उद्धवजींना मुख्यमंत्रिपदासाठी शुभेच्छा: मुख्यमंत्री

मुंबई: “जलयुक्त शिवार हे सरकारचं सर्वात मोठं यश आहे. पण विरोधकांकडून केवळ बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न सुरु आहे. महाराष्ट्र सर्वच आघाड्यांवर देशात पुढे आहे. उद्धव ठाकरे ज्यावेळेस मुख्यमंत्री होतील, त्यावेळेस माझ्या शुभेच्छा असतील. धनगर आरक्षणाबाबत टिसच्या अहवालात सकारात्मक बाबी आहेत. मराठा आरक्षणबाबत नोव्हेंबर अखेर निर्णय होईल. ब्राह्मणांना आरक्षणाची गरज नाही” अशा विविध मुद्द्यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली […]

उद्धवजींना मुख्यमंत्रिपदासाठी शुभेच्छा: मुख्यमंत्री
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 5:04 PM

मुंबई: “जलयुक्त शिवार हे सरकारचं सर्वात मोठं यश आहे. पण विरोधकांकडून केवळ बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न सुरु आहे. महाराष्ट्र सर्वच आघाड्यांवर देशात पुढे आहे. उद्धव ठाकरे ज्यावेळेस मुख्यमंत्री होतील, त्यावेळेस माझ्या शुभेच्छा असतील. धनगर आरक्षणाबाबत टिसच्या अहवालात सकारात्मक बाबी आहेत. मराठा आरक्षणबाबत नोव्हेंबर अखेर निर्णय होईल. ब्राह्मणांना आरक्षणाची गरज नाही” अशा विविध मुद्द्यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. फडणवीस सरकारला चार वर्ष पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी टीव्ही9 मराठीशी एक्स्क्लुझिव्ह बातचीत केली.

‘जलयुक्त शिवार सक्सेस’

केवळ 40 टक्के पाऊस पडूनही राज्याची उत्पादकता वाढली, हे जलयुक्त शिवारचं यश आहे. गेल्या वर्षी 90 टक्के पाऊस पडूनही टँकरची संख्या वाढली होती, मात्र ती कमी झाली आहे, ही जलक्रांती आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

जलयुक्त शिवारमुळे प्रगती होतेय हे कळल्यावर अनेकांनी कुदळ फावडं घेऊन फोटो काढून ट्विट केले. पण आता पाणी पातळी घटल्याचं सांगून बुद्धीभेद केला जात आहे. मात्र जलयुक्त शिवार योजनेमुळे 4 मीटरने पाणी पातळी वाढली आहे. यंदा पातळी खाली गेली कारण पाऊस कमी झाला. पाऊस कमी झाल्याने पेरणी झालेल्या पिकाला जमिनीतील पाणी मिळालं, त्यामुळे पातळी घसरली.  जी काही पीकं वाचली, ती यामुळे वाचली. पाण्याचा अति उपसा झाला. पाणी पातळी मागच्या वर्षी वाढली, यंदा पाऊस कमी आणि उपसा जास्त झाला, त्यामुळे पातळी घटली. गेल्या तीन वर्षात पातळी वाढली त्याबद्दल कोण बोललं का? हाच बुद्धीभेद आहे.  ज्या गावात जलयुक्त शिवारची कामं झाली, त्या गावातील पाणी पातळी घटण्याचं प्रमाण कमी, अन्य गावात हे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे मुंबईत प्रेस कॉन्फरन्स करणाऱ्यांनी गावात जावून पाहावं, जलयुक्तचं यश दिसेल, असं मुख्यमंत्र्यांनी ठणकावून सांगितलं.

