नवी मुंबईत एकही व्हेंटिलेटर नाही, दोन श्वासांमधील अंतर संपल्यावर प्रयत्न करुन काहीच अर्थ नाही : गणेश नाईक

नवी मुंबई महापालिकेच्या आणि शासकीय रुग्णालयांमध्ये सध्या एकही व्हेंटिलेटर उपलब्ध नाही. त्यामुळे कोरोना रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत, असा आरोप भाजप आमदार गणेश नाईक यांनी केला (Ganesh Naik allegations on New Mumbai Municipal Corporation).

नवी मुंबईत एकही व्हेंटिलेटर नाही, दोन श्वासांमधील अंतर संपल्यावर प्रयत्न करुन काहीच अर्थ नाही : गणेश नाईक
Follow us
| Updated on: Jul 21, 2020 | 7:16 PM

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या आणि शासकीय रुग्णालयांमध्ये सध्या एकही व्हेंटिलेटर उपलब्ध नाही (Ganesh Naik allegations on New Mumbai Municipal Corporation). त्यामुळे कोरोना रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत, असा आरोप भाजप आमदार गणेश नाईक यांनी केला आहे. “दोन श्वासांमधील अंतर संपल्यानंतर कितीही प्रयत्न केले तरी ते व्यर्थ आहेत. त्यामुळे व्हेटिंलेटर खरेदी करा”, असं आवाहन गणेश नाईक यांनी महापालिकेला केलं (Ganesh Naik allegations on New Mumbai Municipal Corporation).

आमदार गणेश नाईक यांनी आज (21 जुलै) नवनियुक्त मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी नवी मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा वाढता आकडा आणि इतर वैद्यकीय समस्यांबाबत चर्चा केली. या बैठकीनंतर गणेश नाईक यांनी पत्रकार परिषद घेऊन नवी मुंबईत एकही व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्याचा दावा केला.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

“नवी मुंबईत एकही व्हेंटिलेटर बेड उपलब्ध नाहीत. व्हेंटिलेटर मिळत नसल्याने कोरोना रुग्णांचे हाल होत आहेत. त्याचबरोबर व्हेंटिलेटर नसल्यामुळे नवी मुंबईत रुग्ण दगावण्याचा आकडा वाढला आहे. त्यामुळे महापालिकेने तातडीने व्हेंटिलेटर खरेदी करावे”, असं गणेश नाईक म्हणाले.

“दोन श्वासांमधील अंतर संपल्यानंतर कितीही प्रयत्न केले तरी ते व्यर्थ आहेत. त्यामुळे आपल्या महापालिकेकडून व्हेटिंलेटर खरेदी करा, असं सांगितलं. त्या व्हेटिंलेटर्सचा नक्की वापर होईल. वापर नाही झाला तरी काही हरकत नाही. पण नवी मुंबई महापालिका क्षेत्रात एखादा रुग्ण व्हेटिंलेटर मिळाला नाही म्हणून दगावला तर त्यापेक्षा वाईट नाही. याशिवाय आपणही महापालिकेला मदत करु”, असं गणेश नाईक म्हणाले.

नवी मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा 13 हजारांच्या पार गेला आहे. यापैकी 359 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र, बाधितांचा वाढता आकडा चिंता वाढवणारा आहे.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.