आयुक्तांच्या दाव्याचे पावसाने तीन तेरा वाजवले, 113 टक्के नालेसफाईचे दावे करणारे कुठे आहेत? : शेलार

मुंबईत विविध भागात पाणी साचल्याने भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेना आणि महापालिकेवर टीका केली (Ashish Shelar Criticizes BMC Waterlogging in Mumbai) आहे. 

आयुक्तांच्या दाव्याचे पावसाने तीन तेरा वाजवले, 113 टक्के नालेसफाईचे दावे करणारे कुठे आहेत? : शेलार
Follow us
| Updated on: Jul 15, 2020 | 3:57 PM

मुंबई : मुंबईसह उपनगरात तुफान पाऊस कोसळत आहे. त्यामुळे दादर, हिंदमाता, किंग्ज सर्कल परिसरात गुडघाभर पाणी साचलं. मुंबईत विविध भागात पाणी साचल्याने भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेना आणि महापालिकेवर टीका केली आहे. “आयुक्तांच्या दाव्याचे पावसाने तीन तेरा वाजवले, 113 टक्के नालेसफाईचे दावे करणारे कुठे आहेत,” असा प्रश्न आशिष शेलार यांनी उपस्थित केला (Ashish Shelar Criticizes BMC Waterlogging in Mumbai) आहे.

मुंबईसह उपनगरातील मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याने आशिष शेलारांनी घणाघात केला आहे. “मुंबईत 113 टक्के नालेसफाई झाल्याच्या आयुक्तांच्या दाव्याचे पावसाने अखेर तीन तेरा वाजवलेच! हे होणारच होते, कारण 40 टक्क्यांपेक्षा जास्त नालेसफाई झालेली नाही,” असे ट्विट आशिष शेलार यांनी केले आहे.

“आता कुठे आहेत ते 113 टक्क्यांचे दावे करणारे? कोट्यवधीची कंत्राटे देऊन कंत्राटदारांची पाठराखण करणारे सत्ताधारी आता गायब?” असा प्रश्नही आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.

“मुंबईतील मुसळधार पावसामुळे मुंबईची तुंबई झालेले मुंबईकरांनी पाहिलं. आयुक्त दावा करत होते की 113 टक्के नालेसफाई केली. त्यावेळी मी आयुक्तांना 227 टक्के तुमचा दावा फोल आहे असे आवाहन केले होते. कंत्राटादारांना पाठीशी घालणारे सत्ताधारी आणि अधिकारी हे यामागे खरे दोषी आहेत. त्यामुळे मुंबईकरांचा जीव असुरक्षित करु नका. कंत्राटदारांना पाठीशी घालू नका. मुंबईचं तुंबई तुम्ही करुन दाखवलं, त्या अधिकारी आणि सत्ताधाऱ्यांना या प्रश्नाचे उत्तर द्यावचं लागेल,” असेही आशिष शेलार यांनी (Ashish Shelar Criticizes BMC Waterlogging in Mumbai) सांगितले.

हवामान विभागाने मुंबई, ठाणे आणि पालघरला ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड यासारख्या कोकण किनारपट्टी भागात रेड अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईत लोअर परळ, वरळी, दादर, माटुंगा, किंग्ज सर्कल या भागात जोरदार पाऊस पाहायला मिळत आहेत. तर उपनगरात अंधेरी, मालाड, कांदिवली, बोरिवली या ठिकाणीही मुसळधार पाऊस होत आहे. यामुळे ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली (Ashish Shelar Criticizes BMC Waterlogging in Mumbai) आहे.

तीन दिवस हवामान विभागाचा अंदाज

14 जुलै 2020 – मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता 15 जुलै 2020 – मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता 16 जुलै 2020 – मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज

संबंधित बातम्या : 

Rain Update | मुंबईसह कोकणात धो-धो, पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

Mumbai Rains Live Update | मुंबईसह उपनगरात तुफान पाऊस

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.