Gold Price Today : दिल्लीत सोने ‘सर्वोच्च’ भावाच्या दिशेने, महाराष्ट्रातही सोन्याला झळाळी; 400 रुपयांची वाढ
सलग तिसऱ्या दिवशी राजधानी दिल्लीत सोने-चांदीच्या भाव वाढीचा आलेख चढाच राहिला. सर्वोच्च भावाच्या दिशेने सोन्याची वाटचाल सुरू असून आज 52 हजारांचा टप्पा पार केला. दिल्लीत 24 कॅरेट सोन्याला (DELHI GOLD RATE) प्रति तोळा 52040 रुपये भाव मिळाला तर 22 कॅरेट सोने प्रति तोळे 47700 रुपयांवर पोहोचले.
नवी दिल्ली : सलग तिसऱ्या दिवशी राजधानी दिल्लीत सोने-चांदीच्या भाव वाढीचा आलेख चढाच राहिला. सर्वोच्च भावाच्या दिशेने सोन्याची वाटचाल सुरू असून आज 52 हजारांचा टप्पा पार केला. दिल्लीत 24 कॅरेट सोन्याला (DELHI GOLD RATE) प्रति तोळा 52040 रुपये भाव मिळाला तर 22 कॅरेट सोने प्रति तोळे 47700 रुपयांवर पोहोचले. आर्थिक राजधानी मुंबईत 24 कॅरेट सोन्याला प्रति तोळा 49590 रुपये भाव (MUBAI GOLD RATE) मिळाला तर 22 कॅरेट सोने प्रति तोळे 47590 रुपयांवर पोहोचले. मुंबईखालोखाल पुण्यातही सोन्याची भाववाढ नोंदविली गेली. उपराजधानी नागपूरमध्ये (NAGPUR GOLD RATE) 24 कॅरेट सोने 49590 रुपयांवर पोहोचले. कालच्या (बुधवार) तुलनेत राजधानी दिल्लीत 540 रुपये तर महाराष्ट्रातील प्रमुख शहरात सोन्याच्या भावात 400 रुपयांहून अधिक भाववाढ नोंदविली गेली. त्यामुळे सोने गुंतवणूकदारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
देशातील प्रमुख शहरांसह महाराष्ट्रातील सोने-चांदीच्या वास्तविक वेळेतील भाव देणाऱ्या ‘गूडरिटर्न्स बेवसाईट’वरील आजचे ताजे भाव-
महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील 24 कॅरेटचे दर :
• मुंबई- 49590 रुपये (430वाढ) • पुणे- 49370 रुपये (450वाढ) • नागपूर- 49590 रुपये (430वाढ) • नाशिक- 49370 रुपये (450वाढ)
महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील 22 कॅरेटचे दर:
• मुंबई- 47590 रुपये • पुणे- 46830 रुपये • नागपूर- 47590 रुपये • नाशिक- 46830 रुपये
आर्थिक तज्ज्ञांचं भाकीत:
सोने गुंतवणूक सुरक्षिततेचा पर्याय मानला जातो. सलग तीन दिवस दिल्लीत सोन्याला मोठी उसळी मिळत आहे. प्रति दिवस पाचशे रुपयांहून अधिक भाववाढ नोंदविली जात आहे. त्यामुळे अर्थतज्ज्ञांची सोने 55 हजारांचा टप्पा पार करणार असल्याचे भाकीत प्रत्यक्षात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच महाराष्ट्रातील प्रमुख शहरात सोने भाववाढीचा आलेख चढाच राहिला आहे.
सोन्याचे भाव एका मिस्ड् कॉलवर:
तुम्ही घरबसल्या सोन्याचे भाव मिळवू शकतात. 8955664433 या क्रमांवर मिस्ड् कॉल देण्याद्वारे तुम्हाला मेसेज प्राप्त होतील. तुम्ही प्रमुख शहरातील सोन्याचे भाव तपासू शकतात.
सोन्याची शुद्धता ‘अॅप’ वर?
केंद्रीय ग्राहक आणि अन्न मंत्रालयाने BIS-केअर मोबाईल अॅप लाँच केलं आहे. या अॅपद्वारे सोनं खरंच किती शुद्ध आहे, याबाबतची माहिती मिळणार आहे. त्यामुळे सोन्यात इतर धातूंच मिश्रण करुन लुबाडणाऱ्यांना चांगलाचा धडा मिळणार आहे. सोनं कितपत शुद्ध आहे, याची खरंच योग्य माहिती दिली तर या अॅपला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे (BIS care app will tell how pure is gold).