माजी महापौरांची मागणी मान्य करुन घेतली, आदित्य ठाकरेंचा मुंबईकरांना दिलासा

आदित्य ठाकरे यांनी इक्बाल चहल यांच्याशी संपर्क साधत अभय योजनेची मुदत 31 डिसेंबर 2020 पर्यंत वाढवून घेतली.

माजी महापौरांची मागणी मान्य करुन घेतली, आदित्य ठाकरेंचा मुंबईकरांना दिलासा
Follow us
| Updated on: Aug 12, 2020 | 3:53 PM

मुंबई : मुंबईचे माजी महापौर सुनील प्रभु यांनी केलेली मागणी पर्यावरण मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी मान्य करुन घेतली. थकीत पाणीबिल भरण्यासाठी असलेल्या अभय योजनेची मुदत डिसेंबर 2020 अखेरपर्यंत वाढवण्यात आली आहे. या निर्णयाने मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळणार आहे. (Aditya Thackeray gets BMC Commissioner’s nod for extending Mumbai Abhay Scheme)

मुंबईकरांचे थकीत पाणी बिल भरण्यासाठी असलेल्या अभय योजनेची मुदत 12 ऑगस्ट 2020 रोजी संपली. ही मुदत वाढवून मिळावी अशी मागणी शिवसेनेचे दिंडोशी मतदारसंघाचे आमदार आणि माजी महापौर सुनील प्रभु यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली होती.

आदित्य ठाकरे यांनी या मागणीची तत्परतेने दखल घेत मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांच्याशी संपर्क साधला. अभय योजनेची मुदत 31 डिसेंबर 2020 पर्यंत वाढवून घेतली.

हेही वाचा : पद्म पुरस्कार समिती, आदित्य ठाकरे अध्यक्ष, धनंजय मुंडे, सुनील केदार, सुभाष देसाईंसह 9 सदस्य

थकीत पाणी बिल असलेल्या व्यक्तीकडून थकीत रकमेवर दरमहा दोन टक्के दराने अतिरिक्त रक्कम आकारली जाते. मात्र आता ही दोन टक्के दराने रक्कम आकारली जाणार नाही.

लॉकडाऊनच्या काळात अनेकांचे रोजगार गेले आहेत तर काहींची पगारकपात झाली आहे, त्यामुळे मुंबईकरांची आर्थिक अडचण लक्षात घेऊन आदित्य ठाकरे यांनी मुंबईकरांना दिलासा दिला आहे.

(Aditya Thackeray gets BMC Commissioner’s nod for extending Mumbai Abhay Scheme)

250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.