ITR फाईल करण्यासाठी उरले अवघे काही तास; मुदतवाढ मिळणार नाही, अर्थ मंत्रालयाकडून स्पष्ट

अर्थ खात्याचे सचिव तरुण बजाज म्हणाले की, ITR भरण्याचं काम आरामात आणि सातत्याने चालू आहे. मोठ्या संख्येनं आयकर रिटर्न दाखल करण्यात आले आहेत. अशावेळी लोक ITR भरण्यासाठी तारीख वाढवण्याचा दावा का करत आहेत माहिती नाही. ITR भरण्याची अंतिम तारीख आज आहे आणि ती वाढवण्याबाबत अद्याप कुठलाही प्रस्ताव नाही.

ITR फाईल करण्यासाठी उरले अवघे काही तास; मुदतवाढ मिळणार नाही, अर्थ मंत्रालयाकडून स्पष्ट
आयकर परतावा
Follow us
| Updated on: Dec 31, 2021 | 6:21 PM

मुंबई : तुम्ही आयकर परतावा (Income Tax Return) अर्थात आयटीआर (ITR) फाईल केला नसेल तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्वाची बातमी आहे. ITR भारण्याची अंतीम तारीख 31 डिसेंबर 2021 असेल असं अर्थ मंत्रालयाकडून (Finance Ministry) आज स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे ही तारीख वाढवण्याचा सरकारचा कुठलाही विचार नसल्याचं आता दिसून येत आहे.

जीएसटी परिषदेच्या बैठकीनंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना अर्थ खात्याचे सचिव तरुण बजाज म्हणाले की, ITR भरण्याचं काम आरामात आणि सातत्याने चालू आहे. मोठ्या संख्येनं आयकर रिटर्न दाखल करण्यात आले आहेत. अशावेळी लोक ITR भरण्यासाठी तारीख वाढवण्याचा दावा का करत आहेत माहिती नाही. ITR भरण्याची अंतिम तारीख आज आहे आणि ती वाढवण्याबाबत अद्याप कुठलाही प्रस्ताव नाही.

दुपारी 3 पर्यंत 5.62 कोटी रिटर्न

31 डिसेंबर रोजी दुपारी 3 पर्यंत एकूण 5.62 कोटी आयकर रिटर्न दाखल करण्यात आले आहेत. त्यात शुक्रवारी एका दिवसात 20 लाखापेक्षा अधिक आयकर रिटर्न दाखल झाले आहेत. दर दुपारी 2 ते 3 दरम्यान जवळपास 3 लाख 44 हजार रिटर्न फाईल करण्यात आले असल्याची माहिती बजाज यांनी दिलीय.

60 लाख अधिक रिटर्न दाखल

मागील वर्षाची तुलना केली तर यावेळी 60 लाख अधिक रिटर्न दाखल झाले आहेत. 30 डिसेंबर 2020 च्या शेवटी एकूण 4 कोटी 83 लाख रिटर्न फाईल झाले होते. तर यावर्षी 30 डिसेंबर पर्यंत 5 कोटी 43 लाख रिटर्न दाखल झाले आहेत. कोरोना प्रादुर्भावामुळे मागील वर्षीही 31 डिसेंबर पर्यंत आयकर रिटर्न दाखल करण्यात आले होते.

…तर मध्यरात्रीपासून भरावा लागणार 5 हजारांचा दंड

करदात्यांना आज रात्री बारा वाजेपर्यंत इनकम टॅक्स रिटर्न दाखल करता येणार आहे. त्यानंतर मात्र 5000 रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. आर्थिक वर्ष 2019-20 साठी दंडाची रक्कम दहा हजार रुपये होती. मात्र 2020-21 वर्षासाठी त्यामध्ये कपात करून ती पाच हजार रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. ज्यांचे वार्षीक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा अधिक आहे, अशा सर्वांनी इनकम टॅक्स रिटर्न दाखल करणे आवशक असते.

इनकम टॅक्स रिटर्न भरण्याचे फायदे

जर तुम्हाला एखाद्या बँकेतून लोन मिळवायचे असेल तर तुमच्याकडे आयटीआर मागितला जातो, हा आयटीआर तुमच्या कमाईचा पुरावा असतो. तुमचे वार्षिक उत्पन्न किती आहे, याचा अंदाज बँकांना येतो आणि त्याच आधारावर तुमच्या लोनची रक्कम ठरवली जाते. तुम्ही जर नियमीतपणे आयटीआर भरत असाल तर तुम्हाला कुठल्याही बँकेकडून सहज लोन मिळू शकते. तसेच तुम्हाला जर तुमच्या विमा पॉलिसीची रक्कम वाढवायची असेल तर तुमच्याकडे आयटीआरची मागणी होते. समजा तुम्हाला जर तुमच्या विमा पॉलिसीचे कव्हर एक कोटीपर्यंत वाढवायचे आहे, तर अशा स्थितीमध्ये विमा अधिकारी तुमच्याकडे आयटीआरची मागणी करतात. यामधून तुमचे उत्पन्नाचे स्त्रोत काय काय आहेत? तुम्ही विम्याची रक्कम भरण्यासाठी सक्षम आहात का हे पाहीले जाते.

इतर बातम्या :

जीएसटी परिषदेच्या 46 व्या बैठकीला सुरुवात, अर्थमंत्री निर्मला सितारमण यांची उपस्थिती; महत्त्वपूर्ण विषयांवर निर्णयाची शक्यता

अधिक चांगला परतावा पाहिजे?, तर नवीन वर्षात ‘या’ योजनांमध्ये करा गुंतवणूक

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.