काँग्रेसची पहिली यादी जाहीर, 51 उमेदवारांची घोषणा

काँग्रेसने अखेर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

काँग्रेसची पहिली यादी जाहीर, 51 उमेदवारांची घोषणा
Follow us
| Updated on: Sep 30, 2019 | 9:14 AM

मुंबई : काँग्रेसने अखेर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी (Congress Vidhansabha Candidate List) जाहीर केली आहे. काँग्रेसच्या पहिल्या उमेदवार यादीत (Congress Vidhansabha Candidate List) काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यासह 51 नावांचा समावेश आहे. डॉ. विश्वजित पतंगराव कदम पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातून आणि आमदार प्रणिती शिंदे यांना सोलापूर शहर (मध्य) येथून उमेदवारी घोषित करण्यात आली. पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून रमेश बागवेंना भोरमधून संग्राम थोपटेंना, पुरंदरमधून संजय जगताप यांना तर जत विधानसभा मतदारसंघातून विक्रम सावंत काँग्रेसची उमेदवारी जाहीर झाली आहे.

काँग्रेस आपली पहिली यादी 20 सप्टेंबरला जाहीर करणार असल्याचं आधी म्हटलं जात होतं. त्यानंतर 21 तारखेला विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या. त्यामुळे 23 सप्टेंबरला पहिली यादी जाहीर करण्याचा मुहूर्त ठरला, मात्र तोही अखेर लांबला. आता पितृपक्ष संपल्यानंतर काँग्रेसने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.

काँग्रेसची विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी

1. अॅड. के. सी पाडवी – अक्कलकुवा (नंदुरबार) 2. पद्माकर वळवी – शहादा (नंदुरबार) 3. शिरीष नाईक – नवापूर (नंदुरबार) 4. शिरीष चौधरी – रावेर (जळगाव) 5. हर्षवर्धन सपकाळ – बुलडाणा (बुलडाणा) 6. अनंत वानखेडे – मेहकर (बुलडाणा) 7. अमित झनक – रिसोड (वाशिम) 8. वीरेंद्र जगताप – धामणगाव रेल्वे (अमरावती) 9. यशोमती ठाकूर – तिवसा (अमरावती) 10. अमर काळे – आर्वी (वर्धा) 11. रणजित कांबळे – देवळी (वर्धा) 12. सुनील केदार – सावनेर (नागपूर) 13. नितीन राऊत – नागपूर उत्तर (नागपूर) 14. विजय वडेट्टीवार – ब्रह्मपुरी (चंद्रपूर) 15. सतीश वर्जूरकर – चिमूर (चंद्रपूर) 16. प्रतिभा धानोरकर – वरोरा (चंद्रपूर) 17. बाळासाहेब मंगळूरकर – यवतमाळ (यवतमाळ) 18. अशोक चव्हाण- भोकर (नांदेड) 19. डी पी सावंत – नांदेड उत्तर (नांदेड) 20. वसंतराव चव्हाण – नायगाव (नांदेड) 21. रावसाहेब अनंतपूरकर – देगलूर (नांदेड) 22. संतोष टारफे – कळमनुरी (हिंगोली) 23. सुरेश वर्पूरडकर – पाथरी (परभणी) 24. कल्याण काळे – फुलंब्री (औरंगाबाद) 25. शेख आसिफ शेख रशीद – मालेगाव मध्य (नाशिक) 26. रोहित साळवे – अंबरनाथ (ठाणे) 27. सय्यद हुसेन – मीरा भाईंदर (ठाणे) 28. सुरेश कोपरकर – भांडुप पश्चिम (मुंबई) 29. अशोक जाधव – अंधेरी पश्चिम (मुंबई) 30. नसीम खान – चांदिवली (मुंबई) 31. चंद्रकांत हंडोरे – चेंबूर (मुंबई) 32. झिशान सिद्दीकी – वांद्रे पूर्व (मुंबई) 33. वर्षा गायकवाड – धारावी (मुंबई) 34. गणेश कुमार यादव – सायन कोळीवाडा (मुंबई) 35. अमीन पटेल – मुंबादेवी (मुंबई) 36. अशोक जगताप – कुलाबा (मुंबई) 37. माणिक जगताप – महाड (रायगड) 38. संजय जगताप – पुरंदर (पुणे) 39. संग्राम थोपटे – भोर (पुणे) 40. रमेश बागवे – पुणे कँटोनमेंट (पुणे) 41. बाळासाहेब थोरात – संगमनेर (अहमदनगर) 42. अमित देशमुख – लातूर शहर (लातूर) 43. अशोक पाटील निलंगेकर – निलंगा (लातूर) 44. बसवराज पाटील – औसा (लातूर) 45. मधुकरराव चव्हाण – तुळजापूर (सोलापूर) 46. प्रणिती शिंदे – सोलापूर मध्य (सोलापूर) 47. मौलबी सय्यद – सोलापूर दक्षिण (सोलापूर) 48. ऋतुराज पाटील – कोल्हापूर दक्षिण (कोल्हापूर) 49. पी एन पाटील सडोलीकर – करवीर (कोल्हापूर) 50. डॉ. विश्वजीत कदम – पलुस कडेगाव (सांगली) 51. विक्रम सावंत – जत (सांगली)

