Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Income Tax Return : चुकीला ‘एकदा’ माफी; 31 डिसेंबरची मुदत टळली, तुमच्यासमोरीला ‘हा’ पर्याय!

वित्तीय वर्षात आयटीआर दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर विलंबित आयटीआर दाखल करण्याचा पर्याय शिल्लक राहतो. मात्र, त्यासाठी तुम्हाला दंडात्मक शुल्काचा भुर्दंड सहन करावा लागेल. वित्तीय वर्ष 2020-21साठी विलंबित आयटीआर दाखल करण्याची मुदत 31 मार्च 2022पर्यंत आहे.

Income Tax Return : चुकीला ‘एकदा’ माफी; 31 डिसेंबरची मुदत टळली, तुमच्यासमोरीला ‘हा’ पर्याय!
इनकम टॅक्स भरण्याआधी काही गोष्टी जाणून घ्यायला हव्यात.
Follow us
| Updated on: Jan 05, 2022 | 5:38 PM

नवी दिल्ली : वित्तीय वर्ष 2020-21साठी आयकर विवरण पत्र (ITR) दाखल करण्याची मुदत नुकतीच संपली आहे. आयकर विभागाने 31 डिसेंबर 2021 अखरेची मुदत निश्चित केली होती. मात्र, वित्तीय वर्ष 2020-21साठी आयटीआर दाखल करण्याचे सर्व पर्याय संपले असे होत नाही. तुम्ही अंतिम मुदतीअखेर आयटीआर दाखल केला नसल्यास तुम्ही ‘विलंबित आयटीआर’ दाखल करू शकतात.

कोणत्याही वित्तीय वर्षात आयटीआर दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर विलंबित आयटीआर दाखल करण्याचा पर्याय शिल्लक राहतो. मात्र, त्यासाठी तुम्हाला दंडात्मक शुल्काचा भुर्दंड सहन करावा लागेल. वित्तीय वर्ष 2020-21साठी विलंबित आयटीआर दाखल करण्याची मुदत 31 मार्च 2022पर्यंत आहे.

दंडात्मक शुल्क किती? आयकर अधिनियम कलम 139 (1)अन्वये विहित मुदतीत आयटीआर दाखल न केल्यास कलम 234F अंतर्गत विलंबित शुल्क देय करावे लागते. तरतुदीनुसार 31 मार्च 2022पर्यंत 5000 रुपयांपर्यंतच्या दंडात्मक शुल्कासहित आयटीआर दाखल करता येऊ शकतो. यापूर्वी 10,000 रुपयांचे दंडात्मक शुल्क आकारले जात होते. जर करदात्याचे एकूण उत्पन्न पाच लाखांपेक्षा अधिक असल्यास एक हजार रुपयांचे दंडात्मक शुल्क अदा करावे लागेल.

महत्त्वाचे अपडेट्स दृष्टीक्षेपात : – वित्तीय वर्ष 2020-21साठी आयटीआर दाखल करण्याची मुदत 31 डिसेंबरला संपली – दंडात्मक शुल्कासहित विलंबित आयटीआर दाखल करण्याची मुदत 31 मार्च 2022 – विलंबित आयटीआरसाठी दंडात्मक शुल्क पाच हजार रुपये – पूर्वी दाखल केलेल्या मात्र सुधारित आयटीआरसाठी मुदत 31 मार्च 2021

चुकीला एकदाच माफी! आयकर विवरण पत्र दाखल करण्यात चूक झाल्यास करदात्याला सुधारित स्वरुपात आयटीआर दाखल करण्याची संधी उपलब्ध असते. चालू वर्षी (वित्तीय वर्ष 2020-21)साठी सुधारित आयकर विवरण पत्र दाखल करण्याची अखेरची मुदत 31 मार्च 2022 पर्यंत आहे. चालू वित्तीय वर्षात 2020-21साठी विलंबित आणि सुधारित आयकर विवरण पत्र दाखल करण्याची मुदत 31 मार्च 2021पर्यंतच आहे. त्यामुळे अखेरच्या क्षणी दाखल केलेल्या विलंबित आयटीआर साठी सुधारित आयटीआर दाखल करणे शक्य ठरणार नाही.

फक्त 634 रुपयांमध्ये मिळणार हा LPG सिलिंडर, वजनाला ही हलका, ने-आण करण्यासाठी येणार नाही कुठली ही अडचण

LIC स्वस्तात मस्त पॉलिसी: 28 रुपयांची बचत, 2 लाखांचा लाभ; जाणून घ्या फायदे

Share Market | शेअर मार्केटच्या 5 गोष्टी, ज्यावर आज दिवसभर लक्ष ठेवायलाच हवं

बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे.
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने.
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम.
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी.
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले.
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी.
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे.
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला.
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन.