AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

17 ऑक्टोबरला एकनाथ खडसेंकडून राजकीय घटाची पुनर्स्थापना?; राष्ट्रवादीत प्रवेशाची शक्यता

राष्ट्रवादी काँग्रेस एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशासाठी वातावरणनिर्मिती करत असल्याचा अंदाज राजकीय जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे. | Eknath Khadse join NCP

17 ऑक्टोबरला एकनाथ खडसेंकडून राजकीय घटाची पुनर्स्थापना?; राष्ट्रवादीत प्रवेशाची शक्यता
Follow us
| Updated on: Oct 14, 2020 | 8:37 AM

मुंबई: गेल्या अनेक महिन्यांपासून स्वपक्षीयांवर नाराज असलेले ज्येष्ठ भाजप नेते एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय अखेर पक्का झाल्याची माहिती समोर येत आहे. एवढेच नव्हे तर त्यांच्या राष्ट्रवादीतील पक्षप्रवेशाची तारीखही निश्चित झाली आहे. त्यानुसार 17 ऑक्टोबर म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात त्यादृष्टीने हालचालीही सुरु झाल्या आहेत. (Eknath Khadse join NCP on 17th October)

राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी आणि एकनाथ खडसे यांच्या समर्थकांनी आपल्या व्हॉटसअॅपला तसे स्टेटस ठेवले आहेत. यामध्ये ‘तुमचे राष्ट्रवादीत स्वागत आहे’, ‘आम्ही तुमच्या पाठिशी आहोत’, असा मजकूर पाहायला मिळत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशासाठी वातावरणनिर्मिती करत असल्याचा अंदाज राजकीय जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात आहेत. ते बरेच दिवस मुंबईत ठाण मांडून बसले होते. त्यामुळे खडसे लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करतील, अशा चर्चा सुरु झाल्या होत्या. भाजप कार्यकारिणीच्या मुंबईतील बैठकीलाही एकनाथ खडसे व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित राहिले होते. यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे यांना भावनिक साद घालण्याचा प्रयत्नही केला होता. एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगरमध्ये जाऊन आमच्या दोन थोबाडीत द्याव्यात. मात्र, प्रसारमाध्यमांसमोर जाऊन नाराजी व्यक्त करू नये, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते.

दरम्यान, भाजपच्या गोटातून सध्या एकनाथ खडसे यांची समजूत काढण्याचे प्रयत्नही सुरु आहेत. कालच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जामनेर येथे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या उद्घाटनसाठी आले होते. या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, यासाठी गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना फोनही केला होता. परंतु, खडसे यांनी वैयक्तिक कारणामुळे कार्यक्रमाला उपस्थित राहता येणार नसल्याचे गिरीश महाजन यांना कळवले. देवेंद्र फडणवीस हाकेच्या अंतरावर येऊनही खडसे यांनी त्यांची भेट टाळल्याने त्यांचा पक्षांतराचा निर्णय निश्चित झाल्याच्या शक्यतेला बळकटी मिळत आहे.

संबंधित बातम्या: एकनाथ खडसे राष्ट्रवादीत आल्यास स्वागतच, स्थानिक नेते उत्सुक, उत्तर महाराष्ट्रात पक्षविस्ताराची आशा

गिरीश महाजनांच्या घरी गुप्त बैठक सुरु, वैयक्तिक कारणांमुळे बैठकीला दांडी – एकनाथ खडसे

एकनाथ खडसे पक्षांतर करतील हे सत्य आहे : गुलाबराव पाटील

फडणवीस जामनेरमध्ये, हाकेच्या अंतरावरील भेटही एकनाथ खडसेंनी टाळली

(Eknath Khadse join NCP on 17th October)

आमची मध्यस्थी, भारत-पाकचा वाद अमेरिकेने मिटवला,ट्रम्प यांचा पुनरूच्चार
आमची मध्यस्थी, भारत-पाकचा वाद अमेरिकेने मिटवला,ट्रम्प यांचा पुनरूच्चार.
मुंबईचा पहिला केबल-स्टे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला
मुंबईचा पहिला केबल-स्टे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला.
भारतानं कबरडं मोडलं पाकिस्तान वठणीवर, संरक्षण मंत्र्याचं मोठं वक्तव्य
भारतानं कबरडं मोडलं पाकिस्तान वठणीवर, संरक्षण मंत्र्याचं मोठं वक्तव्य.
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान.
चीनविरोधात मोठी भारताची अ‍ॅक्शन, तणावादरम्यान खोटा प्रचार करणं भोवलं
चीनविरोधात मोठी भारताची अ‍ॅक्शन, तणावादरम्यान खोटा प्रचार करणं भोवलं.
आयकर विभागाची विदर्भात मोठी कारवाई; सोनं-चांदीच्या दुकानांवर धाडसत्र
आयकर विभागाची विदर्भात मोठी कारवाई; सोनं-चांदीच्या दुकानांवर धाडसत्र.
जोरदार वारा, पावसाचा तडाखा; फळबागांना नुकसान
जोरदार वारा, पावसाचा तडाखा; फळबागांना नुकसान.
मराठी दाम्पत्यानं घातला डिलिव्हरी बॉय सोबत वाद, भांडूपमधला बघा VIDEO
मराठी दाम्पत्यानं घातला डिलिव्हरी बॉय सोबत वाद, भांडूपमधला बघा VIDEO.
सचिन अहीर पवारांच्या भेटीला अन् एकाच गाडीतून प्रवास, काय झाली चर्चा?
सचिन अहीर पवारांच्या भेटीला अन् एकाच गाडीतून प्रवास, काय झाली चर्चा?.
केंद्रीय कॅबिनेट बैठकीत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा, सुत्रांची माहिती
केंद्रीय कॅबिनेट बैठकीत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा, सुत्रांची माहिती.