आयपीओ ट्रॅकर: 23 कंपन्या 44 हजार कोटी, मार्च तिमाहीत गुंतवणुकीची बंपर संधी!

तंत्रज्ञान कंपन्या जागतिक विस्ताराच्या तयारीत आहे. कंपन्यांना अधिक निधीची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे आयपीओच्या मार्गे उभारण्यात येणाऱ्या रकमेतून आवश्यक निधी उभारणीचे धोरण असल्याचे LearnApp.com संस्थापक आणि सीईओ प्रतीक सिंग यांनी म्हटले आहे.

आयपीओ ट्रॅकर: 23 कंपन्या 44 हजार कोटी, मार्च तिमाहीत गुंतवणुकीची बंपर संधी!
गुंतवणूक हजारात, रिटर्न लाखात; शेअर फसवणुकीचा ‘सोशल’ पॅटर्न!
Follow us
| Updated on: Jan 02, 2022 | 7:50 PM

नवी दिल्ली- नव्या वर्षात आयपीओचा डंका राहण्याची शक्यता आहे. पहिल्या तिमाहीत 24 कंपन्या आयपीओद्वारे 44 हजार कोटी रुपये उभारण्याची शक्यता आहे. वर्ष 2021 प्रमाणेचं नव्या वर्षात आयपीओचं वर्चस्व कायम राहण्याची शक्यता आहे. तंत्रज्ञान आधारित कंपन्यांचा यामध्ये अधिक सहभागाची शक्यता वर्तविली जात आहे.

कोविड प्रकोपामुळे अर्थचक्र मंदावली होती. गेल्या वर्षी शेअर बाजारात मोठी पडझड पाहायला मिळाली. मात्र, वर्ष 2021 मध्ये इनिशियल पब्लिक ऑफरिंग्सद्वारे (IPO) 63 कंपन्यांनी तब्बल 1.2 लाख कोटी रुपये उभारले. या फर्म्स शिवाय, पॉवरग्रिड इन्व्हेस्टरने आयपीओ मार्फत 7 हजार 335 कोटी उभारले. तर बुकफिल्ड इंडियन रिअल इस्टेट ट्रस्टने REIT मार्फत (रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट) मार्फत 3 हजार 800 कोटी रुपये उभारले.

अतिरिक्त तरलता, सूचीबद्धतेत वाढ आणि रिटेल इन्व्हेस्टरचा मोठा सहभाग या तीन कारणांमुळे आयपीओ मार्केटमध्ये तेजीचं वातावरण पाहायला मिळालं. मार्च तिमाहीत आयपीओ द्वारे पैसे उभारण्याची शक्यता असलेल्या फंडमध्ये आघाडीची हॉटेल कंपनी ओयो (8340 कोटी) आणि साखळी पुरवठ्यातील कंपनी डिल्हीवेरी (7460 कोटी) सहभाग असण्याची शक्यता आहे

आयपीओ ट्रॅकर : दृष्टीक्षेपात गुंतवणूक

o ओयो (Oyo)- 8,340 कोटी o डिल्हीवेरी (Delhivery)- 7,460 कोटी o अदानी विल्मर (Adani Wilmar) – 4,500 कोटी o एमक्युअर फार्मास्युटिकल्स (Emcure Pharmaceuticals) – 4,000 कोटी o वेदांत फॅशन्स (Vedant Fashions) – 2,500 कोटी o प्रदीप फॉस्पेट (Paradeep Phosphates) – 2,200 कोटी o मेदांता ( Medanta ) – 2,000 कोटी o लक्सिगो (Ixigo)- 1,800 कोटी

तंत्रज्ञान कंपन्यांची आघाडी-

तंत्रज्ञान कंपन्या जागतिक विस्ताराच्या तयारीत आहे. कंपन्यांना अधिक निधीची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे आयपीओच्या मार्गे उभारण्यात येणाऱ्या रकमेतून आवश्यक निधी उभारणीचे धोरण असल्याचे LearnApp.com संस्थापक आणि सीईओ प्रतीक सिंग यांनी म्हटले आहे. या कंपन्यांमधील अँकर इन्व्हेस्टर आकर्षक ऑफर मिळविण्याच्या प्रतीक्षेत आहेत. सूचीबद्धतेच्या दिवशी स्टॉक किंमतीत अधिक तरलतेचा सामना करावा लागत आहे. यावर मार्ग काढण्यासाठी बाजार नियंत्रक सेबीने आयपीओ बाजारात संनियंत्रणासाठी कठोर पावले उचलली आहेत.

आयपीओ म्हणजे काय? आयपीओ म्हणजे इनिशियल पब्लिक आॕफर. कंपनीद्वारे मार्केटमध्ये पैसे गोळा/उभारण्याचा आयपीओ महत्वाचा मार्ग आहे.

संबंधित बातम्या: Mumbai corona update : मुंबईत आजही कोरोना रुग्णांची स्फोटक वाढ, तब्बल 8 हजार 63 नवे रुग्ण पालिकेच्या सत्तेची खुर्ची डळमळली तेव्हा मुंबई”करां”ची आठवण झाली!, मालमत्ता कराच्या निर्णयावरुन शेलारांचा घणाघात ‘दुसरी बायको!’ असं कुठं नाव असतंय व्हंय दुकानाचं? चेष्ठा न्हाय लेका, कराडमध्ये असतंय, ते बी सलूनचं!

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.