राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची गुप्त बैठक, महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या युतीचे संकेत

भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Devendra Fadnavis meet Raj Thackeray) यांच्यात मुंबईत गुप्त बैठक झाली.

राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची गुप्त बैठक, महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या युतीचे संकेत
Follow us
| Updated on: Jan 07, 2020 | 7:48 PM

मुंबई : खातेवाटप करुन ठाकरे सरकार स्थिरस्थावर होत असताना महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या घडामोडी घडताना दिसत आहेत. कारण भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Devendra Fadnavis meet Raj Thackeray) यांच्यात मुंबईत गुप्त बैठक झाली. देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे यांच्या भेटीने महाराष्ट्राच्या राजकारणात नवी समीकरणं जुळताना दिसत आहेत. प्रभादेवी येथील हॉटेल इंडिया बुल्स स्काय या हॉटेलमध्ये जवळपास तास- दीड तास ही भेट झाली. (Devendra Fadnavis meet Raj Thackeray)

या भेटीनंतर राज ठाकरे हॉटेलच्या मागच्या गेटने बाहेर पडले. ही भेट अत्यंत गोपनीय होती. जवळपास 1 ते दीड तास दोघांमध्ये चर्चा झाली. या भेटीनंतर राज ठाकरे यांचे अत्यंत जवळचे मित्र गुरुप्रसाद रेगे हे देवेंद्र फडणवीस यांना गाडीपर्यंत सोडण्यासाठी खाली आले.

आगामी काळात मनसे आणि भाजप एकत्र येतील असा अंदाज गेल्या काही दिवसापासून वर्तवण्यात येत होता. तशा चर्चा सुरु होत्या. या भेटीने त्या चर्चांना बळ मिळालं आहे. एकीकडे शिवसेनेने भाजपची साथ सोडली आहे. सेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी स्थापन करुन राज्यात सत्ता स्थापन केली आहे.

सेनेने साथ सोडल्याने भाजपला नवे मित्र शोधणं गरजेचं आहे, असं राजकीय विश्लेषक सांगतात. त्या पार्श्वभूमीवर भाजपचा नवा साथीदार राज ठाकरे असू शकतात.

मनसेचं महाअधिवेशन

दरम्यान, राज ठाकरे मुंबईत मनसेचं महाअधिवेशन घेणार आहेत. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा 23 जानेवारी रोजी जन्मदिवस आहे. याच दिवशी मनसेच महाअधिवेशन आहे. या महाअधिवेशनात राज ठाकरे मोठी घोषणा कऱण्याची शक्यता आहे.

बाळासाहेबांच्या जयंतीदिनी  पक्षाचे महाअधिवेशन आयोजित करण्यामागे राज ठाकरे यांचा हेतू काय? पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे. तसेच पक्षाच्या 13 वर्षांच्या वाटचालीतील हे पहिलं महाअधिवेशन आहे.

मनसे हिंदुत्वाच्या दिशेने? 

मनसे आपल्या झेंड्याचा रंग भगवा करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे मनसे हिंदुत्वाचा मुद्दा स्वीकारण असल्याची चर्चा आहे.  पक्षाकडून छत्रपती शिवाजी महाराज यांची राजमुद्रा असणारे, केशरी किंवा भगवा रंग असलेला ध्वज स्वीकारला जाऊ शकतो.

याअगोदर महाराष्ट्रात शिवसेनेकडे कट्टर हिंदुत्ववादी पक्ष म्हणून पाहिले जात होते. मात्र, शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत हातमिळवणी केल्यामुळे निर्माण झालेला स्पेस भरुन काढण्यासाठी मनसे भाजपची साथ देऊन हिंदुत्वाच्या मुद्दावर ही नवी युती होऊ शकते.

अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.