Congress Assembly Candidate List

Congress Assembly Candidate List

सोलापुरातील विद्यमान दोन आमदारांचा पहिल्या यादीत समावेश नाही

विशेष म्हणजे काँग्रेसच्या पहिल्या यादीत सोलापूरमधील दोन विद्यमान आमदारांचा समावेश करण्यात आलेला नाही. अक्कलकोटचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे आणि पंढरपूरचे आमदार भारत भालके यांना या यादीतून वगळण्यात आले आहे. हे दोन्ही आमदार सोमवारी (30 सप्टेंबर) भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

सोलापूर शहर (मध्य) येथून आमदार प्रणिती शिंदे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे. तर दक्षिण सोलापूर तालुक्यातून नगरसेवक मौलाली सय्यद यांना उमेदवारी देण्यात आली.

वर्धा

वर्ध्यातून काँग्रेसने विद्यमान दोन्ही आमदारांना पुन्हा संधी दिली आहे. देवळी मतदारसंघातून माजी राज्यमंत्री आमदार रणजित कांबळे, तर आर्वीतून अमर काळे यांना उमेदवारी मिळाली. रणजित कांबळे मागील चार टर्म आमदार असून ते पाचव्यांदा निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. अमर काळे हे एकदा पराभूत तर दोनदा विजयी झाले आहेत. त्यांना यावेळी पुन्हा संधी देण्यात आली आहे. हिंगणघाटची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला जाण्याची शक्यता आहे. वर्धा विधानसभा मतदारसंघासाठीची घोषणा पुढील यादीत होण्याची शक्यता आहे.

आघाडीचा फॉर्म्युला

विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी आघाडी केली आहे. दोन्ही पक्ष प्रत्येकी 125-125 जागा लढवणार आहेत. तर मित्रपक्षांसाठी 38 जागा सोडण्यात आल्या आहेत, असं शरद पवार यांनी यापूर्वीच सांगितलेलं आहे.

शरद पवारांनी बीडमधून पाच उमेदवार जाहीर केले आहेत, तर पुण्याचं जागावाटपाचं सूत्र अजित पवारांनी जाहीर केलं आहे. मात्र राष्ट्रवादी आपले उर्वरित 120 उमेदवार कधी जाहीर करणार हे समजलेलं नाही. जागावाटपाचं सूत्र ठरलेलं असलं, तरी काही जागांवर वाटाघाटीची शक्यता आहे.

काँग्रेसचं ‘सीटिंग गेटिंग’ तत्व

काँग्रेसच्या सीटिंग गेटिंग तत्वानुसार विद्यमान आमदारांना तिकीट मिळणार हे निश्चित आहे. 2014 मध्ये काँग्रेसचे 42 आमदार निवडून आले होते. मात्र त्यापैकी अनेकांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजप-शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे त्यांच्या जागी कोणत्या नव्या चेहऱ्यांना संधी मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. विशेषत: राधाकृष्ण विखे पाटील यांच्याविरोधात काँग्रेस कुणाला उमेदवारी (Congress Vidhansabha Candidate List Date) देणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

Non Stop LIVE Update
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.