1 लाख शेततळी सांगितली होती, प्रत्यक्षात 1 लाख 37 हजार शेततळी झाली आहेत. पश्चिम महाराष्ठ्रातील टेंभू योजना आमच्या काळात पूर्ण करतोय, 50 हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येईल.  15 वर्षात शेतमालाची खरेदी 350 कोटी होती, मागील तीन वर्षात 8 हजार कोटी इतकी झाली आहे. त्यामुळे  गुणात्मक, विकासात्मकमध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

सर्वात पुढे महाराष्ट्र

महाराष्ट्र हा सर्वच बाबतीत प्रगतीपथावर आहे.  देशातील 49 टक्के FDI एकट्या महाराष्ट्रात आहे. परकीय गुंतवणूक सर्वात जास्त महाराष्ट्रात आहे.  औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्र पुढे, शिक्षण क्षेत्रात 13 वरुन तिसऱ्या नंबरवर आला आहे. आरोग्य क्षेत्रातही मोठी झेप घेतली आहे. ग्रामविकास, सिंचन अशा विविध क्षेत्रात प्रगती झाली आहे, असा दावा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केला.

सिंचन घोटाळा

 प्रश्न – अजितदादांसाठी भुजबळांच्या बाजूला ठेवलेल्या कोठडीचं काय झालं?

मुख्यमंत्री – संचिन घोटाळा झाला आहे हे सिद्ध आहे. यामधील जवळपास 100 प्रकरणांमध्ये दोषरोपपत्र दाखल झालं आहे. अजून तेवढेच चार्जशीट दाखल होतील. न्यायालयीन प्रक्रिया सुरु आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

मराठा आरक्षण

मराठा आरक्षणाबाबत आम्ही 15 नोव्हेंबर डेडलाईन दिलेली नाही, नोव्हेंबर अखेर डेडलाईन दिली आहे. आयोगाला 15 नोव्हेंबरपर्यंत अहवाल सबमिट करण्यास कोर्टाने सांगितलं आहे. त्या अहवालानंतर आम्ही निर्णय घेऊन, आमची डेडलाईन पूर्ण करु. आयोगाच्या अहवालानंतर तीन महिने लागतात, पण आम्ही 15 दिवसात निर्णय घेऊ. आरक्षण आम्ही रखडवतोय असा भास निर्माण केला जात आहे. यापूर्वी कोणत्याही सरकारने आमच्या इतकी ठाम भूमिका घेतली दाखवा, असं आव्हान मुख्यमंत्र्यांनी दिलं.

धनगर आरक्षण

टीसचा अहवाल आमच्याकडे आहे,त्यावर कार्यवाही सुरुय. त्या अहवालावर जे पतंगबाजी करतंय त्यांनी तो वाचलेला नाही. टीसचा अहवाल धनगर आरक्षणाच्या विरोधात आहे हे चुकीचं आहे.

उदयनराजे तर छत्रपती, त्यांचं भाजपमध्ये स्वागतच: मुख्यमंत्री

राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन नाराज खासदार भाजपच्या संपर्कात आहेत? राजकीय भूकंप घडवणार का? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला.

मुख्यमंत्र्यांचं उत्तर : काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत. आमदार आहेत, खासदार आहेत, मी आज कोणाचीही नावं सांगू इच्छित नाही. पण मी एव्हढं निश्चित सांगतो, त्या दोन्ही पक्षातून अनेक नेते आमच्या पक्षात येऊ इच्छित आहेत.

प्रश्न – उदयनराजे आले तर?

उत्तर – स्वागत आहे. उदयनराजेंचा निर्णय ते स्वत: घेतात, त्यांचा निर्णय दुसरं कोणी घेऊ शकत नाही. छत्रपती आहेत. छत्रपती पक्षात यावेत, यापेक्षा चांगलं काय असू शकतं? आम्ही नक्की स्वागत करु.

उद्धव ठाकरेंना आशिर्वाद मिळावा

राम मंदिर हा राम भक्त्तांचा मुद्दा आहे. तमाम हिंदूंना वाटतं की ज्या ठिकाणी प्रभू रामांचा जन्म झाला, तिथे मंदिर असावं. आम्ही त्यासाठी प्रयत्न करत आहोत. शिवसेनाही त्यामध्ये येत असेल तर ताकद वाढेल. उद्धव ठाकरे आयोध्येला जात असतील तर प्रभू श्रीरामांचा आशिर्वाद उद्धवजींना मिळावा.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तर आवडेल का?

 राजकीय परिस्थितीने ते मुख्यमंत्री झाले तर त्यांना शुभेच्छाच देईन. ते माझे चांगले मित्र आहेत, असं मुख्यमंत्री म्हणाले.

'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...