अर्थव्यवस्थेच्या तारणहार ‘3’ बँका: रिझर्व्ह बँकेची क्रमवारी घोषित, ‘टॉप’ बँक कोणती?

वर्ष 2021 साठी डॉमेस्टिक सिस्टमॅटिकली इंपॉर्टंट बँक (डी-एसआयबी) घोषित करण्यात आले आहे. स्टेट बँकेला बकेट – 3 आणि आयसीआयसीआय व एचडीएफसीचा समावेश बकेट-1 मध्ये करण्यात आला आहे. तीन बँकाव्यतिरिक्त अन्य बँकांच्या नावांचा यादीत समावेश नाही. वर्ष 2020 मध्ये समान तीन बँकांचा यादीत समावेश होता.

अर्थव्यवस्थेच्या तारणहार ‘3’ बँका: रिझर्व्ह बँकेची क्रमवारी घोषित, ‘टॉप’ बँक कोणती?
आरबीआय बँक
Follow us
| Updated on: Jan 05, 2022 | 7:32 AM

नवी दिल्ली : सार्वजनिक वित्तीय व्यवस्थेतील तीन बँकाचा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या डी-एसआयबी यादीत समावेश करण्यात आला आहे. बँकिंग व्यवहारातील पारदर्शकता आणि ठेवींची सुरक्षितता आदी निकषांवर रिझर्व्ह बँकेकडून डी-एसआयबी सूची घोषित केली जाते. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) आणि एचडीएफसी बँक (HDFC Bank) या तीन बँकांना डी-एसआयबी म्हणून मान्यता मिळाली आहे.

स्टेट बँक स्थिर कामगिरी:

वर्ष 2021 साठी डॉमेस्टिक सिस्टमॅटिकली इंपॉर्टंट बँक (डी-एसआयबी) घोषित करण्यात आली आहे. स्टेट बँकेचा बकेट – 3 आणि आयसीआयसीआय व एचडीएफसीचा समावेश बकेट-1 मध्ये करण्यात आला आहे. तीन बँकाव्यतिरिक्त अन्य बँकांच्या नावांचा यादीत समावेश नाही. वर्ष 2020 मध्ये समान तीन बँकांचा यादीत समावेश होता. स्टेट बँकेला वर्ष 2015 आणि आयसीआयसीआयला वर्ष 2016 मध्ये यादीत स्थान मिळाले. दोन बँकानंतर समावेश होणारी एचडीएफसी तिसऱ्या क्रमांकाची बँक ठरली आहे.

वित्तीय स्थिरता मंडळाच्या निर्देशानंतर रिझर्व्ह बँकेने डी-एसआयबी साठी संरचना निर्धारित केली होती. समिती गठित करुन आकृतीबंध निश्चित केला होता.

D-SIB म्हणजे काय?

डी-एसआयबी म्हणजे डॉमेस्टिक सिस्टमॅटिकली इंपॉर्टंट बँक (Domestic Systemically Important Banks) याचा अर्थ असा की अशा बँका ज्यांच्यावर सर्वाधिक विश्वास ठेवला जाऊ शकतो. देशात अशा तीन बँका आहेत ज्या ग्राहकांचा विश्वास कायम ठेवत आहेत असं आरबीआयने ही यादी जाहीर करताना म्हटलं आहे. खरंतर, कोरोना काळात बँकिंग व्यवस्थेची घडी विस्कटली आहे. कर्जबुडव्या आस्थापनांमुळे बँकेची आर्थिक स्थिती ढासळली आहे. तसेच बँक क्षेत्रात घोटाळ्यांचे ग्रहणही लागले आहे. बँकिंग व्यवस्थेबाबत ग्राहकांना विश्वास देण्यासाठी यादी जारी करण्यात आली आहे.

RBI ने नेमकं काय म्हटलं?

आरबीआयने D-SIB 2020 ची यादी जाहीर करताना स्पष्ट केलं आहे की, एसबीआय, आयसीआयसीआय आणि एचडीएफसी या बँका उत्तम काम करत आहे. कोरोनाचं संकट असून 2020 मध्ये देशांतर्गत बँका म्हणून पद्धतशीरपणे या महत्त्वाच्या काम करत होत्या. यामुळे या बँकांमध्ये गुंतवणूक करणं सुरक्षित असल्याचं आरबीआयने म्हटलं आहे.

इतर बातम्या –

LIC स्वस्तात मस्त पॉलिसी: 28 रुपयांची बचत, 2 लाखांचा लाभ; जाणून घ्या फायदे

Digital Payment | भारतीयांचा रेकॉर्डब्रेक UPI वापर, 4 वर्षात 70 पटींनी वाढले डिजिटल पेमेंट!

कर्ज मंजुरीला ‘सिबिल’चं विघ्न; जाणून घ्या- सिबिल स्कोअर सुधारणेच्या टिप्स

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.