मराठा क्रांती मशाल मार्चची नियमावली, शांततेत मोर्चा काढून मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाजाच्यावतीने मराठा क्रांती मशाल मार्च आयोजित केला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चानं मशाल मोर्चात शिस्त पाळली जावी म्हणून नियमावलीच तयार केली आहे.

मराठा क्रांती मशाल मार्चची नियमावली, शांततेत मोर्चा काढून मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार
Follow us
| Updated on: Nov 06, 2020 | 8:49 PM

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाजाच्यावतीने मुंबईत मातोश्रीावर मराठा क्रांती मशाल मार्च काढण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चानं मशाल मोर्चामध्ये शिस्त पाळली जावी आणि कोणतंही गालबोट लागू नये म्हणून नियमावलीच तयार केली आहे. आतापर्यंत मराठा क्रांती मोर्चाकडून सर्व नियम पाळून राज्यभरात शांततेत मोर्चे काढण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे मशाल मार्चाही शांततेत काढण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली (Guidlines for Maratha Kranti Mashal Morcha for Maratha Reservation).

मराठा क्रांती मशाल मोर्चासाठी सर्व आंदोलक कलेक्टर ऑफिस समोरील गार्डन येथे जमणार आहेत. मशाल मोर्चात सहभागी होणाऱ्या आंदोलकांसाठी बांद्रे, खेरवाडी येथे पीडब्ल्यूडी ग्राऊंडमध्ये वाहने पार्किंगची सोय करण्यात आली आहे. मशाल मार्चच्या माध्यमातून आपल्या मागण्यांसाठी शेवटचा पर्याय म्हणून मुख्यमंत्र्यांकडे न्याय मागण्यासाठी जात असल्याचंही मराठा क्रांती मोर्चाकडून सांगण्यात आलं.

मराठा क्रांती मशाल मोर्चाची नियमावली

  • आपल्या मशाली या प्रतीकात्मक असतील.
  • कायदा सुव्यवस्थेचा आदर करता कृपया खऱ्या मशाली आणू नयेत.
  • आपापली वाहने नेमून दिलेल्या वाहनतळावर पार्क करून शांततेच्या मार्गाने दिलेल्या नियोजित ठिकाणी जमावे.

मार्चमध्ये फक्त खालील घोषणा दिल्या जाणार

1) जय भवानी जय शिवराय 2) एक मराठा लाख मराठा 3) तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय 4) आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं.

नेहमीप्रमाणे मराठा क्रांती मशाल मार्च शांततेत पार पडेल. मुख्यमंत्र्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देऊन हा मोर्चा संपेल, अशीही माहिती देण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

वेळ पडल्यास मराठा आरक्षणासाठी रथीमहारथींना साष्टांग नमस्कार घालेन: उदयनराजे भोसले

मराठा आरक्षणावर आता तुम्हीच मार्ग काढा; मराठा आंदोलक शरद पवारांना भेटणार

मराठा विरुद्ध ओबीसी वाद निर्माण करण्याचं काही राजकीय पक्षाचं षडयंत्र; अशोक चव्हाण यांचा आरोप

व्हिडीओ पाहा :

Guidlines for Maratha Kranti Mashal Morcha for Maratha Reservation

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.