Lockdown : कांजूरमार्गवरुन अकोल्याकडे मजूर रवाना, 600 किमी पायपीट करण्याची तयारी
लॉकडाऊन वाढण्याच्या भीतीने मुंबईत मोलमजुरी करणाऱ्या मजूर आणि कामगारांनी नाईलाजास्तव आपल्या गावाकडची वाट धरली आहे.
मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशात (Fear Of Lockdown Extension) सुरवातीला 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला. त्यानंतर या लॉकडाऊनचा कालावधी आणखी 19 दिवसांनी वाढवण्यात आला. म्हणजे देशात एकूण 40 दिवसांचा लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनचा दुसरा कालावधी हा येत्या 3 मे रोजी पूर्ण होणार आहे. महाराष्ट्रात विशेष करुन मुंबई एमएमआरडीए क्षेत्रात कोरोनाबधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे 3 मेनंतरही लॉकडाऊन वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या भीतीने मुंबईत मोलमजुरी (Fear Of Lockdown Extension) करणाऱ्या मजूर आणि कामगारांनी नाईलाजास्तव आपल्या गावाकडची वाट धरली आहे.
मुंबईतील कांजूरमार्ग येथे झोपडपट्टीत राहणाऱ्या मजूरांच्या कुटुंबांवर सध्या उपाशी राहण्याची वेळ आली आहे. लॉकडाऊनमुळे सर्व कामं बंद आहेत. उरलासुरला गाठीला असलेला पैसाही आता संपला. त्यामुळे नाईलाजास्तव या कुटुंबांनी अकोला जिल्ह्याच्या दिशेने आपल्या गावापर्यंतची 600 किलोमीटरची पायपीट सुरु केली. डोक्यावर गाठोडे, कडेवर लहानग्यांना घेऊन त्यांची भर उन्हातली ही पायपीट (Fear Of Lockdown Extension) मन विषणं करणारी आहे.
Maharashtra Corona Update | महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा 10 हजारच्या पार, कुठे किती नवे रुग्ण?https://t.co/YVXYXfq5yn #MaharashtraFightsCorona #Maharashtra #coronavirusinindia
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 30, 2020
या कुटुंबातील महिला घरकाम करतात, तर पुरुष हे रोजंदारीवर मजुरी करतात. मात्र, लॉकडाऊनमुळे सध्या सर्व कामे ठप्प पडली आहेत. शिधावटप पत्रिका नसल्याने त्यांना धान्यही मिळत नाही. जेवणाची पाकिटे कधी मिळतात, तर कधी त्यांनी उपाशीपोटी राहावे लागत आहे. त्यामुळे नाईलाजास्तव हे लोक गावी निघाले आहेत.
मात्र, हे लोक गावी पोहोचले तरी तिथेही त्यांच्या खाण्या-पिण्याची, राहण्याची कुठलीही सोय नाही. गावी गेल्यावर 14 दिवस शिवारात शेतात राहावं लागणार आहे. पण तेथे खायला कोण देणार, ही विवंचना आहे, असं दुःख सुनीता संजय खुराडे या महिलेने (Fear Of Lockdown Extension) व्यक्त केलं.
संबंधित बातम्या :
‘मातोश्री’मध्ये जाण्यासाठी आक्रमक, माथेफिरु तरुणाचा गोंधळ, जेसीबीवर दगडफेक
Corona : मुंबईत कोरोना मृत्यूदर जवळपास निम्म्याने घटला
धारावीत अन्नवाटप करणाऱ्या महापालिका अधिकाऱ्याचा कोरोनाने मृत्यू
राज्यातील शाळांची फी वाढ थांबवा, आशिष शेलारांचं शालेय शिक्षण मंत्र्यांना पत्र