Financial Sector | नव्या वर्षामध्ये कुठे होईल बक्कळ कमाई, कुठे टाळता येईल नुकसान; गुंतवणुकीला स्मार्टनेसची जोड

2021 मधील कॅलेंडरचे शेवटचे पान  उलटण्यासाठी आता काहीसा अवधी बाकी आहे. कोरोना (Corona) महामारीचा सर्वाधिक फटका या वर्षात बसला. मात्र आर्थिक क्षेत्रावर याचा कमी प्रभाव जाणवला. या संसर्गजन्य रोगामुळे आर्थिक क्षेत्रातही मोठ्या उलाढाली झाल्या आणि कायापालट झाला. येत्या नवीन वर्षात फायनान्शिअल सेक्टर (Financial Sector) कडून  चांगल्या कामगिरीची आशा आहे.

Financial Sector | नव्या वर्षामध्ये कुठे होईल बक्कळ कमाई, कुठे टाळता येईल नुकसान; गुंतवणुकीला स्मार्टनेसची जोड
प्रातिनिधीक फोटो (इकॉनामीक टाईम्स)
Follow us
| Updated on: Dec 31, 2021 | 4:53 PM

म्हणता म्हणता कॅलेंडरची पानं झपाट्याने उलटत गेली आणि  आज या वर्षातला शेवटचा दिवस संपायला ही काहीसा वेळ बाकी आहे.  फायनान्शियल मार्केटवर कोरोनाचा फार मोठा प्रभाव दिसून आला नाही. शेअर बाजाराने ही चांगली कामगिरी बजावली. काही शेअर्सनी तर चांगला परतावा ही दिला आहे. सोन्याने थोडीशी निराशा केली असली तरी आर्थिक क्षेत्रात आशावादी चित्र होते. नवीन वर्षात आर्थिक क्षेत्रात काय घडामोडी घडतील आणि आर्थिक क्षेत्रात काय प्रगती होऊ शकते चला तर जाणून घेऊयात.

मुदत ठेव योजना फायद्याची (FD)

हे नवीन वर्ष मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी चांगले राहण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी मुदत ठेव योजनेमध्ये 5.1 टक्के परतावा मिळाला होता. महागाई दर आजच्या इतकाच राहिला अथवा महागाई यापेक्षा वाढली तर बँकांना मुदत ठेव योजनेवर व्याजदर वाढवावा लागेल. त्यामुळे मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांचा फायदा होऊ शकतो. चांगल्या व्याजदरासाठी तुम्ही सध्याची एफडी जर मोडली तर त्यावर तुम्हाला दंड लागू शकतो. तेव्हा नवीन व्याज दरासाठी एफडी सुरू करायची असेल तर  तुम्हाला याविषयीची संपूर्ण माहिती घ्यावी लागेल.

शेअर मार्केट (Share Market)

नवीन वर्षात शेअर मार्केटमध्ये प्रचंड उलथापालथ होण्याची शक्यता आहे. या वर्षी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE)मध्ये 20 टक्क्यांची वाढ दिसून आली तर दुसरीकडे अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने इझी मनी पोलिसी बंद करण्याचा आणि व्याजदर वाढविण्याचा निर्णय घेतल्यास परदेशी संस्थागत गुंतवणूकदार (FII) शेअर मार्केटमधील कमी जोखमीच्या शेअरमध्ये  गुंतवणूक वाढविण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम रुपयांवर दिसू शकतो. रुपयांचे अवमूल्यन होऊ शकते. ओमायक्रॉनचा प्रभाव जर वाढला तर त्याचा शेअर मार्केटवर थेट परिणाम दिसेल. अशावेळी गुंतवणूकदारांनी ब्लू चिप (Blue Chip) आणि लार्ज कॅप स्टॉकमध्ये (Large Cap Stock) थांबणे हितकारक राहील.

 बॉण्ड (Bond)

जर व्याजदर अशाच प्रमाणात वाढले तर गुंतवणूकदार अधिक व्याज दरासाठी आणि अधिक परताव्यासाठी बॉण्डकडे वळू शकतात. यंदा दहा वर्ष पूर्ण झालेल्या बॉण्डवर 6.5 टक्के व्याज दर मिळाला होता. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार गुंतवणूकदार कमी कालावधीच्या  बॉण्डकडे वळू शकतात. यावर्षी बाजारामध्ये मोठी उलाढाल आणि उलथापालथ बघायला मिळू शकते.

सोने (Gold)

2021 मध्ये सोन्याने -5 टक्के परतावा दिला होता. यंदा शेअर मार्केटमध्ये प्रचंड चढ-उतार होण्याची संभावना होण्याची शक्यता लक्षात घेत सोन्याच्या किमतीत तेजी बघायला मिळू शकते. अमेरिकेमध्ये व्याजदर वाढल्यास डॉलर मजबूत होईल त्याचा परिणाम सोन्यावर दिसून येईल. भारतीय रुपयाचे अवमूल्यन आणि वाढती महागाई याचा परिणाम सोन्यावर दिसून येईल. गेल्यावर्षी पेक्षाही सोने भाव खाऊन जाण्याची दाट शक्यता आहे

म्युच्युअल फंड (Mutual Fund)

NGen Markets च्या माहितीनुसार 2021 मध्ये कमी कालावधीच्या म्युच्युअल फंड्स 4.8 टक्के परतावा दिला होता. तर हायब्रीड  फंडांनी 8.6 टक्केंचा परतावा दिला होता. तर लार्ज कॅप( Large Cap)म्युच्युअल फंडांनी 26 टक्के परतावा दिला होता. यंदाच्या वर्षी यावर्षी सर्वच म्युच्युअल फंडामध्ये चढ-उतार बघायला मिळू शकतो.

क्रिप्टो(crypto)

क्रिप्टो करेंसी (Crypto Currency) ने जगभरात धुमाकूळ घातला आहे. भारतातील गुंतवणूकदारांना ही क्रिप्टो करेंसी ने भुरळ घातली आहे. जगातील अनेक गुंतवणूकदार क्रिप्टो च्या मोहिनीत अडकून पडले आहेत. मात्र अद्यापही अनेक देशांच्या मध्यवर्ती बँकांनी या चलनाला मान्यता दिलेली नाही. उलटपक्षी भारतीय रिझर्व बँक (RBI) स्वतःची डिजिटल करन्सी (Digital Currency) बाजारात आणणार आहे. 2022 हे   व्हर्च्युअल करन्सीसाठी (Virtual Currency) महत्त्वपूर्ण वर्ष असेल. यंदा क्रिप्टो करेंसीने तब्बल 51,000 टक्के परतावा दिला आहे. तर जगातील सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या बिटकॉइन (Bitcoin) ने यंदा 57 टक्यांचा परतावा दिला आहे.

OBC Reservation: इम्पिरिकल डेटा गोळा केल्यावरही ओबीसींचं राजकीय आरक्षण राहणार काय?; विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान

Nagpur | नायलॉन मांजाविरोधात कारवाई, दीड लाखांचा मांजा जप्त; दुसरीकडं एक जानेवारीपासून पक्षी वाचवा मोहीम

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.