CORONA | घाबरु नका, वेळ पडलीच तर सज्ज, उद्धव ठाकरेंनी गोरेगाव-वरळीतील तयारीचे फोटो दाखवले
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधताना माहिती दिली. यावेळी त्यांनी प्रशासनाने केलेल्या पूर्वतयारीचे फोटोही (CM Uddhav Thackeray on Corona Update) दाखवले.
मुंबई : राज्यासह मुंबई पुण्यात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत (CM Uddhav Thackeray on Corona Update) आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मुंबईत कशाप्रकारची तयारी केली आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधताना माहिती दिली. यावेळी त्यांनी प्रशासनाने केलेल्या पूर्वतयारीचे फोटोही दाखवले.
“गेल्या काही दिवसांपासून जे काही वातावरण होत (CM Uddhav Thackeray on Corona Update) आहे, नक्की काय होणार, आकडे फिरतात. एप्रिल आणि मे महिन्याच्या वटी देशात एवढे रुग्ण होणार, महाराष्ट्रात एवढे रुग्ण होतील. मुंबईत एवढे रुग्ण होतील. त्या पार्श्वभूमीवर मुंबईत काय तयारी केली आहे, त्यासाठी काही फोटो दाखवत आहे. हे फोटो दाखवल्यावर घाबरुन जाऊ नका,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.
“आपण जी काही मोठी तयारी करत आहोत, त्याचे हे काही फोटो आहेत. जर समजा उद्या काही मोठी वाढ झाली तर काय, त्यामुळे गोरेगावच्या नेस्को ग्राऊंड, वरळी च्या एनएससीआय या ठिकाणी ही तयारी केली आहे,” असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
“काही कंटन्मेंट झोन कमी केले आहेत. वरळी ज्या प्रकारे परिस्थिती हाताळली गेली आहे. त्याचं केंद्रातील पथकानेही कौतुक केलं आहे. ज्यांना गंभीर लक्षण नाही त्यांच्यासाठी आपण ही तयारी करत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. कदाचित जे नुसते क्वारंटाईनमध्ये असतील अशा लोकांसाठी आपण या सुविधा करत आहोत,” असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
“केंद्राचं पथक आलं, डाल मै कुछ काला हो सकता है असे काहीजण म्हणतात. पण आम्ही त्यांच्याकडून डाळ मागतो. धान्य वाटयाचे त्यात फक्त तांदूळ आहे. डाळ आणि गहू अजून मिळालेलं नाही. डाल मै काला बाद मे आधी डाळ तर मिळू दे, डाळ आल्यानंतर त्यात काळ बिळ आहे का ते बघू पण डाळ गहू आली पाहिजे,” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्रात कोरोनाच्या सर्वाधिक चाचण्या
“महाराष्ट्रात कोरोनाच्या सर्वाधिक चाचण्या झाल्या आहेत. जवळपास 1 लाख 8 हजार 972 चाचण्या घेतल्या गेल्या आहेत. त्यातील 1 लाख 1 हजार 62 रुग्ण निगेटिव्ह ठरले आहेत. तर 7 हजार 628 रुग्ण पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. तर आतापर्यंत 323 रुग्णांचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे,” अशीही माहिती उद्धव ठाकरेंनी यावेळी (CM Uddhav Thackeray on Corona Update) दिली.
संबंधित बातम्या :
CM Uddhav Thackeray LIVE | मुख्यमंत्र्यांच्या निवेदनातील महत्त्वाचे मुद्दे
परराज्यातील मजुरांना नक्की घरी पाठवू, पण ट्रेन सुरु करणार नाही : मुख्यमंत्री
‘या’ आवाहनाबद्दल उद्धव ठाकरेंनी नितीन गडकरींचे जाहीर आभार मानले!