पंतप्रधान मोदींच्या पावलांवर पाऊल, अमृता फडणवीसही सोशल मीडिया सोडणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पावलांवर पाऊल ठेऊन अमृता फडणवीसही सोशल मीडिया सोडण्याची शक्यता आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे (Amruta Fadnavis Tweet).
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया सोडण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत त्यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. मोदींच्या या ट्विटला भाजप नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी रिट्विट करत आपणही या मार्गाने जाणार असल्याचं म्हटलं आहे (Amruta Fadnavis Tweet). त्यामुळे मोदींच्या पावलांवर पाऊल ठेऊन अमृता फडणवीसही सोशल मीडिया सोडण्याची शक्यता आहे.
“काही वेळेला एक लहान निर्णयही आपलं आयुष्य बदलून टाकतो. मी माझ्या नेत्याने ठरवलेल्या निर्णयाच्या मार्गाने जाणार”, असं अमृता फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे (Amruta Fadnavis Tweet).
Sometimes it’s the smallest decision that can change our life forever ! I will follow the path of my leader !! https://t.co/D7l1iZcosS
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) March 2, 2020
“येत्या रविवारी (8 मार्च) मी फेसबूक, ट्विटर, इंस्टाग्राम आणि युट्यूबसह मी माझे सर्व सोशल मीडिया अकाऊंट सोडण्याचा विचार करत आहे. याबाबत मी तुम्हाला माहिती लवकरच देईन”, असं ट्विट पंतप्रधान मोदींनी केलं आहे. त्यांच्या याच ट्विटला रिट्विट करत अमृता फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, मोदींच्या या ट्विटनंतर देशभरात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. कारण सोशल मीडियावर नरेंद्र मोदींना कोट्यवधी फोलोअर्स आहेत.
This Sunday, thinking of giving up my social media accounts on Facebook, Twitter, Instagram & YouTube. Will keep you all posted.
— Narendra Modi (@narendramodi) March 2, 2020
पंतप्रधान मोदी यांचे सोशल मीडियावर अंसख्य फॉलोवर्स आहेत. सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलो करण्यात येणारे नेते म्हणून त्यांना ओळखलं जातं. ते सोशल मीडियाद्वारे जगभरातील लोकांच्या संपर्कात असतात.
त्यांचे ट्विटरवर 5 कोटी 33 लाख 70 हजार पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. तर ते स्वत: 2 हजार 373 जणांना फॉलो (PM Modi social media) करतात. तर फेसबूकवर 4 कोटी 45 लाख 98 हजार फॉलोवर्स आहेत.
पंतप्रधान मोदींच्या राजकीय यशाचे श्रेय सोशल मीडियाला दिले जाते. गुजरातचे मुख्यमंत्री ते देशाचे पंतप्रधान होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास जर पाहिला तर त्यांनी या काळात सोशल मीडियाला फार महत्त्व दिले आहे. ते सोशल मीडियावर फार सक्रीय असतात.
गुजरातचे मुख्यमंत्री असतानाही ते सोशल मीडियावर फार लोकप्रिय होते. सोशल मीडियाद्वारे मोदींना मिळालेली प्रसिद्ध आणि यश पाहून अनेक नेत्यांनी स्वत: चे सोशल मीडिया अकाऊंट बनवले होते.
संबंधित बातमी : पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, रविवारपर्यंत सोशल मीडियातून संन्यास घेण्याचा विचार?