विमा कंपनीच्या सेवेवर नाराजी, अशी करा पोर्टेबिलिटी, वैद्यकीय विमा योजनांची तूलना करा, कंपनी बदला 

विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDA) ने विमाधारकांच्या हाती पोर्टेबिलिटीचे प्रभावी अस्त्र दिले आहे. खोटे दावे आणि फसव्या जाहिरातींद्वारे ग्राहकांना लुबाडणा-या आणि सेवेत त्रुटी ठेवणा-या, दावा निपटा-यात उशीर करणा-या अथवा ग्राहकांना मनस्ताप देणा-या विमा कंपन्या यामुळे वठणीवर येत आहे.

विमा कंपनीच्या सेवेवर नाराजी, अशी करा पोर्टेबिलिटी, वैद्यकीय विमा योजनांची तूलना करा, कंपनी बदला 
वैद्यकीय विमा योजना
Follow us
| Updated on: Jan 03, 2022 | 7:47 AM

मोबाईल पोर्टेबिलिटीची (portability) सर्वांनाच एव्हाना माहिती आहे. आरोग्य विमा ही तुम्ही पोर्टेबल करू शकता. सध्याची आरोग्य विमा पुरविणारी कंपनी त्रासदायक आणि डोकेदुखी ठरत असेल तर ग्राहकाला त्याची विमा कंपनी बदलता येते. दुसरी कंपनी विम्याची सुविधा देईल आणि ग्राहकाच्या सुविधेनुसार आरोग्य विमा योजनेत बदल करु शकेल .विशेष बाब म्हणजे एका कंपनीतून दुस-या कंपनीत योजना पोर्ट करताना विमा सुरक्षा आणि सुविधा तशीच असेल. ग्राहकांना मिळणारे फायदे नव्या विमा कंपनीतही मिळतील.

यापूर्वी विमा कंपन्यांची (Health Insurance Company) मनमानी होती. ग्राहकांच्या हिताकडे त्यांचे दुर्लक्ष होते. व्यावसायिकतेचा अभाव होता. सेवेमध्ये त्रुटी होती. विमाधारक समाधानी नसला तरी त्याच्याकडे सक्षम पर्याय नव्हता. आता पॉलिसी पोर्ट धोरणामुळे विमाधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. विद्यमान विमा कंपनीच्या सेवेवर असमाधानी असणारे ग्राहक सरळ पोर्ट पर्याय निवडत आहेत. जूनी आरोग्य तक्रार, बिमारी याविषयी कंपन्यांकडून प्री एक्जिस्टिंग डिजिज(Pre Existing disease)  ही माहिती जमा करुन घेण्यात येत होती. याविषयीच्या नियमात ही बदल झाला आहे.

प्रतिक्षा कालावधीही पोर्ट

नवीन नियमानुसार, जुन्या दुखण्यांसाठी, बिमारीसाठी, आरोग्यविषयक तक्रारींसाठी प्रतिक्षा कालावधी  अथवा विशेष आजारांसाठी प्रतिक्षा काळ नव्या कंपनीत आणि योजनेत पोर्ट होतो. योजना नो क्लेम बोनसमध्ये सुध्दा बदलविता येते.

विमा पोर्टेबिलिटी करताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, विमा योजना सध्यस्थिती सुरु असावी. ती कोणत्याच कारणाने खंडीत अथवा बंद नसावी. पोर्ट करताना ज्या अटी व नियम आहेत, त्या पूर्ण केल्यानंतरच दुस-या कंपनीत तुमची योजना पोर्ट होते.

विमा योजनेला एका कंपनीतून दुस-या आरोग्य विमा योजना सेवा पुरविणा-या कंपनीत पोर्ट करता येत. एकट्याची अथवा कुटुंबाची योजना पोर्ट करता येते. जून्या कंपनीत जितक्या रुपयांची अथवा दावा रक्कमेची योजना असेल, तेवढीच वा त्यात बदल करता येतो.

पॉलिसी पोर्टची प्रक्रिया

पॉलिसी पोर्ट करण्यासाठी 45 दिवसांच्या आत नवीन कंपनीला याविषयीचा अर्ज करावा लागतो. त्यासाठी प्रस्ताव अर्ज (proposal form) भरावा लागतो. अर्जाद्वारे नवीन कंपनीकडे योजना हस्तांतरीत करण्यासाठी विनंती करावी लागते. अर्जात ज्या आरोग्य विमा सेवा पुरविणा-या कंपनीची सेवा नकोय, तिची माहिती द्यावी लागते. पोर्टिंगनंतर लगेचच पॉलिसी नूतनीकरणाची (renewal) प्रक्रिया पूर्ण करावी लागते. त्यासाठी ग्राहकाला 30 दिवसांचा अधिकचा कालावधी देण्यात येतो.

प्रस्तावासोबत विमाधारकाचे नाव आणि अन्य सविस्तर माहिती द्यावी लागते. विम्याविषयी ही माहिती द्यावी लागते. या अर्जासोबत विमा योजना नुतनीकरणासाठीची नोटीस, विम्यावर बोनस नको असेल तर त्याविषयीचा अर्ज, मागील आरोग्य तक्रारींची माहिती, त्यावरील उपचार याविषयीची माहिती द्यावी लागते.

नवीन कंपनी अर्ज आणि कागदपत्रांची शहानिशा करते. तसेच पोर्टिंग विनंती स्वीकारावी की नाकारावी याविषयीचा निर्णय घेते. याविषयीची शहानिशा झाल्यानंतर कंपनी आरोग्य विमा पोर्टिंगची अनुमती देते. ग्राहक विद्यमान आरोग्य विमा कंपनीच्या सेवेबाबत समाधानी नसेल तर तो दुस-या कंपनीकडे विमा योजना पोर्टेबिलिटीसाठी अर्ज दाखल करु शकतो.

संबंधित बातम्या : 

गुंतवणुकीची योग्य वेळ: एफडीवर सर्वाधिक व्याज, ‘5’ बँकांची आकर्षक ऑफर

असंघटित कामगारांसाठी ई-श्रम कार्ड, नोंदणीची शेवटची तारीख काय, तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.