Mumbai Local | …तरच मुंबई लोकल सर्वसामान्य नागरिकांसाठीही सुरु करणार : इक्बाल चहल

मुंबईतील रुग्णवाढ थांबली, तरच मुंबई लोकल पुन्हा सर्वसामान्य नागरिकांसाठीही सुरु करणार, असे महापालिका आयुक्त इक्बाल चहल म्हणाले

Mumbai Local | ...तरच मुंबई लोकल सर्वसामान्य नागरिकांसाठीही सुरु करणार : इक्बाल चहल
Follow us
| Updated on: Jul 26, 2020 | 11:40 AM

मुंबई : मुंबईची ‘लाईफलाईन’ फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच नाही, तर सर्वसामान्य प्रवाशांसाठीही सुरु केली जावी, अशी मागणी वारंवार केली जात आहे. मात्र महापालिका आयुक्तांनी मुंबई लोकल पुन्हा खुली करण्याची महत्त्वाची अट स्पष्ट केली आहे. (BMC Commissioner Iqbal Chahal on Mumbai Local Unlock)

मुंबईतील रुग्णवाढ थांबली, तरच मुंबई लोकल पुन्हा सर्वसामान्य नागरिकांसाठीही सुरु करणार, असे महत्त्वपूर्ण वक्तव्य महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी केलं आहे. मुंबईतील रुग्णसंख्या एक टक्क्यावर आली, तरच मुंबई अनलॉक होईल, असं चहल म्हणाले.

मुंबई शहरात नोकरी करणारे बहुसंख्य कर्मचारी मुंबईतील उपनगरे किंवा वसई-विरार, ठाणे, कल्याण-डोंबिवली अशा एमएमआर भागात राहतात. मात्र मुंबईसोबतच या भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे मुंबईच्या महानगरी क्षेत्रातील रुग्णवाढ थांबवणे गरजेचे आहे, अन्यथा संसर्ग वाढत राहील, असेही इक्बाल चहल म्हणाले.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

मुंबई लोकल येत्या ऑगस्टपासून सुरु करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे, असे मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते. केंद्र सरकार याबाबत विचार करेल, हा विषय राज्य सरकारच्या अंतर्गत नाही, असे अस्लम शेख यांनी स्पष्ट केलं होतं.

हेही वाचा : नालासोपारा स्टेशनवर प्रवाशांचा उद्रेक, रेल्वे रुळांवर उतरत लोकल अडवली

मुंबई लोकल 15 जूनपासून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा सुरु करण्यात आली. मात्र सर्वसामान्य प्रवाशांना यातून प्रवासाची मुभा अद्याप देण्यात आलेली नाही.

नालासोपारा परिसरात राहणाऱ्या नागरिकांचा बुधवारी उद्रेक झाला होता. लोकलने प्रवास करण्यास परवानगी देण्याची मागणी करत रेल्वे स्थानकावर जमलेले अनेक प्रवासी रेल्वे रुळांवर उतरले होते.

नालासोपारा परिसरात मोठ्या प्रमाणावर मध्यमवर्गीय नागरिक राहतात. खाजगी कार्यालयामध्ये 15 टक्के कर्मचाऱ्यांना नोकरीवर बोलावण्याची मुभा आहे. मात्र मुंबईत नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वाहतूक व्यवस्थेची कार्यालयाकडून कोणतीही सोय झालेली नाही. बेस्टच्या अपुऱ्या बसेस, केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल वाहतूक आणि नोकरीच्या ठिकाणी कामावर येण्यासाठी होणारा दबाव यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे बोलले जाते.

पहा व्हिडिओ :

(BMC Commissioner Iqbal Chahal on Mumbai Local Unlock)

अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.