घर स्वप्नातलं: स्वस्त दराने गृह कर्ज, अॕपद्वारे घरबसल्या मिळवा!
नवी मोबाईल अॕपवर सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील आणि तपशील पूर्ण करणे गरजेचे असेल. तुम्ही अॕप वर दिलेल्या माहितीच्या आधारेच तुमची पात्रता निश्चित होईल आणि त्यानुसार तुम्हाला गृह कर्ज रक्कम आणि मासिक हफ्त्याचे पर्याय दिले जातील. तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार कर्ज रक्कम आणि हफ्ता देय पर्याय निवडू शकतात.
नवी दिल्ली : रिझर्व्ह बैंक ऑफ इंडियाकडे (Reserve Bank of India) नोंदणीकृत बिगर बँकिंग वित्तीय संस्था नवी फिनसर्व (Navi Finserv) ग्राहकांसाठी गृह कर्ज प्रदान करणार आहे. तुम्हाला प्रत्यक्ष फिनसर्व्हच्या कार्यालयात जण्याची आवश्यकता नाही. केवळ नावी अॕप (NAVI App) द्वारे सुलभपणे कर्ज प्राप्त करू शकाल. नावी फिनसर्व्हचे सचिन बन्सल यांनी कोणत्याही व्यक्तीला बँकेच्या शाखेत न जाता थेट अॕपवर कर्ज घेता येणार आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार अॕप वरुन करण्यात येणाऱ्या कर्ज प्रक्रियेला परंपरागत बँकेपेक्षा अत्यंत कमी कालावधी लागेल. नवी फिनसर्व्हच्या गृह कर्जाच्या व्याजदराला 6.46 टक्क्यांपासून सुरुवात होणारृ आहे. सध्या अन्य बँकाद्वारे प्रदान करण्यात येणाऱ्या गृहकर्जाच्या तुलनेत अत्यल्प आहे.
20 लाख ते 5 कोटींपर्यंत लोन
मनी कंट्रोलच्या एका अहवालानुसार, फिनसर्व्ह 20 लाखांपासून 5 कोटींपर्यंत गृह कर्ज देणार आहे. कर्ज 25 वर्षांच्या मुदतीसाठी असणार आहे. नवी फिनसर्व्ह सध्या दिल्ली, गुरुग्राम, बंगळुरु, चेन्नई, म्हैसूर, हुबळी,दावणगिरे,गुलबर्गा शहरात कर्ज सेवा देत आहे. कंपनी लवकरच मुंबई व पुण्यात सेवा सुरू करण्याची शक्यता आहे.
सर्वोत्तम रेकॉर्ड, कमी व्याज!
स्थिर उत्पन्न, क्रेडिट स्कोअर सर्वोत्तम आणि कर्ज परतफेडीचा रेकॉर्ड यावर कर्जाचा व्याजदर निश्चित होणार आहे. तीन निकषांची योग्य पूर्तता करणाऱ्यांना 6.46 टक्क्यांपर्यंत व्याज मिळेल. वित्तीय रेकॉर्ड सर्वोत्तम असणाऱ्या ग्राहकांसाठी नवी फिनसर्व्हची पॉलिसी हितकारक ठरेल.
गृह कर्ज घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची फी भरावी लागणार नाही. सर्वसाधारणपणे कर्ज घेण्यासाठी प्रक्रिया शुल्क, प्रशासकीय शुल्क, केंद्रीय शुल्क आदी शुल्कांची आकारणी केली जाते.
नेमकी प्रक्रिया कशी?
नवी मोबाईल अॕपवर सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील आणि तपशील पूर्ण करणे गरजेचे असेल. तुम्ही अॕप वर दिलेल्या माहितीच्या आधारेच तुमची पात्रता निश्चित होईल आणि त्यानुसार तुम्हाला गृह कर्ज रक्कम आणि मासिक हफ्त्याचे पर्याय दिले जातील. तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार कर्ज रक्कम आणि हफ्ता देय पर्याय निवडू शकतात.
कर्ज घेतल्यानंतर मासिक स्वरुपात तुमच्या खात्यातून रक्कम कपात होईल. नावी अॕपवर ग्राहकांनी हवी असलेली सर्व माहिती उपलब्ध आहे. ईएमआय तपशील, हफ्ता रक्कम, मासिक हफ्ता तारीख आदी माहिती असेल. तुम्ही अधिक माहितीसाठी नवी फिनसर्व्ह वेबसाईटचा संदर्भ घेऊ शकतात.
इतर बातम्या :