altcoin) ची चर्चा ही जोरदार आहे. दरम्यान अनेक चलनांनी या बाजारात धुमाकूळ घातला आहे. या चलनातील परताव्यांनी डोळ्यांची बुबळ तेवढी बाहेर काढायचे काम बाकी ठेवले आहे.

कॉइनमार्केटकॅप (coinmarketcap) वर उपलब्ध  आकडेवारीनुसार एकता टोकनचे मूल्य

(EktaToken Value) 7 दिवसांपूर्वी  0.00000001396 डॉलर होते, जे नुकतेच 0.4039 डॉलरवर आले आहे. एका आठवड्यात ते 2,893,266,376 टक्क्यांनी वाढले आहे. याचा अर्थ आठवडाभरापूर्वी या टोकनमध्ये कोणी 1000 रुपयांची गुंतवणूक केली असती तर त्याची गुंतवणूक नुकतीच 2,989.32  कोटी रुपयांपर्यंत वाढली असती. सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी हा धक्का पचविणे कमालीचे अवघड आहे. पण हा चलन बाजार सरळमार्गी नाही, या रस्त्यावर धोके आणि अमाप संधी आहेत.

एकताच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, हे एक ब्लॉकचेन (blockchain) आहे, ज्यात सद्यस्थितीतील मालमत्ता (physical assets ) आणि समुदाय (communities) साखळीवर करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येते. हे टोकन लवकरच सार्वजनिक यादीत (Public List)समाविष्ट असेल. आतापर्यंत सीड फंडिंग  आणि खासगी विक्रीतून 5 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त रक्कम जमा करण्यात यश आले आहे.

 क्रिप्टो चलनाने आठवडाभरात आश्चर्यजनक तेजी

नोंदवली (Ekta All Time High)असली तरी क्रिप्टो चलनाना त्याचा मागील सर्वाधिक उच्चाकांचा रेकॉर्ड तोडता आला नाही. हा रेकॉर्ड तोडण्यासाठी क्रिप्टो चलनाला 96 टक्क्यांचा उच्चांकी उसळी मारावी लागले.

 क्रिप्टोची  एमकॅप एवढीच

क्रिप्टोमार्केटमधील या टोकनचा हिस्सा खूप कमी आहे.  त्याची एमकॅप (Ekta Coin MCap) 50 लाख डॉलर्सपेक्षा कमी आहे. आता यामध्ये12,097,924 टोकन पुरवठा सुरू आहे. प्रकल्प तपशीलानुसार, या प्रक्रियेत सध्या जास्तीत जास्त 4,20,00,000 टोकन पुरवले जाऊ शकतात.

VIDEO : Obc Reservation | राज्य सरकार हे नेहमी OBC विरुद्ध आहे – Chandrashekhar Bawankule

Video | मांजरींना कुशीत घेऊन झोपणाऱ्यांनो, हा वनरक्षक बघा! चक्क बिबटेच वनरक्षकाच्या कुशीत शिरले

Flipkart Republic Day Sale 2022 : TCL च्या टॉप क्लास स्मार्ट टीव्हीवर 60 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट, पाहा यादी