AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

New ITR filing: सुधारित आयकर विवरणपत्रासाठी किती रिकामा होईल खिसा?

सुधारित आयकर विवरणपत्रासाठीची संधी करदात्यांना मिळाली खरी, पण तुमची शिरजोरी वाढू न देण्यासाठी हा खुषकीचा राजमार्ग आहे, ही पळवाट नाही. आर्थिक कारवाई टाळण्यासाठी म्हणाल तर ही शेवटची संधी आहे.

New ITR filing: सुधारित आयकर विवरणपत्रासाठी किती रिकामा होईल खिसा?
इनकम टॅक्स भरण्याआधी काही गोष्टी जाणून घ्यायला हव्यात.
Follow us
| Updated on: Feb 02, 2022 | 3:38 PM

नवी दिल्लीः ‘युद्धात जिंकले आणि तहात हारु नका, असाच मोलाचा सल्ला जणू कर थकविणाऱ्यांना अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर करताना दिला आहे. शिवाय एक सुधारित आयकर विवरणपत्र भरण्याची संधीही करदात्यांना मिळाली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitaraman) यांनी केंद्रीय अर्थसंकल्प 2022 सादर करताना आयकर कर रचनेत कोणताही बदल करण्याची घोषणा केलेली नाही. मात्र, सुधारित आयकर विवरणपत्र (ITR) भरणाऱ्यांना अर्थमंत्र्यांनी काहीसा दिलासा दिला आहे. कर भरण्यास टाळाटाळ करणाऱ्यांना ही एक अमूल्य संधी आहे. ‘गंगाजल प्या, पवित्र व्हा’ असा हा प्रकार आहे. अतिरिक्त कर भरण्यासाठी दोन वर्षांची सवलत देण्यात आली आहे. याकाळात सरकार दरबारी गंगाजळी भरुन तुम्हाला शुचिर्भूत होता येईल. तुमच्या वर करबुडव्या म्हणून बसू पाहणारा ठपका दूर होईल.

थकबाकी दूर करण्याची संधी

कर थकबाकी दूर करण्याची संधी केंद्राने उपलब्ध करून दिली आहे. करदात्यांनी अतिरिक्त कर भरल्यावर अद्ययावत विवरणपत्र भरण्याची मुभा देणारी नवी तरतूद अर्थमंत्र्यांनी प्रस्तावित केली आहे. हे अद्ययावत विवरणपत्र संबंधित मूल्यांकन वर्षाच्या अखेरीपासून दोन वर्षांच्या आत भरता येईल,’ असे सीतारामन यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात म्हटले आहे.

किती पैसे मोजावे लागतील?

अद्ययावत आयकर विवरणपत्र भरण्यासाठी किती पैसे मोजावे लागतील कर आणि सादर केलेल्या अतिरिक्त उत्पन्नावर देय असलेल्या व्याजावर अतिरिक्त कर म्हणून 25 टक्के किंवा 50 टक्के इतकी रक्कम भरणे आवश्यक आहे, असे अर्थसंकल्पीय निवेदनात अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे.अशा अतिरिक्त उत्पन्नाचा अहवाल देताना करदात्याला अतिरिक्त कर भरावा लागेल. अर्थात आयती चालून आलेली ही संधी सहजासहजी मिळणार नाही. त्यासाठी रग्गड पैसा मोजावा लागले. तरच करचुकवेगिरीच्या जोखडातून करदात्यांना मुक्त होता येईल. त्यासाठी त्यांना पहिल्या वर्षात 25% तर पुन्हा विलंब केल्यास 24 वर्षात 50 % आयटीआर सादर करावा लागेल. आयटीआर सादर करताना देय असलेल्या कर आणि व्याजाच्या टक्केवारीच्या दृष्टीने लागू असलेली अतिरिक्त रक्कम भरावी लागेल असे कर तज्ज्ञ बलवंत जैन यांनी मिंटशी बोलताना सांगितले.

करदाते आणि सरकारचा फायदा

वार्षिक माहिती विवरणपत्र (AIS) लागू झाल्याने पूर्ण कर भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या करदात्यांच्या मनात भीतीची भावना निर्माण झाली आहे, ज्या करदात्यांनी आपले उत्पन्न पूर्णपणे जाहीर केले नाही किंवा ज्या क्षेत्रात कर भरण्याविषयीची जागरुकता नाही, अशा ठिकाणी करदाते हुडकणे, त्यांचा माग काढणे अवघड आहे. त्यामुळे सरकार कर थकविणाऱ्यांना ही संधी उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे करदात्यांचा आणि सरकार या दोघांचा फायदा होईल.

पुरावा जोडणे आवश्यक

सर्व करदात्यांना कर विवरणपत्र भरण्याच्या निश्चित तारखेपासून पाच महिन्यांच्या मर्यादित विंडोमध्ये कर विवरणपत्रात सुधारणा करण्याचा मार्ग उपलब्ध असताना, आता संबंधित मूल्यांकन वर्ष संपल्यापासून दोन वर्षांच्या कालावधीत अद्ययावत विवरणपत्र भरता येणार आहे. अतिरिक्त तोटा किंवा कर दायित्वात घट नोंदविण्यासाठी अद्ययावत विवरणपत्र दाखल केले जाऊ शकत नाही. अद्ययावत आयकर विवरणपत्र भरण्यापूर्वी कर भरावा लागतो आणि रिटर्न भरताना त्या प्रमाणात पुरावा जोडणे आवश्यक आहे.

इतर बातम्याः

Nashik | प्रारूप प्रभाग रचनेत धक्क्यावर धक्के, अनेक नगरसेवक गॅसवर; महापौरांनाही जोर का झटका धीरे से…

टेन्शन खल्लास, नाशिक जिल्ह्यात अंगणवाडी केंद्रातच काढून मिळेल मुलांचे आधार कार्ड; काय आहे योजना?

Nashik | ‘महाडीबीटी’ पोर्टल संथ, विद्यार्थी हैराण; शिष्यवृत्तीसाठी कधीपर्यंत करता येणार अर्ज?

पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!
पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!.
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला.
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री.
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं.
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी.
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले.
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?.
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय.
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर.
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?.