सौम्य लक्षणं असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांवर आयुष मंत्रालयाने सुचवलेल्या औषधांचा उपचार

कोरोनाबाधित रुग्णांवर आता आयुष मंत्रालयाने सुचवलेल्या औषधांनी उपचार केला जाणार आहे (Ayush task force).

सौम्य लक्षणं असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांवर आयुष मंत्रालयाने सुचवलेल्या औषधांचा उपचार
Follow us
| Updated on: Jun 22, 2020 | 10:42 PM

मुंबई :  मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांवर आता आयुष मंत्रालयाने सुचवलेल्या औषधांनी उपचार केला जाणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या आयुष टास्क फोर्सच्या टीमने (Ayush task force) आज (22 जून) बीकेसी येथील कोव्हिड सेंटरला प्रथमच भेट दिली. यावेळी टीमने आयुष मंत्रालयाने सुचविलेल्या नियमावलीनुसार औषधांचे वाटप केले (Ayush task force).

बीकेसीतील कोव्हिड रुग्णालयात 500 रुग्णांवर उपचार सुरु आहे. यापैकी 200 रुग्णांना कोरोनाचे सौम्य लक्षणं आहेत. सौम्य लक्षण असलेल्या रुग्णांना उद्यापासून आयुष मंत्रालयाने सूचवलेले औषधं देण्यात येणार आहेत. या औषधांमध्ये संशमनी वटी, आयुष क्वाथ डिस्पर्सिबल टॅब्लेटस, आयुष काढा यांचा समावेश आहे.

“आयुष मंत्रालयाने सूचवलेल्या या औषधांमुळे कोरोनाबाधित रुग्णांची लक्षणे कमी होण्यास मदत होणार आहे. तीनही औषधं एकत्रितपणे काम करणार आहेत. ही औषधं रुग्णांना पूर्णपणे बरं होण्यास मदत करतील”, असा विश्वास ‘आयुष टास्क फोर्स’च्या सदस्या डॉ. शुभा राऊळ यांनी व्यक्त केला.

हेही वाचा : Corona Medicine : कोरोना रुग्णांवर उपचार करणारे औषध भारतात उपलब्ध

मुंबईत 67 हजार 586 कोरोना रुग्ण

महाराष्ट्राची राजधानी मुंबईत कोरोनाचे 1 हजार 98 रुग्ण आढळले आहेत. मुंबई आतापर्यंत 67 हजार 586 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र, यापैकी कोरोना रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता प्रशासन सर्वोत्तोपरी प्रयत्न करत आहे. आतापर्यंत 34 हजार 121 रुग्ण बरे झाले आहेत. तर सध्या मुंबईत 29 हजार 720 रुग्णांवर उपचार सुरु आहे. मुंबईत कोरोनामुळे आतापर्यंत 3 हजार 737 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात दिवसभरात 1,962 रुग्ण कोरोनामुक्त

राज्यात आज (22 जून) दिवसभरात 1 हजार 962 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. तर दिवसभरात 3 हजार 721 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 लाख 35 हजार 796 वर पोहोचली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 67 हजार 706 रुग्ण बरे झाले आहेत. तर 61 हजार 793 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. याशिवाय राज्यात आतापर्यंत एकूण 6 हजार 283 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.